Skip to content

‘स्त्री’ सर्वात सुंदर केव्हा दिसते….? जाणून घ्या !

‘स्त्री’ सर्वात सुंदर केव्हा दिसते….? जाणून घ्या !


माझ्या खास मित्राने मला प्रश्न विचारला… आणि मला विचार करायची सवडही न देता, स्वतःच ऊत्तर देता झाला… “आता व्यक्ती तितक्या प्रकृती” या ऊक्तीप्रमाणे ह्याची ऊत्तरंही वेगवेगळी मिळतील; पण माझ्यामते तरी एखादी स्त्री सर्वाधिक सुंदर दिसते…. स्वयंपाक करतांना…

आपल्या कोणाला अन्न मिळावं…

पोट भरावं त्यांचं वेळेवर म्हणून जी तळमळ दाटलेली असते तिच्या चेहर्‍यावर, तिला तोडच नाही… …!

तिचा स्वयंपाकघरातील प्रत्येक वावर जादुई असतो…

फक्त तो आपल्या “मनाला” दिसायला हवा, आपलं भुकेलं पोट आड न येता…

मग ते कांदा चिरतांना सुरी पकडलेल्या ऊपड्या हाताने, कधी सुरसुरणारं नाक पुसणं असो तर कधी वाहते डोळे…

ते पोळ्या लाटतांना पाठमोरं अंग त्या एका लयीत थिरकणं असो…

ते कुकरची शीट्टी चिमटीत पकडून दोनदा तीनदा सोडून देत, वाफ जाऊन देणं असो…

ते दोन्ही हातांनी रवी पकडून कलत्या मानेने ताक घुसळतांना, लोणी किती जमा होतय बघणं असो…

ते भाजी – आमटीत बुडवलेल्या चमच्याने हातावर घेतलेल्या एका थेंबाची चव, बाहेर काढलेल्या जीभेनी तपासणं असो…

ते मळलेली कणिक तिंबताना एक मूठ तर प्रसंगी दोन्ही मूठी वापरणं असो…

ते एका हाताने तव्यावरची पोळी ऊलटतांना, दुसर्‍या हाताने आमटीतल्या डावाने ती ढवळणं असो…

ह्या नी अजुनही बर्‍याच गोष्टी एक बाई आपल्या स्वयंपाकघरात क्रमवार करत असते…

ज्या करतांना तिच्या चेहर्‍यावर निव्वळ “अद्भुत” भाव ऊमटलेले असतात…

तिने जीभेने टिपलेल्या त्या तळव्यावरच्या आमटीच्या थेंबासारखेच, हे भाव आपल्याला नजरेने टिपता मात्र यायला हवे”.

मी हे सगळ रोज बघत असुनही माझ्या घरी, डोळ्यांसमोर आणायचा अथक प्रयत्न करु पहात होतो;

पण

मित्राच्या आतून फूटू पहाणार्‍या ‘व. पु.’ सदृश तत्ववेत्त्याने माझी अडचण वेळीच ओळखली नी तो पुढे बोलू लागला…

“कुठलाही मेकअप नसतो अरे त्यावेळी तिच्या चेहर्‍यावर, की नसतं कुठलंही अवघडलेपण सतत कुणी बघतय आपल्याकडे ह्या विचाराचं… स्वयंपाकघरातला वावर एखाद्या बाईचा, रयतेच्या राणीसारखाच असतो…

ठाम नी ठोस..

न्हाऊन, केस मोकळे सोडून, त्यावरचं पाणी टाॅवेलने झटकणार्‍या, तजेलदार झालेल्या बाईपेक्षा…

स्वयंपाक करुन, घरच्यांना जेऊ घालून, फडक्याने ओटा पुसणारी, दमछाक झालेली बाई नितांत सुंदर दिसते…

आणि

त्या सगळ्या कष्टांच फळ तिला मिळतं, फक्त आपल्या तीन शब्दांनी……

“छानच झालेलं सगळं”……

जे तिच्या घामेजल्या, दमल्या सौंदर्याला चार चांद लावतं…

आणि बरं का, हे माझं प्रचंड प्रामाणिक मत आहे;

तेव्हा यातुन कोणीही कुठलाही ‘स्त्री मूक्ती’ चळवळीचा अॅन्गल कृपया शोधू नये”.

तेव्हढ्यात त्याला त्याच्या बायकोचा फोन आला…

चल निघतो, दळणाचा डबा घेऊन जायचंय घरी जातांना…

अरे हो, आणि सांगायचं राहिलच, कणिक भिजवतांना आपली चाळिशीची बायको ऊपड्या हाताने कधी डोळ्यांवर आलेली केसांची बट बाजूला सारते ना……!

“बाॅबी’ मधली सोळा वर्षांची डिंपलही पानी कम चाय वाटते रे तीच्यासमोर”.

आयुष्य आपल्यापुरतं ‘हरदम रंगीन’ ठेवायची आपलीच फिलाॅसाॅफी माझ्या तोंडावर मारुन तो चालू पडला घाईत…

बायकोचं सौंदर्य पुन्हा डोळ्यांतून निवांत साठवायला, पुन्हा नव्याने अनुभवायला…..


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

5 thoughts on “‘स्त्री’ सर्वात सुंदर केव्हा दिसते….? जाणून घ्या !”

  1. मानसी

    स्त्री अजून सुंदर दिसते जेव्हा ती मेनू ठरवते
    तीच भाजी व डाळ सारखी सारखी नको
    कमी पगारात सर्वांच्या इच्छा पूर्ण करते

  2. Pratibha Desale

    स्त्रीला मुळातच निसर्गाकडून अप्रतिम सौंदर्ययाची देणगी मिळालेली आहे. जणू काही ती देवाने विचार करून बनविलेली एक कलाकृती आहे. ती फक्त स्वयंपाक करतानाच नाही तर प्रत्येक वेळी अधिक सुंदर दिसत असते, फक्त तीला बघणाऱ्याचं मन सुंदर असलं पाहिजे मग तो/ती कुणीही असो.

  3. खुप छान,खरोखर स्त्री स्वयंपाक करतांना अधिकच छान दिसते…

  4. नितांत सुंदर नेहमीसारखाच वेगळा विषय . खूप छान .एवढ्या सूक्ष्म नजरेने कितीसे पुरुष पाहतात ? मनाला उभारी देणारा लेख ..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!