Skip to content

एकटे राहण्याचा निर्णय घेत आहात….तर एकदा हे वाचून काढा !

मुसाफिर

प्रत्येकाला लग्न करण्याची आणि कुटुंब वाढविण्याची इच्छा नसते. आजकाल बरेच मुले-मुली स्वखुशीने एकटे राहण्याचा निर्णय घेतात. एकटे राहत असताना सगळं काही स्वतःलाच बघावं लागतं. पण एकटे असलात तरी आनंद काही कमी होत नाही. एकटेपणा समृध्द करण्यासाठी खालील मुद्दे विचारात घेऊया…

प्रवास
आपल्या देशाला खूप चांगलं निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे. विविध पर्यटनस्थळांना भेट द्या. मित्रांसोबत एखादी रोड ट्रीप करा किंवा सोलो ट्रीप करा. नक्कीच चांगल्या आठवणी राहतील.

बचत
पैशाचे योग्य नियोजन करायला शिका, बचत करण्याची सवय पुढील आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल . एकटे राहणार असल्यामुळे पैशांचे बचत जरा जास्तच आवश्यक आहे.

एखाद्या कौशल्यात पारंगत व्हा
सध्याच्या स्पर्धेच्या तुगात तुम्ही कोणत्याही कौशल्यात निपुण असाल, तर नोकरीसाठी तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुम्ही निवांत बसू शकत नाही.

स्वतःची काळजी घ्या
एकटे राहत असल्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. स्वतःच्या मुलभूत गरजांची काळजी घ्यायला शिका.

वाचन करा
जास्तीत जास्त वाचन करा, कल्पनाशक्तीला वाव मिळेल. एखाद्या लेखकाने पुस्तक लिहायला १२ वर्षे लावले असतील, तर तुम्ही पुस्तक वाचून ती गोष्ट अवघ्या काही दिवसात शिकू शकता.

चांगली शरीरयष्टी बनवा
शरीरावरील अतिरिक्त चरबी घालवून टाका. व्यायाम करा. निरोगी रहा. मानसिक स्वास्थ्य टिकवा, यासाठी ध्यानाची मदत घ्या.

***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एकटे राहण्याचा निर्णय घेत आहात….तर एकदा हे वाचून काढा !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!