Skip to content

आयुष्यात अनेक समस्या येतात, त्यावर आपण मात करतच असतो!

आयुष्यात अनेक समस्या येतात, त्यावर आपण मात करतच असतो!


विनय भालेराव


अडचणींवर मात करताना तो अनेक युक्त्या वापरतो, कल्पनाशक्ती वापरतो, योग्य ती बाह्य मदत घेतो स्वतःचे ज्ञान वापरतो स्वतःच्या स्मरणशक्तीचा वापर करतो, विचार प्रक्रिया विकसित करतो आणि अडचणींवर मात करतो.

त्याला डोंगराच्या पलीकडे जायचे असेल तर त्याची अडचण त्या डोंगरा एवढी असते.

कुणी डोंगर पोखरून बोगदा काढतो तर कुणी डोंगर चढणे जास्त सोयिस्कर समजतो तर कुणी आपल्या अफलातून भौतिक शास्त्राच्या ज्ञानाने आणि कल्पनाशक्तीने विमानाचा शोध लावतो.

अडचण दूर करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी, कल्पना वेगळी आणि पद्धतही वेगळी.

या मध्ये अडचण समजून घेणे, अडचण दूर करण्याची पद्धत निवडणे, त्यासाठी योग्य त्या ज्ञानाचा, योग्य त्या विचार पद्धतीचा आणि कल्पनाशक्तीचा आणि कलांचा योग्य तो वापर करणे आवश्यक ठरते.

जो अडचणी दूर करतो तो पुढे जातो त्यालाच जग हुशार म्हणून ओळखते.

माणसाची स्मरणशक्ती एका दिवसांत विकसित होत नाही.

माणसाची विचारशक्ती एकमिनिटात विकसित होत नाही.

किंवा डोंगर चढून जाण्याच्या किंवा डोंगर पोखरून बोगदा खोदण्याच्या क्षमता माणसामध्ये अचानक विकसित होत नाहित.

माणसाने मेंदूतील आणि शरीरातील सर्व क्षमता विकसित करण्याच्या प्रक्रियेलाच शिक्षण म्हणतात, त्याची ती प्रक्रिया जन्मभरच सुरू असते.

आपल्या पूर्वजांनी या बुद्धीच्या आणि शरीराच्या प्रक्रिया विकसित करण्यासाठी आणि त्या कधीच विसरल्या जाऊ नयेत यासाठी, चांगल्या सवयी स्वतःला लावून घेण्याची शक्कल लढवली.

या स्वतःच्या क्षमता वाढविणाऱ्या चांगल्या सवयींना त्यांनी संस्कार असे नांव दिले.

व्यायामाचा संस्कार,

गाण्याचे संस्कार,

चित्रकलेचे संस्कार,

नृत्याचे संस्कार,

अभासासाठी बैठक मारून अनेक तास बसण्याचा सराव,

घरकामाचा सराव,

बाहेरील खाद्यपदार्थ न खाण्याची सवय,

उघड्यावर विकले जाणारे पदार्थ न खाण्याची सवय,

झोप फक्त माफक कालावधी साठीच ठेवण्याची आणि विशिष्ठ वेळेतच घेण्याची सवय,

नियमितपणाची सवय,

नियमित वेळेला आणि थोडेसेच खाण्याची सवय,

रोज काही ना काही लिहिण्याची सवय.

अशा अनेक सवयी असे अनेक संस्कार आपल्या पूर्वजांच्या अनुभवांतून आपण शिकलो आहे.

त्यामुळे आपण आपल्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा पूर्णपणे विकास करण्यास सक्षम झालो आहे आणि त्यातून अचानक येणाऱ्या संकटांवर आणि अडचणींवर सहजगत्या मात करण्याची पात्रता आपण मिळवलेली आहे.

इतकेच नाही तर सर्व मानवी क्षमतांच्या पलीकडे असणाऱ्या अडचणी सुद्धा माणूस या मुळेच सोडविण्यास शिकला आहे.

या नियमितपणामुळे आणि संस्कारांमुळे आपण खूपशा प्रमाणात आपल्या आयुष्यातील दुःखावर देखिल मात करू शकतो किंवा आनंदाच्या प्रसंगात वहात न जाता स्थिर राहू शकतो.

हुशार आणि अडचणींवर मात करण्यास सक्षम माणूस चांगल्या सवयींचा बनलेला असतो असा माझा ठाम विश्वास आहे.

आपल्या आयुष्यात वर्तणुकीला त्यामुळेच अनन्य साधारण महत्व आहे असे माझे मत आहे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!