सतत मनात घोळत राहणाऱ्या लैंगिक विचारांचं नेमकं करायचं काय?
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
हा प्रश्न मनामध्ये रौद्ररूप तेव्हाच धारण करतो जेव्हा त्याच्या सततच्या येणाऱ्या ऑटोमॅटिक विचारांमुळे किंवा कल्पनांमुळे कुठेच लक्ष एकाग्र करता येत नाही. करिअरकडे फोकस होत नाही, आवडीच्या गोष्टीत मन लागत नाही, प्रत्येक स्त्री किंवा पुरुष त्या अंगाने पाहण्याची एक निरर्थक सवय मनाला जडते, पॉर्न व्हिडिओ पाहण्याचा ओढा वाढतो, प्रचंड हस्तमैथुन करण्याची सवय जडते, वगैरे वगैरे….
या सर्वांमुळे मनाला आणि शरीराला अशी अवास्तव सवय जडते की त्याशिवाय चैनच पडत नाही. पुष्कळ व्यक्तींना तर पॉर्न व्हिडीओ पाहूनच हस्तमैथुनातून समाधान प्राप्त होते. इतकी ही सवय बिकट आणि वेगाने जडते. यातील कित्येक व्यक्ती तर यावर कंट्रोल करण्याचाही प्रयत्न करतात. परंतु स्वतःनेच निर्माण केलेल्या या अवास्तव प्रबळ इच्छा, वासना यांना जर बाहेर येताच आलं नाही तर चिडचिड तर होणारच आणि तशी स्वप्न सुद्धा पडू लागतात. काही वेळेस तर शीघ्रपतन सुद्धा घडते.
आपल्या सभोवताली जरी उत्तेजना देणाऱ्या अशा गोष्टी असल्या तरी पण मनातच अशा गोष्टींचा साठा असल्यामुळे आपण आकर्षिले जाणार. म्हणून मनातल्या विचारांवर, कल्पनांवर कंट्रोल हवा!
यासाठी काय करता येईल…..
◆ सर्वप्रथम वासना जागृत करणाऱ्या गोष्टी बंद करा.
एकूण लोकसंख्येपैकी 75 ते 80 टक्के लोक हे पॉर्न पाहतात किंवा एखादा रोमँटिक चित्रपट पाहतात. पण त्या भावनेवरचं नियंत्रण सुटल्यास हळूहळू त्याचे व्यसन जडते. म्हणून व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींनी काही दिवस व महिने अशा गोष्टींपासून दूर रहावे.
◆ विचार Divert करा.
बोलणं खूप सोपं, पण करणं कठीण. जर अशी स्थिती असेल तरीही अत्यंत संयमाने भावनांवर कंट्रोल ठेवून तुम्हाला तुमचा थॉट प्रोसेस बदलायचा आहे. जितका संयमीपणा दाखवाल तितकं किंवा त्यापेक्षा अधिक यातनं बाहेर पडण्याची शक्यता वाढेल.
◆ आवडीनिवडी, करिअरकडे लक्ष एकाग्र करा.
काय करायचं नाहीये, याबरोबरच काय करायचं आहे हे सुद्धा तुमच्या हातात असलं पाहिजे. जरी तुम्ही आवडीनिवडी जोपासता, करिअरकडे तुमचा फोकस आहे, पण सततच्या अशा लैंगिक विचारांमुळे जितकं तुमचं लक्ष तुमच्या करियर व आवडीनिवडी कडे असायला हवं तितकं ते नसणार. म्हणून जास्तीत जास्त करिअरकडे कशी एकाग्रता वाढवता येईल याचे आडाखे तयार करा.
◆ घरातल्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या.
तुमचं घरातलं अस्तित्व ओळखा. आणखीन त्यात काही पोसिटीव्ह भर कशी घालता येईल, याचं वैचारिक वर्तुळ सुरू करा. कुटुंबाचे भविष्यात येणारे आव्हाने लक्षात घ्या. त्याची पूर्व तयारी सुरू करा.
◆ मोबाईलचा वापर तुमच्यातले कलागुण वाढीसाठी करा.
मोबाईल मधली सर्व निरर्थक हिस्ट्री काढून टाका. तुमच्या वैचारिकतेला जोडणाऱ्या लोकांना फॉलो करा. प्रेरणादायी लेख वाचा, व्हिडीओ बघा. तसेच ते दैनंदिन जीवनात कसं अमलात आणता येईल याबद्दल स्वतःच आव्हान स्वीकारा.
◆ लैंगिकतेचं शास्त्र समजून घ्या.
शास्त्राच्या आधारावर लैंगिकतेबद्दल आत्तापर्यंत लिहिले गेलेले साहित्य वाचा, लेख वाचा. तुमच्या मनात असणाऱ्या चुकीच्या समजुती काढून टाकण्यात वाचन अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल.
————————-
वरील अशा गोष्टीत सातत्य ठेवल्याने तुम्ही या कचाट्यातून बाहेर येत आहात हे तुमच्या लक्षात यायला लागेल. तसेच लैंगिकतेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलेल फक्त सातत्य हवं आणि शास्त्र सुद्धा हेच सांगतं.
हा लेख वाचून लगेचच अमुलाग्र बदल होईल अशा भ्रमात राहू नका. हा लेख केवळ तुमच्या बेरंग मेंदूला रंग सापडण्यासाठी लिहिला गेला आहे.
आणि जर रंग सापडला असेल तर उत्तमच!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.
Ha lekh khup chhan aahe.
माझं तेच झालं आहे.पण आता मी त्यावर नक्की नियंत्रण करणार
पटलं सर
Chhan lekh sir
अंतर्मुख करणारा…
विचार करायला लावणारा.
khup chaglaa ahe