‘ताण’ कमी करण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स !!
आजचं आपलं जीवन एवढं धकाधकीचं झालंय… दिवस लहान आणि कामे फार .. अशी आपली गत होते…सर्व गोष्टी time- bound असल्याने त्या वेळेतच पूर्ण करणे गरजेचे असते..
आणि त्यामुळे अर्थातचं खूप ताणतणावही असतोच…साहजिकच आपली चिडचीडही होतेच…
अशा वेळी ताण न घेण्यासाठी काही टिप्स:
१. कामाची विभागणी:
अगदी लहान सहान कामांचीही विभागणी करा…सर्व कामे स्वतः वर ओढून घेतल्यामुळे अनेकदा महत्वाच्या गोष्टी मागे पडतात… त्यामुळे प्रत्येक काम स्वतः नेच करण्याचा अट्टहास टाळा…त्यामुळे आपोआपचं ताण हलका होईल…
उदा. लहान मुलांना पसारा करून खेळायला खूप आवडतं.. त्यांनी खाली पाडलेली खेळणी त्यांनाच व्यवस्थीत जागेवर ठेवण्यास सांगणे… त्यामुळे मुलं तर engage राहतेच पण आईला मदत केल्याचा आनंदही त्याला मिळतो… आणि सर्वात महत्त्वाचे आपल्या कामासाठी कोणावरही अवलंबून न राहता स्वतः चे काम स्वतः करण्याची शिस्त लागते…..
२. स्वतः साठी वेळ:
कामांच्या रहाटगाडग्यात आपला व्यायाम, आपला छंद , आपली आवड हे पणाला लावू नका… कामे ही आयुष्यभर न संपणारी असतात…आणी आपणही खूप महत्त्वाचे आहोत हे लक्षात ठेवा…
आपल्या आवडीचे गाणे ऐका…संगीत हे आपल्याला प्रसन्न आणि आनंदी ठेवण्याचे उत्तम माध्यम आहे…
दिवसभरात एक काम कमी झाले तरी चालेल मात्र स्वतः ला न चुकता खुश ठेवा… दररोज स्वतः साठी एक तास तरी काढाचं….
बघा दिवस कसा मस्त जातो ते….
3. मूड मूड के ना देख:
आपला mood घालवू नका… कारण एकदा आपला मूड गेला की आपण दुसऱ्यालाही आपल्याचं रांगेत आणून बसवतो… आणि दोन उदास चेहरे घरातील वातावरण अजुनंच उदास करतात…
थोडक्यात काय एकदा मूड गेला म्हणून परत परत तेच आठवून दिवस खराब करायचा नाही.. कटू आठवणी परत परत आठवून आपण स्वतः लाच त्रास करून घेत असतो.. अशा वेळी या कटू आठवणी आठवत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीबरोबर घालवलेले चांगले क्षण आठवा… त्यामुळे तुम्ही स्वतः लाच मोकळं कराल या ताणाचा चक्रामधून ….म्हणूनच झालेल्या अप्रिय घटनेकडे मूड मूड के ना देख मूड मूड के….
4. मूड सांभाळा पण स्वतः चा :
जसे आपण दुसऱ्याचा मूड घालवायचा नाही त्याचप्रमाणे आपला mood कोणालाही घालवू द्यायचा नाही… मला माहिती आहे हे म्हणणे सोपे मात्र करणे महाकठीण आहे…
मात्र हे सरावानेच नक्कीच शक्य होईल… आणि एकदा जमले तर आपल्या सारखे सुखी आपणच..
यासाठी कधी आपल्याला जणू ऐकण्याचा Problem आहे किंवा समोरचा काय म्हणतोय हे न समजण्याइतके आपण मूर्ख आहोत असं बोलणाऱ्या व्यक्तीला जरी वाटले तरी चालेल…
सांगायचं तात्पर्य इतकच की समोरच्याच्या बोलण्याचा आशय लक्षात घ्या मात्र तुमच्या पुढील दिवसाच्या आशा मावळू देऊ नका…
५. कुटुंबासोबत फिरायला जा:
आपल्या त्याच त्याच एकांगी routine मुळे आयुष्यालाही तोचतोचपणा येतो आणि आपला ताणही वाढतो… हा ताण घालवण्यासाठी वर्षातून किमान दोनदा तरी 2-4 दिवस फिरायला कुटुंबासोबत फिरायला जा…
निसर्गामध्ये अवर्णनीय जादू आहे… त्यामुळे फिरायला जा.. यामुळे कुटुंबासोबत वेळ तर घालवता येईलच पण निसर्गाच्या सानिध्यात हा आनंद द्विगुणीत होईल….
६.कौतुक करा:
आपण घराबाहेर Professional relation जीवापाड जपतो… मनात नसतानाही चेहऱ्यावर उसने हसू आणतो.. मात्र घरात आपल्या माणसांच कौतुक करताना बऱ्याचदा हात आखडता घेतो…
त्यामुळे नात्यांमधील ताण- तणाव वाढतो.. त्यामुळे लहान मुलांपासून मोठयापर्यंत सर्वांना सांगा तुम्हाला त्यांचं काय आवडलं ते…
कौतुक केलं आणी चुका सांगितल्या तर त्यांची सुधारणा नक्कीच होते…
आपल्या माणसांचं कौतुक केलं तर आपोआपच आपलेपणा वाढेल…
७.बोलणे टाळा:
काही व्यक्ती या आपल्याशी बोलून आपल्या ताण तणावात भरच घालतं असतात… त्यामुळे मागील अनुभवांवरून शहाणे होऊन त्यांना फारसं entertain न करणं आपल्या हिशोबाने चांगले असते… त्यामुळेच त्यांच्याशी बोलून डोकं out करण्यापेक्षा न बोलून शांत राहिलेलं कधीहि उत्तम….
८. आदर्श बना:
आपण आपल्या मुलांचे कायमच आदर्श असतो.. आपल्याही नकळत अनेक गोष्टी ते आपल्याकडून शिकत असतात..
आयुष्यात भरभरून जगण्यासाठी हे व्यवस्थापन जमणे खूप महत्त्वाचे आहे.. आणि ते सरावाने नक्कीच जमेल…
म्हणजे आपलं ऐकून ऐकून मला फार टेन्शन येते… असे मुलांनी म्हणण्यापेक्षा काहीही असो I can handle it …हे ऐकताना आपण त्यांचे भविष्य निर्धास्त करू….
त्यामुळे मुलांचे आदर्श बना…
आपलं आयुष्य खूप छोटे आहे… त्यामुळेच प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे गरजेचं आहे…ताण घेऊन ते वाया घालवायला नको…
काय वाटत तुम्हाला???
तुम्हालाही अजून काही सुचल तर नक्की सांगा…
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.