Skip to content

या सुट्टयांचा मुलांच्या फायद्यासाठी उपयोग करून घेऊया!!

या सुट्टयांचा मुलांच्या फायद्यासाठी उपयोग करून घेऊया!!


सौ सुरेखा अद्वैत पाटील

(पाचोरा)


परवा सहज म्हणून दुपारी मैत्रिणीला कॉल केला, तर तिच्या आठ-नऊ वर्षाच्या मुलांनी कॉल उचलला. मी म्हटलं भावेश काय करतोयस, काही नाही आणि मला कोरोनाव्हायरस च्या सुट्ट्या लागल्यात. मी त्याला प्रश्न केला काय रे भावेश तुझ्या आईला आणि मला कधी लागणार असली सुट्टी? तो त्यावर चटकन म्हणाला ऑंटी आईला कधी सुट्टी असते का हो?

त्याच्या या प्रश्नाने मला विचारात टाकलं. मग मी त्यालाच प्रश्न केला. तुझ्या सुट्टीत तू काय करणार आहेस?

मला सारं काही लिहून पाठव, आणि पुढच्या तासाभरात भावेश ने मला लिहूनच पाठवलं. मला या सुट्टीत मामाच्या गावाला जायला आवडेल. तिकडे खूप खूप मजा करायला आवडेल. त्याने पाठवलेलं सगळं माझ्या वाचून झाल्यानंतर मी त्याला कॉल केला, त्याला म्हटलं या सुट्टीत मामाच्या गावाला नाही जाता येणार,.

मग घरीच राहून तो आईसोबत काय काय करणार आहेस? त्यावर त्यांन मला कामांची यादीच दिली, मी सुट्टी लागल्यापासून आईला घरकामात मदत करतो, आईचे शिकवेल ते शिकतो, आईच्या रिकाम्या वेळात आईसोबत चौपट खेळतो, सोबत व्हिडिओ गेम पण मम्मीसोबत बसूनच खेळतो.

म्हणजे या कोरोनाव्हायरस च्या सुट्टीमध्ये मुलेसुद्धा ऍडजेस्ट झालीत. हे म्हणणं वावगं ठरणार नाही.

खरंतर असं म्हणतात की कुठली जुनी सवय जाण्यास किंवा नवीन सवय लावण्यास 21 दिवस लागतात. आणि या सवयीमुळे आपली जीवनशैली चांगली घडते.

चला तर मग बालकांच्या मनातला विचार करू. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करू. नियमांचा आदर करू आणि आरोग्याची गुढी उभारू.
कोरोणा च्या साथीमुळे सध्या शाळेला सुट्ट्या आहेत. मुले घरीच आहेत अशा वेळी काय करता येईल?

मुलांना वाचनाची आवड पण निर्माण करता येऊ शकते, त्यासाठी ललित लेख, एकांकिका, नाट्यछटा बालसाहित्य, आजकाल ऑनलाईन उपलब्ध आहे, त्याचे सुद्धा मदत घेऊन मुलांना वाचनाची आवड आपण लावू शकतो. मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देता येतं. प्रत्यक्ष पुस्तके वाचून कृतीतून पण मुलं खूप काही शिकतील. वाढत्या वयातील मुलांना अनेक प्रश्न सतावत असतात, हे प्रश्न खरे तर प्रश्न नसतात, ती त्यांची अभिरुची अप्रगट दिशा असते. त्यांना योग्य ते मार्गदर्शन वाचनात मिळू शकत. मार्गदर्शन मिळाले म्हणजे त्याच दिशेने ते मार्गक्रमण करतात आणि यशाची सर्वोच्च शिखरे गाठतात. त्यांची उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतात.

नको असलेल्या सुट्ट्या तरीही त्याचा सदुपयोग करणे आपल्याच हातात आहे. स्वच्छता टापटीप, एकमेकांना मदत करण्याची सवय या काळात आपण मुलांना सहजच लावू शकतो. हे सारं छोट्याशा भावेशच्या बोलण्यात न मला उलगडलं..

मुलांचं खेळण्या-बागडण्याच् वय गेल्या काही वर्षात लहान होत चाललंय. बालकांवर आपण जसे संस्कार करू, तसतशी त्यांची सर्वांगाने, वाढ होत जाईल. त्यांच्या उत्तम वाढीसाठी सशक्त आहाराची गरज आणि महत्व मुलांना या सुट्टीच्या निमित्ताने आपण पटवू शकतो. त्याचबरोबर भावनिक, मानसिक आणि बौद्धिक वीकासा साठी त्यांची वाचन आणि रुची समृद्ध करण्यात आपण मदत करू या. एक जागृत पालक म्हणून..


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “या सुट्टयांचा मुलांच्या फायद्यासाठी उपयोग करून घेऊया!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!