
एक नर्स म्हणुन मी कालचा प्रवास तुमच्या समोर मांडू इच्छिते..!
सौ. उषा अरगुलकर
स्टाफ नर्स
नायर हॉस्पिटल.
दिनांक २३ मार्च २०२०..!!
सकाळी 5.30 ला घरातून निघाले, माझा मुलगा मला सोडायला कल्याण स्टेशन वर आला. ट्रेन बंद होत्या. बसने जायचा विचार करत होते तेव्हाच पंजाब मेल येत आहे अशी अन्नोउन्समेंट झाली म्हणून स्टेशनवर गेले,तिथे आधीच माझ्या 3 मैत्रिणी,शारदा,सपना,आणि शीतल माझी वाट बघत होत्या.आम्ही 5.45ला त्या मेल मध्ये बसलो.तिकीट तपासनीस ना विनंती केली की भायखळा ला 2मिनिटांसाठी गाडी थांबवा…पण गाडी सुरू झाली 7 वाजता.
आमच्यासोबत आमच्या seniors पण होत्या दुसऱ्या बोगी मध्ये.
भायखळा ला गाडी स्लो झाली पण थांबली नाही म्हणून काही gents लोकांनी चैन ओढून गाडी थांबवली पण तोपर्यंत गाडी स्टेशन पासून बरीच पुढे गेली होती,पुन्ह आम्ही ट्रॅक मधून चालत स्टेशन गाठलं आणि 9 वाजता ड्युटी वर पोहोचलो.
इथंच आमचा प्रवास थांबला नाही , ड्युटी वरून पुन्हा 2.30 pm ला निघालो, मुंबई सेन्ट्रल बस डेपोत चालत गेलो तिथून बस ने दादर ला आलो, दादर हुन भिवंडी बस मिळाली त्याने कल्याण फाटा आणि तिथून कल्याण स्टेशन आणि मग घरी संध्याकाळी 6pm ला पोचले.
हे संगण्यामागचा उद्देश हा की शासनाने १४४ कलम लागू करून देखील सुशिक्षित-अशिक्षित लोक आपल्या दुचाकी – चारचाकी ने फिरत होती..!!
या कर्तबगारांना कुठे जाऊन झेंडे रोवयचे होते कुणास ठाऊक.
आमच्या सगळ्यांच्या मनात राहून राहून हा विचार येतो,
का आणि कुणासाठी आपण ही जीवाची बाजी लढवतोय , त्या बेजबाबदार प्रजेसाठी..!! मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री वेळोवेळी योग्य ते निर्णय घेण्यास मागे सरत नसून..!!
सरकार वारंवार सांगतंय घरातून बाहेर पडू नका..!!
आरोग्य सेवक, पोलीस , आणि अत्यावश्यक गटात काम करण्यारांना सहकार्य करा पण मुळात तुमचं कसं झालंय तुम्हाला सरकारने आयता घास दिलाय..!!
त्याची तरी जाण ठेवा..!!
आमच्या घरच्यांना नसेल का ओ आमची काळजी,आम्ही पण आमच्या लहान मुलांना, घरी सोडून येतो… तरीही स्वतःला या संकटात ढकलू पाहतोय..!!
आता तर कस्तुरबा नंतर kem आणि नायर हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आलेच तर त्या हॉस्पिटल मध्ये तेवढी व्यवस्था नाही, ..!! तिथे आम्ही तुम्हाला काय स्वतःला ही नाही सावरू शकणार..!!
तुमच्या गैरवर्तणुकी मुळे घर ते रुग्णालय हा प्रवास ही तुम्ही आमचा विस्कळीत करून ठेवलाय..!! आज तुम्ही सगळे घरी राहिला असता तर ट्रेन चालू राहिल्या असत्या,
लॉकडाउन होऊनही या प्रजेसाठी आम्ही बाहेर पडणार होतो..!!
पण आता विचार पडतोय..!!
कुटुंबाचा त्याग करून खरंच या प्रजेसाठी आम्ही आमचा जीव धोक्यात घालावा का..??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.


खरी गोष्ट आहे लोक खुपच विचीत्र वागायला लागलेत
खरंच खरी वस्तुस्थिती आणि आपण शेअरिंग करून वास्तव उभे केलय.तुमचे मनापासून कौतुक. आजच ,ऐकायला पोलीस बांधव ड्युटीवर जाताना चार वर्षांचा मुलगा खुप रडत होता.बाबा तुम्ही नका ना, बाहेर जावु.पण काय करणार आपले रक्षणासाठी मुलगा रडत असताना ते ड्युटीवर गेले.भावुक झालो.आमही .सलाम आपले धैर्याला.