मास्क कोणी वापरावा? त्याने खरंच आपण सुरक्षित असतो का?
मास्क कोणी वापरावा?? कींवा मास्क घातल्यामुळे नक्की कशामुळे संरक्षण होत?? तो कुठे वापरावा??त्याची विल्हेवाट कशी लावावी..? हे मला वाटत मेडीकल शी संबधित लोक सोडले तर 90% लोकांना माहीत नसेल…राजकीय पुढारी तर मला वाटतय की पुढच्या निवडणुकीची तयारी म्हणुन लाईमलाईट मध्ये राहयचय म्हणुन मी एवढे हजार मास्क वाटले ..त्याची कींमत एवढी होती..हे गावभर सांगत सुटतायत…मास्क वापरणाऱ्यांच्याही भारीच तऱ्हा पाहायला मिळत आहेत…विशेष म्हणजे यानिमित्ताने अनेक फॅन्सी मास्कही पाहायला मिळत आहेत…आपण वापरत असलेल्या मास्कने खरंच कोरोना विषाणूपासूुन संरक्षण होणार आहे का? याविषय़ी नागरिक पुर्णपणे अनभिज्ञ आहेत..
सध्या वापरात असणारे मास्कचे प्रकार आणि उपयुक्तता
★ रुमाल
आपण भारतीय मास्क म्हणून रुमालाचाच सर्रास वापर करतो…त्यातही सफेद रंगाचा रुमाल वापरल्यास रोगापासून आपण दूर राहतो अस लोकांना वाटत(ह्यामगच लाँजिक काय ते मला अजुन कळत नाहीये..डाँक्टर पांढरे कपडे घालतात..म्हणुन पाढंरा रंग आरोग्यदायी अस तर वाटत नसेल) खरं तर हा रुमाल आपण हात पुसुन..तोंड पुसुन मग विषाणूपासून संरक्षणासाठी थेट तोंडावर बांधतो आणि एकप्रकारे विषाणूंना मोकळी वाट करुन देतोय…मास्क म्हणून रुमालाचा वापर करण्यापेक्षा तो न वापरलेलाच अधिक बरा…
★ फॅन्सी मास्क
या मास्कमुळे विषाणूंपासून सुरक्षित राहण्यापेक्षा धोका अधिक आहे…असे मास्क मेडीकल मधून न घेता रोडसाईड मार्केटमधून घेतलेले असतात..हे लोक सर्रास फँशन म्हणुन वापरतात..हे मास्क आपण बरेच दिवस वापरतो जे फारच घातक आहे…बऱ्याच वेळा मास्कला काढून घालून आपण रोगाला नकळत आमंत्रण देत असतो…त्यामुळे असे मास्क वापरणे टाळले पाहिजेत..
★ सर्जिकल मास्क
या प्रकारचं मास्क रुग्णालयातील डॉक्टर..नर्स आणि रुग्ण वापरतात…हे मास्क आतल्या आणि बाहेरच्या सर्व विषाणूंपासून संरक्षण करतात.. परंतु हे मास्क ३ ते ८ तासांहून अधिक काळ वापरणे योग्य नसते…मात्र, आपण या मास्कचा चा सर्रासपणे २-३ दिवस तरी वापर करतो…त्यामुळे या मास्कची योग्यवेळी योग्यपद्धतीने विल्हेवाट लावणं आवश्यक आहे…
★ N95 मास्क
या प्रकारचे मास्क कोरोना विषाणूंपासून बचावासाठी उपयुक्त असतात..याच कारण म्हणजे हे मास्क नाक आणि तोंड पुर्णपणे झाकून घेतात.. तसेच अती लहान विषाणूंच्या कणांनाही म्हणजेच हवेतील ९५ % कणांना रोखण्यासाठी हे सक्षम असतात..म्हणूच या मास्कला N-95 म्हटलं जात…परंतू कोरोनाचे विषाणू ०.१२ माइक्रॉन इतके लहान असल्याने या मास्कलाही काही मर्यादा आहेत…
★ गॅस मास्क
या प्रकारचे मास्क हे कोणत्याही विषाणू कणांपासून तुमचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे…गॅस लीकेज सारख्या गंभीर परिस्थितीत हे मास्क वापरले जातात.. हे मास्क तुम्हीही नक्कीच वापरु शकता पण एकतर हे महाग असतात..व ते सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.
