आयुष्य जेव्हा टिचकी मारून फेकून देतं तेव्हा ???
कधी कधी आपल्या सर्वांच्याच जीवनात असे प्रसंग येतात. की त्यावेळी सगळं संपलं आहे, किंवा हातात जे आहे ते निसटून जात आहे असं वाटायला लागत. त्यावेळी बहुतेकजण निराश होतात. “नियतीच्या मनात काय आहे? कळत नाही” असं म्हणून वेगळेच काहीतरी उपाय शोधत बसतात. पण उत्तर सापडत नाही.
खरेतर जिथे आपले पैसे हरवले आहेत तिथेच ते शोधायचे असतात. दुसरीकडे ते मिळत नसतात.
तसेच थोडंफार इथेही असत.
समजा आयुष्याने (म्हणजे नियतीने म्हणू हवे तर) आपल्याला खोल दरीत ढकलून द्यायचं ठरवलं असेल तर त्यावेळी गडबडून जाण्याऐवजी त्याला तोंड कस देता येईल ते पाहावं.
आपल्यात काही दोष असतीलहि, ज्यामुळे अशी परिस्थिती ओढवली असेल पण त्याचवेळी आपल्यामध्ये काही गुण देखील असतील की ? ते का विसरायचे ?
नेमके अशा दरीत पडण्याच्या वेळी ते गुण आठवायचे आणि मनाशी हिंमत बांधून लढायच.
नियतीने कितीही उंचावरून खाली दरीत ढकलायचे ठरवले तर आपल्यातला तो दुसरा गुण आपल्याला पडू देत नाही. सावरून घेतो आणि पुन्हा नव्या दमाने जीवनाला सामोरे जाण्यासाठी बळ मिळते.
आपल्या प्रत्येकामध्ये असा एक न एक गुण असेलच. फारतर फार जगण्याच्या धावपळीत त्याकडे दुर्लक्ष झालं असेल. त्या गुणांवर धूळ साठली असेल तर ती झटका. मस्त घासून पुसून तो गुण बाहेर काढा आणि त्याच्या खांद्यावर बसून मस्त पुन्हा जगण्याला सिद्ध व्हा.
आपण त्यावेळी नियतीलाच चॅलेंज देऊ कि, “तू मला ढकलून देते का ? मग मीही माझ्यातील चांगल्या काहीतरी प्लस पॉईंटच्या आधारे तरून जाईल आणि मग वय वाढलं तरी मी “तरुण”च राहील ….
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.
Mala kharach गरज होती या लेखाची खूप छान वाटले वाचून