Skip to content

ती ऑनलाइन आहे…म्हणजे अवेलेबल आहे…असं का वाटतं आपल्याला ?

ती ऑनलाइन आहे…म्हणजे अवेलेबल आहे…असं का वाटतं आपल्याला ?


सपना फुलझेले

नागपुर


सोशल मिडियामुळे जग खुप जवळ आलंय. सगळी माहिती ,घडामोडी फक्त बोटाच्या एका क्लिक वर. आता तर ते इतकं जवळ आलंय की आपल्या घरात आणि वैयक्तिक आयुष्यात ही डोकवायला लागलाय .

फ़ेसबुक ,वाट्सप ,यू ट्यूब ,ट्विटर च्या माध्यमातून व्यक्त व्हायला एक व्यासपीठ मिळालंय ते ही हक्कांचे .आपली मतं ,आपली कला ,आपले विचार क्षणार्धात लोकांपर्यंत पोहोचविता येतात.
पूर्वी ही व्यक्त व्हायला माध्यमं होती पण काही विशिष्ट घटकांपुरती ,लोकांपुरतीच त्याची मक्तेदारी होती.

आता तर नुसता पूर आलाय आणि जो तो वाहत सुटलाय,कुणी जाणतेपणी तर कुणी अनाहूतपणे .
पण प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट मर्यादा असते .
कळत नकळत आपण या मर्यादेचे उल्लंघन तर करत नाही ना याचा विचार करायची वेळ आली आहे.

आजकाल व्हट्सप नावाच्या एप वर ग्रूप बनविण्याचा तर लोकांना छंद रूपी व्यसनच जडलय .
आध्यात्मिक ,राजकीय ,साहित्यिक ,टवाळकीय , मैत्रीय नातलगीय, आणखी किती तरी अन् काय काय ?

एकच व्यक्ती किती ग्रूप मधे आहे हे तर त्याला ही कधी कधी ठावूक नसतं आणि महत्वाचं म्हणजे त्याला कुणी अँड केले हे ही माहीत नसतं काही ग्रूप निश्चितच चांगले असतात . विचारांची , सामाजिक जाणिवांची ,कलागुणांची देवाणघेवाण होते .

नवीन शिकायला , समजायला मिळतं .स्वतःतील गुणांना चालना मिळत असते .व्यक्त होता येत असतं मुक्तपणे .

पण बरेच महाभाग याचा गैर फायदा ही घेत असतात .

एखादी व्यक्ती जर आपले विचार मांडत असेल,ग्रूप मधे घडणाऱ्या चर्चेत रेस्पॉन्स देत असेल, लिखाणातून व्यक्त होत असेल तर लगेच त्या व्यक्तीला वेगवेगळ्या ग्रूप मधे अँड केलं जाते आणि ती व्यक्ती जर स्त्रिलिंगी असेल आणि योगायोगाने dp वर तिचा फोटो असेल तर विचारूच नका. शुभेच्छांचा जणू पाऊस पडायला लागतो .
मॅडम तुम्ही छान लिहिता पासून मॅडम तुम्ही छान दिसता चा प्रवास क्षणातच पुर्ण करून टाकतात .आणि मजेची बाब अशी की तिला ठावुकच नसतं की ग्रूप कशाचा आहे ? कोणी अँड केलं ,व का ?

मुख्य म्हणजे तिच्या परवानगीची गरज ही त्यांना वाटत नाही .ग्रूप मधून नंबर मिळवून लगेच तिच्या पर्सनल अकाउंटला हाय हॅलो ,वॉव ,ग्रेट ,अप्रतिम सारख्या शुभेच्छांचा वर्षाव .तिने जर प्रतिसाद नाही दिला तर कसला भाव खाता ? खूप एगोस्टिक आहात ,साधे मॅनर्स नाही ,नम्रता नाही ,थोडं चांगल काय म्हटलं भावच चढलाय ? माज आलाय. असल्या शब्दांची बोळवन .आणि तिनं जर सहज साधा धन्यवाद जरी केले तर लगेच हे सुरू समोरचा खेळ खेळायला .

तुम्ही कुठे असता ? काय करता ?तुम्हाला काय आवडते ?विवाहित की कुमारी असल्या वैयक्तिक प्रश्नांचा भडिमार .नुसताच वैताग !

