Skip to content

आयुष्य खुप सुंदर आहे, मी आणखी सुंदर बनविणार…

सुखाचा शोध, बाहेर कि स्वतः मध्ये.


डॉ अमित पवार


सायंकाळी, एका पेशंट ची अपॉईंटमेंट होती, उच्च शिक्षित होते दोघे पण. पण सतत होणारी डोके दुखी काही केल्या थांबत नव्हती.
डोके दुखी साठी त्यांनी बरीच जाडजूड फाईल तयार केली होतो, जाडजूड यासाठी भरपुर रिपोर्ट्स अगदी MRI CT स्कॅन सगळं.
सर्व पाहुन मी ठरलं आपण काही बोलायचं नाही त्यांना बोलुदेत,
आपण सांगा कसा त्रास होतो, आधी आपण सांगा नंतर मी बोलतो,
त्यांनी सुरू केलं, डॉक्टर मला migraine (अर्धशिशी) बिलकूल नाही, ती ट्रीटमेंट देऊ नका.

मी आपल, नाही नाही म्हणालो,
डोकं अस अचानक दुखायला लागत, कधी ऑफिस मध्ये कधी घरी अस काही लक्षात येत नाही, पण डोकं दुखलं की काहीच सुचत नाही काही सहन पण होत नाही,
मी ऐकत होतो,

अजून काय होत, धडधड होते, खूप डोक्याला मुंग्या येतात, डोकं खुप गरम होत कुणाशीच बोलायचं नाही, कधी कधी तर मरून जावं वाटतं.
अजून काही सांगायचं का, आपल्याला मी म्हटलो,

आता काही सुचत नाही नंतर सांगते, संपुर्ण चेहऱ्यावर भाव बदलला होता, पॅनिक झाला होता, मी पण जरा विचारात पडलो.
जरा मुळा पर्यत जाऊ अस मी पण ठरवलं,
त्यांचे मिस्टर पण सोबत होते आता तुम्ही बोला अस मी म्हटलो,
सर, ती खुप वैतागली आहे पुर्ण फॅमिली डिस्टर्ब आहे.
मी तर खूप, सगळं आयुष्य निरस झालाय, एका मागे एक फॅमिली प्रॉब्लेम्स चालू आहेत, या सगळ्यात सांसारिक जीवन बेचव जेवणासारखा झालंय नुसतं जगतोय आनंद असा कुठेच नाही,
आज काल चिडचिड खूपच वाढलीय कुठेही वाद होतो,
नंतर डोकं दुखत, कुणाशी लवकर पटत नाही, खुप आरडा ओरडा मोठयाने बोलणं, कुणी प्रश्न विचारला की राग येतो,
या सर्व प्रकारा मुळे ऑफिस पासुन घर पर्यन्त सर्व लोक विचार करून बोलतात कुठंही नैसर्गिक बोलणं नाही, माझं पण तसच काही सांगायला गेलं की तू माझी चुक काढतोय नंतर वाद. कुठला ही छोटा मोठा प्लॅन केला की सुरुवात वाद घालुन होते, आता काही करावं वाटत नाही नवीन,

संवादच नाही राहिला, मानस जिवंत आहेत म्हणुन बोलणं सुरू आहे, घर डिस्टर्ब असल्यामुळे बाहेर पण कामात मन नाही आणि अपेक्षित यश नाही.

तिचा माहेरी पण चांगलं सांगत नाही, तिकडं पण सगळं डिस्टर्ब, तिला वाटत तेच खरं आणि बरोबर, या सर्व प्रकारात मुळे पर्यायाने ती सोबत मी पण वैतागुन गेलोय, आणि कुटुंब, तिचे माझे आई वडील यांना या वयात का त्रास? मला पण ब्लड प्रेशर चा त्रास सुरू झालाय झोप येत नाह!

तेवढयात त्यां पण बोलल्या सगळं वाईट माझा मुळेच झालाय, अजुन बराच काही,

मी थांबवलं,
मला सगळा विषय लक्षात आला होता.

गरज होती होती, सोबत ज्या गोष्टी मनात साठून ठेवल्या आहेत त्या सोडून पुढे ज्याण्याची,
मी त्यांना सांगितले आपल्याला एका रेस मध्ये भाग घ्यायचा आहे, परंतु तुम्ही 10kg वजन घेऊन पळायचं तुम्ही काहीच वजन घ्यायचं नाही,
मी म्हटलं कोण जिंकेल सहज कुठलाही त्रास न होता,
दोघे म्हणाले ज्याच्याकडे वजन नाही तो.

