Skip to content

भाज्या विकत होतो, आज आयआयटी चा विद्यार्थी !

बृजेश सरोज

मी उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एका गावी जन्मलो. दलित असल्यामुळे आमची आर्थिक स्थिती कधीच खूप चांगली राहीली नाही. माझे वडील गुजरातच्या सुरतमध्ये विणकर आहेत. ज्यांचे उत्पन्न महिना आठ ते दहा हजार रुपये आहे. आम्ही सहा भावंडे आणि आजी – आजोबांच्या भरलेल्या घरासाठी हे उत्पन्न अत्यंत किरकोळ होते. त्यामुळे अत्यंत लहान वयातच मला लोकांच्या शेतात काम करायला जावे लागले होते.
काही काळ मला भाज्या विकण्याचे आणि लग्नसमारंभात मांडव घालण्याचेही काम करावे लागले. मी अभ्यासात चांगला होतो आणि स्वतःचे शिक्षण अत्यंत गांभीर्याने घेत होतो, परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता मी पुढे शिकू शकेल कि नाही हे समजू शकत नव्हतो, पण शाळेत माझ्या शिक्षकांनी नेहमी मला मार्गदर्शन केले. याच्याच परिणामामुळे मला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला.
नवोदय विद्यालयात गेल्यानंतर मी मागे वळून पहिले नाही. गावातील शाळेत शिकत असताना मजुरी करावी लागत असल्यामुळे शाळेत जाण्याची ग्यारंटी नव्हती, परंतु नवोदय विद्यालयात माझे वेगळे जग होते. तिथे जाऊन मी स्वतःही शिक्षणाचे महत्व गांभीर्याने समजलो. बारावीनंतर दक्षिणा फाउंडेशन मदतीने मी आनंदकुमारच्या सुपर – ३० मध्ये पोहोचलो. आनंद कुमार सर गरीब मुलांना खूप परिश्रम घेऊन शिकवतात आणि मार्ग बदलतात. सुपर – ३० मध्ये एक वर्षाच्या कोचिंगनंतर माझी निवड आयआयटी मुंबईत झाली. माझ्यासोबत माझा धाकटा भाऊही आयआयटीत निवडला गेला.
माझ्या कुटुंबासाठी हा आनंदाचा प्रसंग होता तसे गावतील सवर्ण लोकं यामुळे खुश नव्हते. जेव्हा मी घराबाहेर पडे तेव्हा मला दगड मारून ते त्यांचा आक्रोश जाहीर करीत. फी साठी दोन लाख रुअये गोळा करणे आमच्यासाठी अत्यंत कठीण होते. आयआयटीत प्रवेश मिळवल्यानंतर माझे सारे नातलग माझ्या घरी आले होते, पण ते माझ्या फीची व्यवस्था करू शकले नाहीत कारण त्यांचे स्वतःचे जीवनच यथातथा चालत होते. अखेरीस नामुष्कीने माझ्या वडिलांनी काही लोकांकडे पैसे मागितले, पण त्याचवेळी काही कोर्पोरेट कंपन्या माझ्याविषयी जनीन माझ्या मदतीसाठी पुढे आल्या आणि माझे काम सोपे झाले.
आयआयटीत प्रवेश मिळाल्यानंतर मी खूप खुश होतो, पण ज्याप्रकारे मला मदत मिळाली त्याने माझ्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली. लोकांनी मला जशी मदत केली तशीच मी आता इतर गरीब मुलांची मदत करण्याचे ठरवले . ज्यामुळे तीही माझ्याप्रमाणे त्यांचा जीवनात यशस्वी होतील. उत्तम शिक्षण व लोकांच्या मदतीमुळे ती येथे पोहोचलो, पण गावांमध्ये माझ्यासारखी संधी व मार्गदर्शन गरज असलेली हजारो – लाखो मुले आहेत. याच हेतूने गरीब मुलांसाठी मी माझ्या काही मित्रांच्या मदतीने माझ्या घराच्या प्रतापगढ जिल्ह्यात समदर्शी फाउंडेशन नावाच्या एक संघटनेची स्थापना केली. मुंबईत अमीर खान या अभिनेत्याने माझी भेट घेतली तेव्हा मला खूपच चांगले वाटले, नंतर मी कल्याण भागातही आपली ही संस्था उघडली.

या दोन्ही संस्थांमध्ये गरीब मुलांच्या शिक्षणाचा स्टार उंचावला जातो. जेणेकरून ही मुले जवाहर नवोदय विद्यालय आणि सैनिक स्कूल सारख्या प्रतिष्ठीत शाळांमध्ये प्रवेश घेऊन स्वतःमध्ये दडलेली प्रतिभा उजळू शकतील. 
माझे भविष्य तर सुरक्षित झाले आहे, पण मी आयुष्यभर गरीब मुलांच्या हक्कासाठी काम करीत राहणार हे माझे ध्येय आहे.
***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!