Skip to content

मन मारून जगणाऱ्यांसाठी हा विशेष ब्लॉग!!

आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं


एका माणसाकडे 100 उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी’ एक रखवालदार होता. काही कारणामुळे त्याचा हा रखवालदार नोकरी सोडून गेला. त्याच्या जागी त्याने एका दुसर्‍या माणसाची नेमणुक केली.

दुसर्‍या माणसाला त्याने एक अट घातली, की रात्री त्याने पहार्‍यावर असताना सगळे उंट झोपल्याशिवाय झोपायचं नाही. एक जरी उंट जागा असेल तरी झोपायचं नाही. नोकरीची गरज असल्याने त्याने ही अट मान्य केली.

दोन दिवस, तीन दिवस त्याला झोप मिळाली नाही. तो प्रामाणिकपणे आपले काम करत राहिला. मात्र 15/20 दिवस तो झोपू शकला नाही, कारण सर्व उंट एकदम कधीच झोपत नसत.

एके दिवशी मात्र त्याचे नशीब फळफळले. 100 पैकी 99 उंट झोपले. हा शेवटचा उंट झोपण्याची वाट पाहू लागला. मात्र तो काही झोपेना. म्हणून बर्‍याच वेळाने त्याने त्या उंटाला झोपवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या गळ्याला मिठी मारुन त्याला झोपवायचा प्रयत्न केला. मात्र झालं भलतंच.. त्याच्या या प्रयत्नात त्याच्या गळ्यातली घंटी वाजून बाकीचे उंट जागे झाले आणि याला जागावे लागले.

वैतागून तो पहिल्या रखवालदाराचा सल्ला घ्यायला गेला आणि विचारले, “एवढी वर्षं तू कसा काय न झोपता राहिलास? कारण सगळे उंट काही एकदम झोपत नाहीत.”

त्यावर तो म्हणाला “मी कधीच सगळे उंट झोपायची वाट पाहिली नाही. माझ्या वेळेत मी झोपत होतो. कारण सर्व एकावेळी झोपणे हे अशक्य आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे…..!!!!!!!!”

Moral of the story…
मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात बर्‍याचदा असे ठरवतो, कि आता हा एक टप्पा पूर्ण केला कि मग संपलं सगळं, मग मला काही करायची गरज नाही किंवा हे काम पूर्ण झाले, की मी निवांत; मला कुठलीही काळजी नाही; मग मी आनंदात जगेन. हा प्रोजेक्ट किंवा हे उरकलं, कि मी जीवनाचा आनंद घ्यायला मोकळा..

त्यासाठी आपण आपले आत्ताचे सुख सोडून देतो, एखादी सुखावणारी गोष्ट करणे लांबणीवर टाकतो. पुन्हा काही काळजी नाही आता निवांत झालो, असं म्हणून श्वास सोडतो; पण त्याचवेळी दुसरे काहीतरी समोर उभे राहते अन् पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु राहते पुढच्या आशेवर. पण हे संपत नाही आणि मनासारखे जगणे होत नाही.

आपल्या कामांच्या आणि अपेक्षांचे, चिंतांचे उंट कधीही एकावेळी झोपणार नाहीत, एखादा जागा राहणार आहेच, त्याला झोपवायच्या नादात बाकीचे जागे करु नका, त्याकडे “थोडसं” दुर्लक्ष करा, आणि आयुष्य उपभोगा!!! आपल्या चिंता आणि आपली कामे सर्व कधीच न संपणारी आहेत तेंव्हा चिंतामुक्त व्हा आणि मोकळेपणे जगा. मन मारुन जगू नका!!!
जीवनाचा आनंद घ्या !!!!

“जिंदगी ना मिलेगी दोबारा” चित्रपटात कतरिना हृतिक ला त्याचे प्लॅन विचारते. वयाच्या पंचेचाळीशीनंतर मी कामधंदा बंद करुन माझे छंद जोपासणार असं तो सांगतो. त्यावेळी ती म्हणते, “45 वर्षांपर्यंत तू जगशील याची खात्री काय?” आणि आवाक् झालेले ते मित्र आयुष्य खर्‍या अर्थाने जगायला सुरुवात करतात.

तसं आपल आयुष्य होतंय का? नंतर करु असं म्हणत टाळत असलेल्या गोष्टी करायला पुढे पुरेसा वेळ आणि तो उत्साह शिल्लक राहील का, हे तरी आपल्याला माहीत आहे का? याचाही विचार होणं गरजेचं आहे.
बघा विचार करा !!
कारण ..

जिंदगी ना मिलेगी दोबारा….
आभार स्पंदन टीम



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

1 thought on “मन मारून जगणाऱ्यांसाठी हा विशेष ब्लॉग!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!