Skip to content

थोडं लहान होऊन मुलांचा ‘Time Please’ गेम खेळूया!!

टाईम प्लिज


सीमा गाडे महाळुंगकर


रेवती आणि विशाल जोरजोरात भांडत होते, रेवतीला मोठ्या आवाजात अंगावर ओरडलेलं अजिबात आवडत नव्हतं, पण नेमकं विशाल तेच करायचा.

छोट्या छोट्या गोष्टीवरून तिच्यावर खेकसायचा. लग्नाला अवघी दोनचं वर्ष झालीत तरी हा एवढा कसाकाय बदलू शकतो, किती हा तापटपणा, मग रेवतीही खूप तापायची.

खिडकीतून सहज बाहेर पाहिलं तर मुलं खेळत होती आणि चिडलेला टिल्लू , पाच मिनिट टाईम प्लिज! म्हणून शेजारच्या बाकावर बसला होता. मग सगळे शांतपणे त्याच्या येण्याची वाट पहात बसले होते.

अगं, मच्छर मारायची बॅट कुठे ठेवली, एक गोष्ट पटकन सापडत नाही म्हणत विशाल पुन्हा सुरू झाला, काही नीट जागेवर ठेवलेलं नसतं म्हणत रेवतीला ऐकवू लागला.

रेवती पटकन म्हणाली, विशाल…..टाईम प्लिज!

विशाल तिच्याकडे पहातच राहिला. आपण थोड्यावेळाने बोलू म्हणून ती तिथून निघून गेली.

शेजारीच ठेवलेली बॅट रेवती गेल्यावर विशालला दिसली आणि त्याला पण जाणवलं आपण हिला छोट्या छोट्या गोष्टी वरून ओरडत असतो.

विशाल घरभर पसारा करून ठेवायचा, रेवती तापली की मग विशाल सुद्धा टाईम प्लिज म्हणून वेळ घ्यायला लागला आणि मग पटकन अस्थाव्यस्थ पडलेले पेपर्स, फाईल्, टॉवेल, सॉक्स सगळं पटकन जागेवर व्यवस्थित ठेवून द्यायचा.

हळूहळू हा लहानांचा गेम रेवती आणि विशाल सोबत घरातील इतर लोकही इम्प्लिमेंट करू लागले आणि आपोआप एकमेकांमधली भांडणं कमी झाली. जास्तच एखादं भांडण तानलं गेलं तर दोघांपैकी कोणीतरी छान असं एखादं गिफ्ट द्यायचं आणि मागचं सारं विसरून जायचं हेही त्यांनी आता ठरवूनच टाकलं.

बऱ्याचदा जास्त वेळ संपर्कात राहिल्यावर आपण एकमेकांना गृहीत धरायला लागतो आणि मग एखादी गोष्ट पटली नाही की एकमेकांना शिव्या घालायला ही कमी करत नाही. जेव्हा एखादं नातं एवढं ताणल जात तेव्हा समजावं तुटण्याआधी टाईम प्लिज म्हणायची गरज आहे.

लहान मुलांसारखं टाईम प्लिज म्हणून थोडा वेळ शांत रहायला हवं, स्वतःला आणि स्वतः बरोबरच इतरांनाही समजून घ्यायला वेळ द्यायला हवा. शांत डोकं असेल तर बरच काही चांगलं सुचतं.

कुठलंही नातं घ्या, नवरा-बायको, बहिण-भाऊ, मुलगा-वडील, शेजारी असुद्यात कोणासाठीही हा डायलॉग परफेक्ट आहे. टाईम प्लिज म्हणण्यात कसलाच कमीपणा वाटणार नाही आणि काही वाटतंच असेल तर कधीतरी लहाण मुलांसारखं वागायला हवं.

सगळीकडेच भांडणं दिसतात, म्हणून नाती तोडून तर चालणार नाही. ठीक आहे नाही पटलं, मग झालं भांडणं पण थोडा वेळ घ्या, विचार करा, एकमेकांना प्रेमाने एखादं गिफ्ट द्या, पुढची व्यक्ती सारं विसरून प्रेमाने वागेल हे नक्की आणि नाहीच वागली तरी तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न केलात याचं समाधान तुमच्या जवळ असेल. तुम्ही तुमचं नातं टिकवण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाहीत याचं गिल्ट मनात राहणार नाही हे नक्की त्यामुळे हा लहानांचा डायलॉग आपण मारायला काहीच हरकत नाही.

चला तर मग थोडं लहान होऊन लहान मुलांचा टाईम प्लिज हा गेम खेळूयात, एकमेकांना त्यांची स्वतःची स्पेस देऊयात आणि जीवन रुपी खेळातील मजा अनुभवूयात. थोडसं लहान होऊयात आणि निरागस हसू एकमेकांच्या चेहऱ्यावर आणूयात ?



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!