आरोग्य खात्याकडुन स्पष्टपणे जाहीर करण्यात आलय की….(माझ्या मनाचं काही नाही ह्या मध्ये?)
मास्क कोणी वापरावा..
सर्दी..खोकला..ताप आणि श्वास घेण्यात अडथळा असणाऱ्या व्यक्तींनी..
कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांनी..
संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत असलेल्यांनी..
श्वसनाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची काळजी घेणाऱ्या नर्स..डॉक्टरांनी..
मास्क कसं वापरावा..
मास्क दर सहा तासांनी बदलावं..
मास्क लावल्यानंतर त्याला हात लावू नये..
मास्क काढताना बाहेरील बाजूला स्पर्श करू नये..
मास्क गळ्याभोवती लटकवून ठेवू नये..
मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ धूवून घ्यावे..
मास्कची विल्हेवाट कशी लावावी?
सर्जिकल मास्क वापरल्यानंतर त्यावर जंतुनाशक फवारणी करावी..
त्यानंतर पिशवीत गुंडाळून कचऱ्याच्या बंद डब्यात फेकावे…
कपडा किंवा रुमालाचा मास्क असल्यास गरम पाण्याने स्वच्छ धुऊन कडक उन्हात वाळत घालावेत..
घरातील इतर कपडय़ात हा मास्क धुण्यात टाकू नयेत.
मास्क घालताना काय काळजी घ्याल?
मास्कमुळे तुमचं नाक.. तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकली गेलं पाहिजे…
मास्क चेहऱ्यावर घट्ट बसला पाहिजे…
मास्क घालताना किंवा काढताना पृष्ठभागाला हात लावू नका…यापूर्वी आणि नंतरही हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत..
मास्क घातल्यानंतर खोकताना किंवा बोलताना मास्क खाली करू नये. यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असते..
एकदाच वापरायचे (युज अॅण्ड थ्रो) मास्क एकदाच वापरून पुन्हा वापरू नयेत..
साधे कापडी मास्क स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नयेत. हे मास्क वापरल्यानंतर गरम पाण्यात धुऊन पुन्हा वापरले तरी चालेल..
ही माहीती कीती जणांना आहे? 90% लोकांना माहीत नसणार..भारतात ज्ञानापेक्षा अज्ञानाचीच जास्त प्रसिद्धी केली जाते…मग ते अज्ञान बघता बघता फँशन बनुन जाते..एखादी गोष्ट कशी वापरावी..कींवा करावी..त्यापेक्षा बाजुची कींवा समोरची व्यक्ती ते करतेय हे बघुन ती गोष्ट 80% लोक वापरतात..कींवा करतात..पण ह्यामागे काय लाँजिक आहे??एखादी गोष्ट केल्यामुळे काय फायदे होतात..कींवा काय नुकसान होत..ह्याचा पत्ताच कोणाला नसतो..वाचन नाही.. अभ्यास नाही..
एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या तालावर नाचुन मास्क वाटप करण ..हा तद्दन मुर्खपणा आहे..राज्याच्या अनेक भागात आपत्कालीन सेवेतील नागरिकांना रस्त्यात अडवून मास्क घालण्याची सक्ती पोलिसांनी केल्याच्या तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त झाल्या आहेत…मास्क कोणी वापरावा या बाबतचे स्पष्ट नियम घालून दिले आहेत…या शिवाय इतर सामान्य नागरिकांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही… त्यामुळे मास्क घालण्याबाबत अशी सक्ती कोणीही करु नये..असे आवाहन करण्यात येत आहे..तरीपण पोलीस..सरकारचे लोक कुठेही अडउन मास्क घातलाच पाहीजे ह्याची जबरदस्ती करतायत…
महत्वाची गोष्ट म्हणजे…महानगरपालिकेने अद्यापही मास्क संकलन केंद्र सुरू केले नाही..यामुळे वापरलेले मास्क रस्त्यावर फेकले जात आहेत..यामुळे संसर्ग वाढण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे…मास्क संकलन केंद्र असा काही प्रकार असतो हेच 99% लोकांना माहीत नसेल..मी परत एकदा सांगतोय..सगळ्यांनाच मास्क लावण्याची गरज नाही…फक्त दोन प्रकारच्या लोकांनी हे मास्क वापरणे गरजेचे आहे.. पहिली व्यक्ती म्हणजे ज्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे…अशा व्यक्तीने मास्क वापरावा…तसेच कोरोना विषाणू बाधित झालेल्या व्यक्ती जर जवळपास असेल तरच मास्क वापरावा..सामान्य माणसांनी मास्क वापरू नये ह्याच महत्वाच कारण..आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण शुद्ध हवा आत घेतो आणि वाईट श्वास बाहेर सोडतो… मास्क लावल्यामुळे आपण पुन्हा वाईट श्वास परत परत घेतो.म्हणून सामान्य माणसांनी मास्क लावण्याची गरज अजिबात नाही..सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनावश्यक गोष्टी सकाळी 8 ते 11 ह्या वेळेमध्ये गर्दी न करता खरेदी करु शकता…लोक एवढे अडाणी आहेत की गर्दी तर करतातच..पण त्यांना अस वाटतय की मास्क लावला आणि गर्दी केली कींवा गर्दीमध्ये मिसळल तर आपल्याला काही होत नाही..
कोरोना बाधित व्यक्ती कींवा अजुन कुठला जंतुसंसर्ग झालेली व्यक्ती तुमच्या समोर खोकली..कींवा शिंकली तर तुमचा मास्क योग्य क्वाँलिटीचा असला तर तो तुमच तोंड व नाक ह्याच विषाणुपासुन संरक्षण करु शकतो…पण तुमचे डोळे व तुमचे कपडे ह्यावर विषाणु फवारले जातात त्याच काय?? तुम्हाला वाटत तुम्ही मास्क घातल्यामुळे सुरक्षित झालात पण तस अजिबात नाहीये..तुम्ही घरी आलात की बाहेरचे कपडे काढुन ठेवतात..त्याबरोबर बाकीच्या फँमिली मेंबर चे पण कपडे असतात..मग विषाणुचा प्रसार तुमच्या कपड्यांमधुन दुसऱ्या माणसाला होतो..सावधगिरी बाळगायची म्हणजे काही मोठ काही करायची गरज नाही..घरातील जो माणुस बाहेर गेला असेल त्याने घरात आल्यावर लगेच स्वच्छ आंघोळ करावी व घातलेले कपडे डीटर्जंट मध्ये भिजत घालुन शक्य असल्यास गरम पाण्याने स्वच्छ धुउन उन्हात सुकत घालावेत..पण होत काय..की आपण न्युज चँनेल च्या आहारी जाउन व्हाट्सअप वर आलेल्या मेसेज च ऐकुन अति काही करतो…
ज्ञान पसरवा…व अज्ञान लोकांना सांगा.. आपल्या कृतीतुन..
( मी काही डाँक्टर नाही..व मेडीकल क्षेत्राशी माझा संबध नाही..
मी जे वाचल..पाहील..अनुभवल..त्यावरुन वरील लेख लिहीलाय..ते कदाचित चुकीच कींवा थोड अर्धवट असु शकत..जाणकारांनी योग्य मार्गदर्शन कराव..तुम्हाला काही शंका असतील..तर तुमचा ओळखीचा कोण डाँक्टर असेल कींवा मेडीकल शी संबधित कोणी असेल तर त्याला विचारुन खात्री करुन घेउ शकता..माझी निकोप चर्चेला तयारी आहे..)
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.
मास्क वरील माझे मत या लेखात तंतोतंत जुळते, त्या मुळे माझी मत काही चुकीची नाहीत याला दुजोरा मिळाला, आभारी आहे. तरीही अजुन काही डिटेल्स मधे माहिती मिळाली तर शेअर करा. ?