
केवळ शरीराने नवर्याची..
शिवानी गोखले
एकाच पुरूषाची असलेली बायको मनाने जेव्हा अनेक पुरूषांची होते ना… त्याला म्हणतात पुरूषाचे संसारातले अपयश..!
छोट्या छोट्या क्षणात रमणार्या बायकोला जेव्हा नवरा त्या त्या क्षणातला आनंद नाकारतो ना… तिथे पडते पहिली ठिणगी..!
सणांची तयारी, मुलांचा अभ्यास, आजारपण, अगदी सहज बाजारात मारायची फेरी यातल्या सहवासाचे सुख जो नवरा नाकारतो ना…. त्याला कळतच नाही बिचार्याला काय निसटून चाललय हातातून… हो बिचारा नवरा…नुसते घरात पैसे फेकले की संपलं कर्तव्य, असल्या भ्रमात असणारा.. .. बायको नाही बिचारी. कशी असेल. जी रणरागिणी एकटी संसाराचे शिवधनुष्य पेलते, ती बिचारी कशी असेल, नाही का ? आणि मग सगळं एकटीने निभावून, तिला आवडायला लागला तो एकटेपणा तर… ? किंवा कंटाळली एकटेपणाला आणि गेली ओढली दुसर्याकडे तर… ?
तरी यात बायकोच्या अपूर्ण शारीरिक गरजा, तिच्या छंदांची केलेली चेष्टा, तिचं एकूणच, सगळच किती निरर्थक आहे हे सांगायची धडपड… हे ज्वालामुखी मुद्दे छेडत नाहिये.. त्यावर पून्हा कधीतरी..
तूर्तास छोट्या छोट्या आनंदात बायकोला सहवास नाकारणाऱ्या नवर्यांना इशारा… Change your attitude तिने हाच आनंद बाहेर कोणाशी share केला तर आग लागेल बूडाखाली… बायको बदलते आहे. Beware..
इतक्यात अलिकडे खूप बघितली, ऐकली अशी खदखद बायकांची… मैत्रिणी, नात्यात, परिचयात… अनेकजणींची घुसमट जाणवली आणि लिहायला प्रवृत्त झाले. …मैत्रिणींनो तुमची घुसमट मांडल्ये… गैरसमज नसावा.
(प्रामाणिक संसार करणाऱ्या नवर्यांनी हे मनाला लावून घेऊ नये.)
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.


अर्धवट लेख आहे, कदाचित स्वानुभवातून लिहीला असावा….वाचण्यापुरता विरगुंळ छान
Very nice
Very true
अजून कमी आहे.
I am unsatisfied
हो अगदी बरोबर आहे ह्या अशा . गोष्टी होतात
eka stri ne fkt stri chi baju mandli..ani vishay konta???sharirik ani manskik sukh….hech jar stri ne purushsla nahi dile..tar purush pan dusrya baikde aakarshit hou shakto….mala tar hichi jara shanka ch yetey….je kuni hiche husband astil tyani jara hyanchyavar laksh theva?????
Kharach khup sundar lihale aahe. Ticha aadhar asnara Navra jevha tichya vatanicha vel tila det nahi , tevha to vel ti other person barobar share karte . Mag matra te navrya la sahan hot nahi
खुप छान व्यक्त केले आहे. वास्तव स्विकारले जाणं कठीण आहे. पण जे आहे ते बदलत नाही.
Khup chan
छान
In this article only think and taken side woman
Sansar aani baykanchya apekshya purn krta yavyat mhnunch khi navryana tyanchya baykana time deta nhi yet he tyaveli baykani pn smjun ghen khup garjech ast
आणि ज्या स्त्रीया नवऱ्याच्या ऐश्वर्याचा वापर करून त्याला द्यायचे ते प्रेम दुसऱ्याला किंवा अनेकांना देतात अशा स्त्रियाना काय म्हणाल मग
Kharrach Khupach vastavavadi lekh ahe Krn pratyek strichi sahan karaychi limit aste n limit cross zhali ki tila manasik adharachi garaj aste nahitr sarv pidit striyanchi sahanshilata khup naste mg kahijani depression madhe jatat