Skip to content

मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना ‘लॉकडाऊन’ करा!

मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना ‘लॉकडाऊन’ करा!


डॉ. आशिष गुरव

Motivational Speaker and Life Coach


तुमचे मन लॉकडाऊन करा. नकारात्मक विचाराचा प्रवेश बंद करा.

पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी नकारात्मक विचारांपासून दूर राहिले पाहिजे. पण सध्या नकारात्मकता वाढत चालली आहे. जगामध्ये कोरोना व्हायरसची चर्चा आहे. प्रत्येकाला याची भिती वाटत आहे. प्रत्येकजण तोच विचार करीत आहे. पण भिऊन मनात नकारात्मक विचार आणणे चुकीचे आहे.

आज प्रत्येकजण मोबाईल हातात घेऊन बसला आहे. लॉकडाऊन मुळे वेळ घालविणे कठीण झाले आहे. पण चांगल्या, सकारात्मक विचारात वेळ घालविणे, ही गोष्ट फार कमी लोक करीत आहेत. कारण सोशल मेडिया मध्ये कोरोनाचीच चर्चा आहे. आतील अनेक मेसेज खोटे व गैरसमज पसरविणारे असू शकतात. यामुळे विनाकारण मनावर ताण वाढतो. नकारात्मकता वाढत जाते. अशा वेळी नकारात्मक विचाराना मनात प्रवेश देणे बंद केले पाहिजे. यासाठी मन लॉकडाऊन करणे आवश्यक आहे.

मन लॉकडाऊन करणे वाटते तितके सोपे नाही. आता पहा, लॉकडाऊन असताना देखील अनेक लोक बाहेर फिरत आहेत. त्याप्रमाणे अनेक चित्रविचित्र विचार मनात येतच रहातात. यातील वाईट, भितीदायक, त्रासदायक विचारात अडकणे किंवा न अडकणे आपल्याच हाती आहे. नकारात्मक विचार मनात येणार. पण त्यांना किती महत्त्व द्यायचे हे आपण ठरवायचे आहे.

मन लॉकडाऊन करण्यासाठी माइंडफुलनेस उपयुक्त ठरू शकते. माइंडफुलनेसमध्ये आपण फक्त वर्तमानकाळाचा विचार करतो. हातातील कामावर पूर्ण लक्ष दिले जाते. त्यामुळे इतर विचार मनात प्रवेश करू शकत नाहीत. काळजी चिंता कमी होते. मन शांत रहाते. याचे इतरही अनेक उपयोग आहेत.

सध्याच्या परिस्थितीत नकारात्मक विचार कमी व्हावेत, सकारात्मक विचार केला जावा, यासाठी काही टिप्स खाली दिल्या आहेत. त्यांचा वापर करावा.

कोरोनाची माहिती घ्या, पण सारखा तोच विचार नका.

तेच तेच मेसेज वाचणे बंद करा.

क्रिकेटच्या स्कोअरसारखा कोरानाचा स्कोअर बघू नका.

खूप वाईट कल्पना करू नका. भिती पसरवू नका.

इतर चांगल्या, सकारात्मक विषयावर चट करा.

मित्रांना फोन करा व मन मोकळे करा.

स्वत:ला असहाय्य समजू नका.

इतरांना मदत करा. तुम्हाला छान वाटेल.

ताणातून थोडा रिलीफ मिळविण्यासाठी संगीत ऐका, व्यायाम करा.

परिस्थितीचा सामना करण्याचा निर्धार करा.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!