Skip to content

आणि ती मला नव्याने उमगली…..

आणि ती मला नव्याने उमगली…..


अनुजा धारिया शेठ


संजय आणि सुनीता यांचे लग्न होते अगदी अरेंज मॅरीज…..

तर संजय आणि सुनीता ….(म्हणजे आताच्या पिढी मधले आजी आणि आजोबा)….आता ६० वर्ष झाली असतात त्यांच्या लग्नाला….बघूया कशी उमगत केली सुनीता त्यांना…..

संजय आणि सुनीता यांचे लग्न होते….पण संजय कधीच तिला मनाने आपले मानत नाही…..संजय चे एका मुलीवर प्रेम होते…आणि त्याला तीच्याशी लग्न करायचे होते पण त्या काळी जात- पात पाळत असत….आणि रमा खालच्या जातीची असल्यामुळे संजय च्या बाबांनी नकार दिला….आणि त्या काळी मोठ्या माणसांच्या शब्दाला किंमत होती…त्यांचा शब्द अखेरचा….गोखले काकांनी लगेच सुनीता हिला पसंद केले आणि त्यांचे लग्न झाले अगदी ८ दिवसात…. त्यामुळे खूप घाई मध्ये एकमेकांना नीट बघितलं ही नव्हते….म्हणा त्या काळी तशी पद्धत नव्हतीच…..मोठे ठरवतील तसे….आणि तेच व्हायचे….

सुनीता गोखले कुटुंबाची सून झाली….पण काका मोठे हूशार होते…संजय ने तीचा बायको म्हणून स्वीकार करेपर्यंत तिला गावाकडे ठेवली….हळू हळू तें जवळ आले पण मनाने नाही हे सुनीता ला जाणवत होत….पण तेव्हा नवऱ्याला असे बोलणे, जमत नसे….आणि तिने कधी प्रयत्न पण केला नाही तसा….खूप साधी होती….संजय ला आवडू लागली होती….पण काहीतरी कमी आहे असे तिला नेहमीं वाटे…..पण कधी बोलायची वेळ आली नाही….

आणि मग् चाहुल लागली बाळाची….गोखले काका खूप खुश….त्यांनी संजय ला सांगितलं आता तुम्ही बाळ झाल्यावर सून बाई ला घेऊन जाऊ शकता….पण झाले उलट त्यांची नोकरी गेली….संजय पूर्ण खचून जातो….काका खूप चिडतात…..

पण ती मात्र खंबीर होऊन संजय रावांना धीर देते….तेव्हा ती त्यांना नव्याने उमगत जाते…..

सासूबाई तिला पांढर्या पायाची म्हणतात….तिचे हाल करतात…तिला उपाशी ठेवतात….खूप काम करून घेई….पण तिने कधीच तक्रार केली नाही…त्यात अशी अवघडलेली….तरी तिने कधीच शब्द काढला नाही….कायम तिने साथ दिली संजय ला….आणि गावात च माहेर असले तरी कधी आई बाबांना सांगितलं नाही….

पण एकदा काही काम निघाले म्हणुन ती दोघे रस्त्याने जात होते….वाटेत तिचे घर आले म्हणुन त्यांनी टांगा थांबवला…..आणि समोर आई दिसल्या वर तिला भरून आले….तो म्हणाला मी जाऊन येई पर्यंत थांब इथे…..आता तो तीच्या एवढ्या जवळ आला होता की न बोलता सर्व त्याला समजत होते…ती त्याला उमगत जात होती…..तिला आनंद झाला….आणि घरात आल्यावर तिने आई ला सांगितलं की खूप भूक लागली आहे….पोरगी एवढ्या दिवसांनी आली म्हणून आईला बरे वाटले किती डोहाळे पुरवु असे झाले….तेवढ्यात पिशवी राहिल्या मुळे संजय अर्ध्यातून आला, आणि समोर बघितल्यावर तिने जेवताना नजर चोरली त्याला जे समजायचं तें समजले….

आणि ती त्याला नव्याने उमगत गेली…..
त्यानंतर तो थांबू लागला तिच्या सोबत जेवायला….तेव्हा आतापर्यंत तिने सहन केलेल्या गोष्टी समजू लागल्या आणि तिचे नविन रूप त्याला उमगत गेले…..

पहिली मुलगी झाली सासूबाई नी नाक मुरडले….पण संजय मात्र अगदी खूप लाड करी पहिली बेटी धनाची पेटी….
म्हणुन खूप कौतुक करी…पण वेळीच तिने उदाहरणासह शिस्तीचे महत्व पटवून दिले….तेव्हा ती त्याला नव्याने उमगत गेली….

लवकरच धंदा खूप वाढला….तरी स्वतःपेक्षा घर, संसार, घरातले यांचा विचार करताना त्याला ती नव्याने उमगत गेली….