कधी कधी व्यक्त होण्याचाच काय तर स्त्री होण्याचा ही पश्चाताप होईल इतका मानसिक त्रास होतो या सर्वांचा . कुणी विद्यार्थिनी ,गृहिणी ,व्यवसायी , नोकरदार स्त्रिया कामाच्या व्यापात दिवसभर बिझी असतात. रात्रीला जरा निवांतपणा मिळाला की ,विरंगुळा म्हणा किंवा मन हल्के करण्यासाठी ऑनलाइन आली रे आली की लगेच हे सुरू इतक्या रात्री तुम्ही ऑनलाइन , तुमचे यजमान रागवत नाही ?तुम्ही एकट्याच राहता इथपासून तर तुम्ही खूप दुःखी आहात का ? काही त्रास आहे का ?इथपर्यंत .जणू काही हे एकटेच उरलेत , तिच्या मदतीसाठी ,यांनाच ठेका दिलाय स्त्री उद्धाराचा .

अरे ती ऑनलाइन आहे म्हणजे अवेलेबल आहे असे का वाटतं तुम्हाला ?

का डोकावन्याचा ,ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करताय तिच्या आयुष्यात ? तिचं ती ठरवायला आहे ना समर्थ ! उपभोगु द्या ना तिला तिचं स्वातंत्र्य .

तिनं डी .पी .ठेऊ की नको ,तिने उशीरा रात्री ऑनलाइन राहावं की नको ,ही तिची खाजगी बाब आहे ना ?मग कुणी ही येऊन का तिला प्रश्न विचारायचे ? नको ते सल्ले द्यायचे .

मानलं की ,नंबर ब्लॉक करण्याचा पर्याय असतो तिच्या कडे ,पण किती नंबर ब्लॉक करायचे आणि कुठपर्यंत आणि महत्वाचं म्हणजे का ?
वडीलधार्याँना ,घरच्यांना सांगणे,किंवा तक्रार टाकणे म्हणजे पून्हा एकदा जिवाला घोर , तुला काय गरज ,
कशाला ऑनलाइन राहायचं आणखी ही बरंच काही ,
म्हणजे पुन्हा तीच चुकीची ,
पण का ? का हे असं ?का तिने कुठे व्यक्तच व्हायचं नाही ? आपले विचार ,मतं मांडायचेच नाही ,मुक्त वातावरणात श्वास घ्यायचाच नाही , कायम पडद्यातच राहायचं ,सतत भितीच्या सावटाखाली जगायचं
कुठं तरी हे थांबायला पाहीजे .
तुमची मैत्री , तुमचा सल्ला , तुमचं मतं हवं असेल तर द्या ना ?नक्कीच द्या .
पण अनोळखी व्यक्तीला , तिच्या मनाविरूद्ध का प्रेशराइज्ज्ड करायचं.
ती जर प्रतिसाद देत नसेल तर स्वतःला का तिच्यावर लादायचे हा विचार करणे गरजेचं आहे ?

तुला स्वातंत्र्य आहे तर तिला ही
तुला मन आहे तर तिला ही
तु जगतो ना मुक्त तर जगू दे ना तिला ही ….



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

6 thoughts on “ती ऑनलाइन आहे…म्हणजे अवेलेबल आहे…असं का वाटतं आपल्याला ?”

  1. वास्तव आहे अगदीच. .Online चा available असण्यापेक्षा कुठेतरी गुंतून आहे असाच अर्थ असतो. . पण शेवटी कुणाला संवाद साधायची इच्छा नसेल जास्त वाक्यांचा भडीमार करणे चुकीचेच.. आधीच मन चंचल ते झालयं स्थिर कुठे तर त्यांची शृंखला तोडायचा कोणलाच अधिकार नाही.. खरंतर सोशल मिडिय जरी काही बाबतीत प्रबोधन करीत असला तरी मनाची बैचैनी वाढवणाराही सोशल मिडिया आहे

  2. बरोबर .लेख खरचं खुप छान आहे .माझ्या हि बाबतीत अस घडल आहे….

  3. Tatyasaheb Akhade

    मॅडम मला तुमचा हा लेख खूप आवडला. मला वाटतं प्रत्येकाला आपण त्यांचा स्पेस देणं आवश्यक आहे. सोशल मीडिया हा एक उत्तम प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. त्याद्वारे आपण आपले विचार एकमेकांना कळवू शकतो. तसेच एखादी स्री सोशल मीडिया वर उपलब्ध असेल तर आपण सर्वांनी तिचा रिस्पेक्ट करणं आवश्यक आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!