Skip to content

वेळेशी भांडून काहीच उपयोग नाही, उलट वेळच वाया जातो.

वेळेशी भांडून काहीच उपयोग नाही, उलट वेळच वाया जातो.


विक्रम इंगळे

१ एप्रिल, २०२०


मला नेहमी असं वाटतं की वेळेशी भांडून काहीच मिळत नाही. उलट आणखीन वेळ वाया जातो. कधीकधी माणसाने जे झालं ते झालं आता आपण पुढचे बघू असं म्हणून पुढे चालावं. कारण झालेलं तो बदलू शकत नाही अणि पुढचे सगळं त्याच्या हातात नाही. तो आज जे करेल ते उद्या त्याच्या समोर येईल. आज जर रडत कालच्या दिवसाला नावं ठेवत बसला तर उद्या त्याला आजच्या दिवसाला नावं ठेवत बसावं लागेल.

थोडासा दृष्टिकोन बदलायची गरज आहे. थोडी दृष्टी पण बदलायची गरज आहे. गुलजारच्या भाषेत, ‘थोडासा नज़रिया बदलो’. गोष्टी, घटना, आयुष्य जरा वेगळं दिसायला लागेल. जरा सकारात्मकता जाणवायला लागेल. अहो! आपण कुठलीही गोष्ट केंव्हाही सुरू करू शकतो. आत्ता पर्यंत केली नाही! ठीक आहे. ठरवा अणि ह्यापुढे करायला सुरवात करू. एकदा असा फ्रेश श्‍वास घेऊन तर बघू. मग गेलेलं आयुष्य सुद्धा छान वाटायला लागेल. अरे! पन्नास वर्षे मस्त गेली आता उरलेली पन्नास पण बेश्टss घालवू.
फक्त नज़रिया बदला अणि आहात तिथून पुढे जायला सुरुवात करा!!

मी व्यायाम सोडून तीस वर्षे झालीत! मग काय झालं! आता हळुहळु परत एकदा सुरवात करा. थोड्याच दिवसात परत तरुण फील येईल. परत आरशात स्वतःला एकदा तेंव्हा सारखं बघावंस वाटेल.

मी इतक्या वर्षात बायकोला गजरा पण आणला नाही! मग काय झालं! जरा चुकलंच असं वाटतयं ना! मग आता आणा की. कुठे उशीर झालां! अरे! बायकोला डेटला प्रपोज करून तर बघा. विशीत काय लाजली असेल अशी लाजेल ती आत्ता. तिची ती अदा बघून परत एकदा बायकोच्या प्रेमात पडाल. तिच्या होकारासाठि एकदा जीवाची परत धडधड होऊ दे.

अणि जग काही म्हणत नाही. म्हणणारे आपल्यावर जळतात म्हणुन आपल्याला बोलतात. कारण त्यांना हे रोमँटिक सुचत नाही. ते आपले रडत बसतात.

वाढलेल्या वयात जर असाल तर त्याची पण मजा घ्या की!
मस्त पैकी केस काळे करा. त्याहून म्हणजे दिल जवान करा. काही राहिलं असेल तर राहू दे. त्याचा विचार नका करू. काय करायचं ह्याचा विचार करा. जे राहून गेलं अणि आता होणार नसेल अशा गोष्टींना प्रॉमीस करा, ‘नेक्स्ट टाईम!’

बघा ना! पन्नाशीला गेल्यावर कुण्या तरुण मुलीने हसुन पहिलं तर चेहरा हसतो अणि मन आता तिने काका म्हणु नये म्हणून प्रार्थना करत असतं. अणि त्यातूनही ती ‘अहो काका’ असं म्हणालीच तर खळ्ळकन काहीतरी तुटल्याचं जाणवतं. मग उगीच चेहरा हसरा ठेवून मी अजून काकाच वाटतो, आजोबा नाही हे समाधान मानून घ्यायचं! हेच एन्जॉय करायचं!!

काय आहे! आयुष्य त्याच्या गतीने सुरू असतं. उगीच आपणच ठरवतो, लाइफ खूप फास्ट आहे ना! लाइफ किती बोअरींग स्लो आहे! असं फास्ट अणि स्लो काही नाही. ते आहे त्याच्या गतीने. त्याच्याबरोबर जुळवून घेण्यात आपण कमी पडतो.

मनात आळस असेल तर लाइफ फास्ट वाटेल कारण ते तुमच्या पुढे निघून जाईल. काही नाही! खूप सोप्पंss आहे! एका फाईन ट्यूनिंगची गरज आहे.

दुसर्‍याच्या घड्याळात बघून टाइम नका सेट करू. आपली वेळ आपणच सेट करू. आपलं घड्याळ आपल्या गतीनं, आपल्या आयुष्याच्या वेगानं सेट करा. उगीच रस्त्यावर शेजारचा फास्ट जातोय म्हणून आपला वेग नका वाढवू! अहो माझी साधी खटारा गाडी असली म्हणून काय झालं. मी त्याची राईड एन्जॉय करेन. बाजूच्या मर्सिडीज कडे कशाला बघू!!

खरं सांगू का! आपलं आणि वेळेचं कुठल्यातरी एका क्षणावरून भांडण असतं! कुठेतरी आपलंच घड्याळ मागेपुढे होतं अणि तो क्षण निसटतो. आणि मग आपला आपल्याला राग आलेला असतो तो आपण वेळेवर काढतो आणि म्हणतो ‘माझी वेळच खराब आहे!’ इगो सोडा देवा इगो सोडा अणि मस्तं जगा!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!