शहरा मधून येताना त्याच्या गाडीला अपघात झाला….लागले नाही पण तरीही…रात्री मिठीत शिरून घाबरून रडणारी ती त्याला नव्याने उमगत गेली….

सगळ्यांशी प्रेमाने वागणे, काळजी घेणे, प्रत्येक कर्तव्य पार पाडत असतंना ती त्याला नव्याने उमगत गेली….

मग् परत गोड बातमी आली….आणि सर्व जण आता भाऊ येणार असे छकुली ला सांगत होते….तेव्हा कोणी पण होऊ दे त्याला कसे आपले मानायचे…प्रेम करायचे ….याचे धडे तिला देत होती….तेव्हा ती त्याला नव्याने उमगत गेली….

मधल्या काळात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या पण प्रत्येक वेळेस ती खंबीर होती त्याच्या मागे….. तेव्हा ती त्याला नव्याने उमगत गेली….

त्याच्या बहिणीचा नवरा गेला….भावाच्या बायको ने नणंद घरात नको म्हणून भांडण करायला सुरुवात केली आणि तीच्या आणि दिरावर संशय घेतला आणि काडीमोड घेतला….पण या सगळ्यातून जाताना ती डगमगली नाही….तर पूर्ण घर सांभाळून सर्वाना हसत खेळत केले…तेव्हा ती त्याला नव्याने उमगत गेली….

आणि सगळे सुरळीत झाल्यावर….स्वतः चे कर्तॄत्व सिद्ध करण्यासाठी धडपड करणारी ती…ती त्याला नव्याने उमगत गेली….तिचा स्वाभिमान पदोपदी दिसत होता त्याला….

कुटुंबात आलेल्या संकट त्याचा धसका घेऊन सासूबाई आजारी पडल्या…..तेव्हा तिला छळणार्या त्यांच्या साठी दिवसरात्र देवा समोर समई तेवत ठेवणारी….ती त्याला नव्याने उमगत गेली….

हे सर्व करताना ती एक उत्तम आई, गृहीणी, सून तर होतीच पण वेगळे काहीतरी कार्य करून समाजात पण छान नाव कमावले तिने आणि ती त्याला नव्याने उमगत गेली….

हळू हळू काळ पुढे गेला….मुले मोठी झाली…..मग् स्वतःला वेळ देऊन स्वतः चे सर्व छंद ती उत्तम सांभाळत होती….प्रत्येक वेळेस तीच्या मध्ये असलेली नवीन कला त्याला समजत गेली…. आणि ती त्याला नव्याने उमगत गेली….

हळू हळू संसार पुढे गेला तरी तिची प्रेमळ साथ…आणि त्याच्या हातांत असलेला तिचा हात मात्र अगदी तसाच होता….वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ती त्याला नव्याने उमगत गेली….

सून, जावई आल्यावर सासू म्हणून, आजी म्हणून जबाबदारी पार पाडताना ती त्याला नव्याने उमगत गेली….

आणि शेवटी तिच्यात असलेली अभिनय कला वापरून तिने स्वतः ला झालेला आजार सर्वांपासून लपवून ठेवला आणि सोडून गेली त्याला त्याच्या हातांत एक पत्र देऊन…. तेव्हा ती त्याला नव्याने उमगत गेली….

पत्र वाचून त्याला समजले की तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत तीच्या मनात फक्त त्याचा विचार होता….
त्याने त्याच्या काही गोष्टी मध्ये कसा बदल करावा ती गेल्यावर….ते तिने पत्रा मध्ये लिहिले होते….म्हणजे दुसऱ्या कोणाला त्याचा त्रास होणाऱ नाही…..तेव्हा ती त्याला नव्याने उमगत गेली….

पत्रा मध्ये तिने जाताना रमा ची जागा घेऊ शकले का हो मी??? असा प्रश्न विचारला आणि ती मला नव्याने उमगली….

जाताना रमा बद्दल विचारणे….तिच्या शी लग्न करा परत मी सांगतें म्हणून आणि…तिचा फोटो आणि पत्ता देऊन गेली तेव्हा मला ती नव्याने उमगली…

आणि मी लपवून ठेवले पण तिने कसे शोधून काढले… ह्या प्रश्नाचे उत्तर देण्या आधीच ती सोडून गेली….

खुप् रडायला आले….पण सावरायला ती नव्हती….आणि तिचे महत्व परत नव्याने उमगले….

समाप्त…

TC…


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

5 thoughts on “आणि ती मला नव्याने उमगली…..”

  1. Anuja Dhariya sheth

    हा लेख माझा आहे….तो जसा च्या तसा कॉपी करून इथे स्वतःच्या नावाने तुम्ही टाकलाय….त्यामध्ये माझे नाव लगेच टाका…साहित्य चोरी हा गुन्हा आहे….माझ्या नावाने कॉपी राइट आहे…ह्या कथेला ईरा ब्लॉग कडून मला प्रथम क्रमांक मिळाला आहे…माझ्या कडे सगळे पुरावे आहेत…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!