निलेश काळे
या पेन्शन नेच वाटोळे केलंय !
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
हेडलाईन वाचून जरा धक्का लागला ?
पण हे खरं आहे .
सरकारने वृध्दत्वात कोणावरही अवलंबून रहायला नको म्हणून , ही सोय केली आहे .
यामुळे , स्वाभिमानाने जिवन जगता येते .
पण झालंय काय माहितीये ?
बऱ्याच कुटूंबांमध्ये … आईची आणि वडिलांची पेन्शन येत असते , पैशाचा प्रवाह असतो .
घर झालेलं असतं , बहिणीचं लग्न झालेलं असतं
जिम्मे दाऱ्या संपलेल्या असतात .
पोरगा “ट्राय ” करत असतो ,
हा जो ट्राय असतो , तो तितक्याशा जोमाने होत नाही .
कारण ??
आपण कमावलं किंवा नाही कमावलं तरी काही अडत नाही , ही मानसिकता .
मी माझ्या सभोवती किमान पंधरा कुटूंबे अशी बघतली किंवा सध्या पण बघतो ,
कि या घरात … अशी भैताडं पडलेली आहेत !
निर्लज्ज , आळशी , व्यसनी .. आणि काहीही करू न वाटणारी .
का काही करू वाटत नाही यांना ??
यांच्या बुडावर फटके दिले पाहिजेत ,
आणि पोटाला चटके दिले पाहिजेत .
कशी अक्कल ठिकाणावर येत नाही ? बघुया तच .
माय बापांनी किती दिवस पोसायचे यांना ?.
बरं यांना तर पोसाच ,
यांची बायको , लेकरं यांना पण या म्हताऱ्यांनीच जगवायचं ?
अरे लाज वाटू दया , अशी जिंदगी जगू कशी वाटते ?
फुकटची भाकरी गिळते तरी कशी ?
शरीराच्या आत आत्मा शिल्लक असेल तर जागवा त्यास
डोकं शाबूत आहे ना खांद्यावर ?
हात पाय दिलेत देवाने ,
मग वापरा …
धंदा करा , नोकरी करा , हमाली करा
काय करायचं ते करा ,
पण या ज्येष्ठांचा जीव मोकळा करा ,
त्यांना मरायचंच आहे , पण त्या अगोदर जगू तरी दया !
असा कोणी असेल तुमच्या नजरेत , त्याला फॉरवर्ड करा.
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.