मी म्हणालो हो, तसच आयुष्य आहे, जे वाईट आठवणी आहेत मनात साठलेल्या गोष्टी आहेत त्या सोडून द्या त्या ओझं म्हणुन ठेवल्या की पळणं अवघड होऊन जातं.

पुढील काही गोष्टी आयुष्य भर जीवनात सुरू करा आपण पहा आयुष्य किती सुंदर होईल,

माझं काही चुकलं का किंवा जो प्रॉब्लेम असेल त्या विषयी रोज स्वतः शी बोला, गोष्टी स्वतः बदला. Self talk स्वतः बोललं पाहिजे रोज 10 min स्वतः बोलण्यासाठी दिले पाहिजे. स्वतः शी बोलाल तर तुमचे कुटुंबा पासून तर अगदी व्यवसाया पर्यन्त सर्व अडचणी दूर होतील, पण याची सवय लावली पाहिजे, जड जाईल, पण प्रयत्न केला तर अपेक्षित गोष्टी नक्की घडतील.

जस की तुम्हाला कोणी सुचना केली तर आवडत का! किंवा कोणी ओरडून बोललं तर तुम्हाला चालत का! तर तुम्ही तस वागलं तर कस चालेल! मानस दुरावतील, जे आपल्याला सहन होत नाही तस सार्वजनिक जीवनात वागून चालणार नाही, सांगायचं एवढंच होत वागताना बोलताना भान ठेवायला पाहिजे, जे आपल्याला सहन होत नाही, आपण तस वागलो तर इतरांना कसं सहन होणार! एवढं समजून घ्या, सुख दिसायला लागेल, पण करणार कोण तर मी स्वतः.

त्या व्यक्ती मुळे माझं अस आहे, हे आधी डोक्यातून काढा, जे काही आहे माझा मुळे आणि माझा विचारामुळे आहे, तो किंवा ती बदलली पाहिजे, दुसऱ्या ला सुधारतं बसु नकोस, आपण कोणाला काही बदलू शकत नाही, खुप ठिकाणी वाद दुसऱ्या ला सुधारण्यासाठी होतात, आयुष्य जात पण समोरचा सुधारत नाही आणि आयुष्य भर आपलं डोकं दुखत राहत,
तो बदलेल मग माझं आयुष्य बदलेल, कोणालाही बदलत बसू नका चिडचिड वाढेल.

कृतज्ञता Gratitude, सकाळी उठल्या पासुन कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावत आपण लावली पाहिजे, आपल्याला कळत न कळत ज्या लोकांची मदत होते त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा, तेव्हा पासुन पाहा कसा बदल होतो.

Hate तिरस्कार ची भावना असेल तर लवकरात लवकर मनातून काढून टाका, hate तिरस्कार चा शेवट hate तिरस्कार च असतो, आनंद चा शेवट हा आनंद असतो, काही लोक पाहा खूप आनंदी असतात आणि नीट चौकशी केली तर असा कळत त्यांचं नाते संबंध सर्वाशी खुप छान असतात, त्या मुळे आपण मनातील तिरस्कार दूर करा, आणि रिलॅक्स व्हा.

एवढं सगळं माझं सांगुन झालं, मला जाणीव होती एवढं सगळं लगेच बदलणार नाही, परंतु सुरुवात होणं गरजेचं होतं,
त्यांना मी पुढीक तारीख देऊन परत बोलावलं काही डोकं दुखल्यास टॅबलेट दिल्या आणि छोटे छोटे बदल करून या अस सांगून परत बोलावलं.

या केस वर चर्चा करण्याच कारण एवढचं होत की, गेल्या 6 महिन्यात 10 पेक्षा जास्त केस या कुटुंबातील आणि वैयक्तिक जीवनातील ताण तणावा मुळे आजार निर्माण झालेल्या होत्या.
खुप गोष्टी टोकाला जातात आणि गोष्टी उध्वस्त होतात.

सर्वाना एवढच सांगतो, चांगल्या गोष्टी निर्माण करा, बांधणारे व्हा तोडणारे होऊ नका.
शेवटी काय मी आणि मी आहे, माझा जीवनाचा शिल्पकार.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

2 thoughts on “आयुष्य खुप सुंदर आहे, मी आणखी सुंदर बनविणार…”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!