Skip to content

आपल्यातला खोटारडेपणा असा पळवून लावा!!

आपल्यातला खोटारडेपणा असा पळवून लावा!!


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


अनेक प्रसंगात परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी आपल्यापैकी अनेकांना खोटं बोलावं लागतं. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ज्यांच्यासमोर आपण खोटं बोललो होतो, त्यांच्यासमोर अगदी दिलदारपणे आपण कबुली देतो आणि समोरची व्यक्तीही अगदी मोकळ्या मनाने घडलेला प्रकार समजून घेऊन आपल्या वागणुकीचा स्वीकार करते. म्हणजे काही प्रसंगात खोटं बोलणं ही एक चांगली बाब आहे. त्याशिवाय तो मुद्दा घेऊन पुढे सरकताच येत नाही.

या विपरीत असे पुष्कळ प्रसंग असतात, ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की इथे माझा स्वीकार होणार नाही.अशा ठिकाणी प्रचंड खोटं बोललं जातं आणि ते लपवलंही जातं. जेव्हा लपवलेलं उघडकीस येतं तेव्हा खरं बोलून किंवा स्पष्ट बोलून जितकी परिस्थिती हाताबाहेर जाणार होती, त्याच्या चौपटीने परिस्थिती नियंत्रणात राहत नाही.

इथूनच मग प्रक्रिया सुरू होते, सतत खोटे बोलण्याची आणि ते खोटे उघडकीस येऊ नये यासाठी पूर्ण ऊर्जा तिथे वाया जाते.

यातून आपलं पूर्ण behavior pattern च बदलतं. कारण मनासारखी गोष्ट होण्यासाठी खोटे बोलणे किती गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे याकडे पोसिटीव्ह अंगाने आपण बघतो. त्यामुळे आपण दिशाहीन होतो, मनाचं नियंत्रण सुटतं, वास्तवाचं भान राहत नाही, चुकीच्या निरर्थक व अवास्तव गोष्टींकडे ओढले जातो.

मग यावर कारायचं काय?

◆ परिस्थितीवर नियंत्रण मिळवा.

हाताबाहेर जाणाऱ्या स्थितीत खोटं बोलून उघडकीस येऊ नये म्हणून नंतर वेळ आणि उर्जा वाया घालवण्यापेक्षा हाताबाहेरची परिस्थिती हाताशी धरा आणि स्पष्ट मुक्तपणे बोलणं केव्हाही उत्तम. असे सतत केल्याने स्वतःविषयी एक नवीन जागा इतरांच्या मनात निर्माण होईल.

◆ नेमकं खोटं का बोलायचंय? मूळ कारण शोधा.

पूर्ण परिस्थिती हाताबाहेर आहे की त्या परिस्थितीतील एक अमुक अमुक व्यक्ती हे शोधता आलं पाहिजे. जर तसंच असेल तर जिथे शक्यता आहे त्या व्यक्तींना खरं सांगून टाका. पूर्ण परिस्थितीशी खोटं बोलू नका.

◆ इतर अपरिचित मोठ्या व्यक्तींशी मुक्तपणे बोला.

मित्रमंडळी, नातेवाईक यांमध्ये एखाद्या मोठ्या अनुभवी व्यक्तींकडे तुमचं बोलणं समोर ठेवा. काही गोष्टींचे बारकावे समजतील. तसेच आपल्याच मनात घरातल्या व्यक्तींबद्दल एक न्यूनगंड असतो की मी खरं बोलू शकणार नाही, त्यात सुधारणा होईल.

◆ जे हवंय ते पूर्णतः मिळेलच या भ्रमात राहू नका.

जे काही हाती लागलंय त्यात समाधान माना. उर्वरित सुद्धा मिळायला हवं यासाठी काही तरी भावनिक आधार घेऊन खोटं बोलून वातावरण बिघडवू नका. कारण जबाबदार व प्रमुख व्यक्ती खोटं बोलत असेल तर मग घरातल्या इतर व्यक्तीही त्यावर reaction म्हणून खोटं बोलतील.

◆ तुमचं खोटं बोलणं निर्मळ आणि स्वच्छ असावं.

सतत खरं बोलणं सुद्धा मानसिकरीत्या हानिकारक आहे. असं असलं तरी सुद्धा खोटेपणाला लगाम हवीच. तुम्ही काहीतरी लपवलं होतं हे मिळाल्यानंतर किंवा स्थिती सामान्य झाल्यानंतर स्वतःहून इतरांना कळवा. तुम्हाला असं का करावं लागलं यावर भर द्या. तेही नम्रपणे.

◆ इतर बोलतात, मग मी ही खोटं बोलेन.

एखाद्या प्रसंगात नेमकं काय करावं, हे कळत नसल्याने जेव्हा आपण संबंधितांचा सल्ला घेतो तेव्हा आपल्या कानी पडतं की, खोटं बोलून मी ती परिस्थिती हाताळली होती. अशावेळी तो एकच पर्याय आहे असं गृहीत धरू नका. तुमच्या मित्राला दुसरा पर्याय विचारा. कदाचित तुमच्या प्रश्नाने तो त्याचा संपूर्ण अनुभव तुमच्यासमोर ठेवेल.

◆ स्वतःशी खोटं बोलू नका.

राग आला, त्याचा स्वीकार करा. समस्या आहे, त्याचाही स्वीकार करा. तेथे स्वतःची खोटं बोलू नका. आपल्यापैकी पुष्कळ लोकं एका भावनेशी चिकटलेली असतात. त्यातनं चुकांचा स्वीकार करण्याचाही दिलदारपणा आपण दाखवत नाही. मुळात माझी सुद्धा चूक असू शकते ही मानसिकता ठेवणंच त्यांना जड जातं. मग दुरावलेल्या माणसांचा सामना करण्याची त्यांच्यावर वेळ येते.

थोडक्यात,

काही प्रसंगात जर मुद्दा पुढे जात नसेल किंवा आयुष्य थांबलंय असं वाटत असेल तर हाताशी असलेल्या लोकांना खरं सांगून टाका आणि हाताबाहेर असलेल्यांना गृहीत धरूनच पुढे चला.

कारण काहीतरी चांगलं घडण्यासाठी पुढे जाणं महत्वाचं असतं.

आणि पुढे जाण्यासाठी सतत खोटं बोलणं याचीही आवश्यकता नाही.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!