Skip to content

कोणतंही काम छोटं नसतं, उलट छोटं कामच कधीकधी अवघड असतं.

कोणतंही काम छोटं नसतं, उलट छोटं कामच कधीकधी अवघड असतं.


मीनल महेश झवर


काम कोणतंही छोटं नसतं… उलट छोटं कामच कधी कधी करायला खूप कठीण असतं…

याचंच एक उदाहरण म्हणजे हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या “रिसेप्शनिस्ट”

पेशंट चे नाव लिहून त्यांना आत डॉक्टर च्या केबिनमध्ये पाठवणं,हे अतिशय जबाबदारीच काम आहे असं मला वाटतं..

बाहेर आलेले पेशंट, त्यांच्यासोबतचे नातेवाईक, लहान मुलं, किलबिलाट, गडबड पेशंटची फाइल बघणे,नाव,गाव नोंदवणे, वजन बीपी अशे काम बाहेरच करून त्याची नोंद डॉक्टर च्या टेबल वर ठेवणे..इतक्या वेळात आलेले फोन कॉल्स अटेंड करून डॉक्टर कधी येतील, आहेत का? फोन वर नाव का लिहीत नाही? अश्या किती कॉल्स ला सॉफ्टली हँडल करणं वाटतं तितकं सोप्प नाही…

पेशंटचा नंबर लागण्यावरून गोंधळ घालण्यापासून तर औषधी समजावून देतांना बोलण्याची ऊंची संभाळतानाची होणारी कसरत पण सांभाळावी लागते…

डॉक्टर ला वेळ लागला तर जबाबदार रिसेप्शनिस्ट…तुम्ही तर म्हंटल ह्या वेळेला सर भेटतील…वेळ होतोय आमचा नंबर लावा…खूप त्रास होतोय..बाथरूम ला जायचंय..बाळ रडतोय…तुम्ही नेमकी वेळ का सांगत नाही…आम्ही उशिरा आलो असतो…

अश्या अनेक भिन्न भिन्न अवघड प्रश्नांचे उत्तर देताना रोजचीच परीक्षा असते..

एखाद्या डॉक्टर कडे बिचारीला मल्टिटास्कर व्हावं लागतं.. नाव लिहिता लिहिता घरातल एखादं मॅडमचा काम करावं लागतं..
आपण एखाद्या वेळेस म्हणतो अरे,डॉक्टर खूप छान आहे पण ती बाहेरची बाई फारच रागीट आहे, डॉक्टर पेक्षा ती भारी आहे..
पण बहुतेक तसं नसावं…डॉक्टर अजून का आले नाही ह्या आपल्या प्रश्नाचे तिने आपल्याआधी 5 वेळा उत्तर दिलेले असते..आणि मग तो टेम्पर थोडा वाढलेला असतो आणि त्याच्यात मग आपल्याला भारीपणा दिसतो..

स्वतःच्या संसाराचे काम करून ठरलेल्या वेळी ऑन ड्युटी येणं आणि डॉक्टरांची ही मेन ड्युटी तितक्याच दक्षतेने हँडल करणं..हे माझ्या मते छोटं काम नक्किच नाही…

सगळ्याच रिसेप्शनिस्ट छानच किंवा वाईट असतील असं नाही..एखादीला एव्हड्या ईझीली नाही मेळ बसवता येत पण जिला जमतं तीच कौतुक वाटतं..

एखादा डॉक्टर छान हासत बोलला आपल्याला छान ट्रीट केलं की आपण लगेच काय मस्त आहे हो ते सर…त्यांच्याशी फक्त बोललं तरी बरं वाटतं… तसंच बाहेर जिने आपला नंबर लावताना आपल्याला छान स्माईल दिली आणि मस्त बोलली तर तिचीही एकदा आठवण करून धन्यवाद करा…बघा तुम्हाला पुढच्या वेळेस तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर छान मिळतील…

रिसेप्शनिस्ट नेहमी “ती”च असेल असं नाही “तो” असेल तरी त्याच्याही कामाचे कौतुक आवर्जून करायलाच पाहिजे…

शेवटी कोणतंही काम छोटं आणि सोप्प नसतं…



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!