Skip to content

जी व्यक्ती भूतकाळात रमते, तिचे अस्तित्व नाहीसे होते!

भूतकाळात फारकाळ रुतला, त्याचा कार्यभाग बुडाला… !


मोहन पाटील


या उक्ती प्रमाणे,

भूतकाळातून बोध घेत,भविष्याचा वेध घेत,वर्तमान मनमुराद जगायचा असतो.

आयुष्याच्या विविध टप्प्यांवर, अनेकविध संधी आपण केवळ भीती आणि लाजे खातर,हातच्या गमावलेल्या असतात, ज्याचं शल्य मनाला, वयाच्या उत्तरार्धात कोसत राहतं.

जे आपल्या कडून घडू शकलं नाही,किंवा,चुकीचं घडलं, अशा शोककारक,दुःखदायक, क्लेशकारक स्मृतींचं ओझं,शिरावर वाहायचं नसतं, जे आत्मानंद हिराऊ शकतं. हाती असलेल्या वर्तमानाचं (आजचं) सोनं करणं तेवढं आपल्या हाती असतं.

वयाच्या पन्नाशीत विचारांत बऱ्यापैकी परिपक्वता आलेली असते, त्यामुळे आयुष्यात न जमलेल्या अनेकविध गोष्टी, छंद साठीनंतर देखील पूर्ण करता येतात, इतकेच नव्हे तर वृद्धापकाळ हा नवनव्या गोष्टी शिकण्याचा,छंदपूर्तीचा एकप्रकारे सुवर्णकाळच समजायला हवा.

आयुष्यातील अनेक गैरसमजांचं, दुःखाचं मूळ हे भूतकाळात असतं. गतकाळात घडलेले सर्व बरेवाईट प्रसंग, हा जीवनाचा एक अविभाज्य भाग समजून त्यांकडे,तटस्थतेने, आणि उदात्त दृष्टिकोनातून पाहिल्यास,त्याचं शल्य,बोच,वैषम्य मनाला वाटेनासं होतं.

वयापरत्वे माणूस विचारांनी परिपक्व होत जातो,अनुभवसंपन्न होत असतो. किशोरावस्थेतील आपलेच विचार आपल्याला तारुण्यात हास्यास्पद वाटतात, तारुण्यातील चंचल, अपरिपक्व विचार प्रौढावस्थेत अपरिपक्व वाटू लागतात.हा दोष आपला नसतो, वयाचा असतो. म्हणूनच आपण गतस्मृतींकडे तटस्थपणे, परिपक्वतेने पहायला हवे.काही कटु स्मृतींतून मुक्त होण्या करितां, क्षमाशीलते सारखा दुसरा उपाय नसतो.

भूतकाळातील कटु-गोड अनुभव, आठवणी या वर्तमान जगताना,दीपस्तंभा सारख्या मार्गदर्शक ठरतात, मात्र भुतकाळात रुतून बसल्यास,पूर्वग्रहदूषितभाव वाढीस लागून, नकारात्मकता येते, जी सर्वांगीण विकासास मारक ठरते. त्यामुळे भूतकाळ हा संदर्भा करितां लक्षांत असावा.

आयुष्य जसजसे पुढे सरकते, तसतसे आपले विचार,धारणा, ज्ञान,परिपक्व होते,आपले कौशल्य,अनुभव समृद्ध होत जातात, कोणत्याही घटनेकडे आणि एकंदरीत जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विस्तारतो,प्रगल्भ होत जातो.

भूतकाळात वाट्याला आलेल्या चुका,दुःखद घटना, वेदना आपल्या गुरू असतात, त्या परिपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्याचे धडे देतात. मनातील पूर्वग्रहदूषितभाव पुसून टाकल्या वरच,मन रिक्त होते,स्थितप्रज्ञ होते आणि उर्वरित जीवनाचा,वर्तमानाचा,आणि भविष्याचा आनंद घेण्यास सिद्ध होते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!