
हम नही सुधरेंगे, हम तो पढे लिखे गधे है।
डॉ अमित पवार,
अहमदनगर.
सुशिक्षित- बेअक्कल,
खरमरीत लिहावं खूपदा वाटायचं पण आज वेळ आलीय,
हम नही सुधरेंगे, हम तो पढे लिखे गधे है।
सुशिक्षित गाढवांची गोष्ट, आत्ताच बातमी आली इटली मध्ये कोरोनाची 800 बळी फक्त 24 तासात, परत दुसरं चॅनेल लावलं 800 बळी डोकं बंद पडलं.
कारण आपल्या देशात कोरोना पसरत आहे. सरकार प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. सगळं सरकारच करणार आहे. आपण गंमत बघणार आपली जबाबदारी कधीच नसते.
नॅशनल युनिटी बद्दल आपण बोलतो परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा आचरणात काही येत नाही, ही तर मानसिकता आहे. बदलणार कधी❓
उद्या काय येऊ घेतलाय ना, आपल्याला जराही कल्पना अजूनपर्यंत नाही. चीन, इटली, इराण यांना विचारा हतबल आहेत, 5 कोटी 10 कोटी लोकसंख्येचे देश आहेत. आपली लोकसंख्या 135 कोटी आपलं काय होईल. औषधे तरी पुरतील का! तेवढे डॉक्टर्स आहेत का! सरकार प्रशासन सगळं करणार का!
आम्ही ऐकणार नाही म्हणजे नाही.
सर्वानी जागे व्हा, खडबडून जागे व्हा. सूचनांचे पालन करा,
काल मी हॉस्पिटल मधुन येताना, पाइपलाइन रोड भाजी मार्केट पासून येत होतो, गर्दी पाहुन धक्का बसला एवढी गर्दी कधीच नव्हती, आपण सिरीयस नाही एवढ कळलं. गर्दी करणारे सर्व सुशिक्षित होते सावेडी भाग म्हणजे सुशिक्षित लोकवस्ती. सुरक्षित अंतर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी नको या घोषणा गेल्या कुठे. बातम्या गंमत म्हणून पाहू नका विनंती आहे.
दुसरी घटना, पुणे रेल्वे स्टेशन ची, गर्दीचा व्हिडिओ मित्राणे पाठवला. गर्दी पाहून संपुर्ण देशात लोक इकडे तिकडे जाणार, त्या पैकी काळजी घेणारे बोटावर मोजण्या इतके बाकी सर्व बिनधास्त म्हणजेच सुशिक्षित बेअक्कल. संध्याकाळी बातमी पहिली रेल्वे मध्ये प्रवास करणारे 8 लोक कोरोना ग्रस्त.
चहाच्या टपरीवर गर्दी❗
जिम बंद आहेत तर एकत्र व्याम सुरू झालेत❗
पान टपरी वर गर्दी❗
सुट्या मिळाल्याने मैदाने भरलेली आहेत❗
सार्वजनिक कार्यक्रम बिनधास्त सुरू आहेत❗
चाय पे चर्चा सुरू आहेत❗
गप्पा मारायचे कट्टे भरलेले आहेत❗
किती हा सुशिक्षित बेअक्कल पणा.
तिसरी घटना एक महिला कोरोना पॉसिटीव्ह आली, तिची हिस्टरी घेतली तर ना परदेश वारी किंवा दुसरी मेजर हिस्टरी नाही, फक्त एक साखरपुडा समारंभा ला जाण झालं होतं, म्हणजे तिथे लागण झाली. समारंभ आयोजित करणारे आणि सार्वजनिक कार्यक्रमला जाणारे सुशिक्षित बेअक्कल.
शेवटची घटना हे सांगते आता कुठून आणि कशी कोरोनाची लागण होईल ना आता काही सांगता येत नाही. कोणीच सुरक्षित नाही, अनोळखी ठिकाण व्यक्ती विश्वास ठेवू नका, जाऊ नका. उगीच गप्पा मारायला चहा च्या निमित्ताने शेजारी ओळखीचे मित्रा यांना बोलावू नका, कोण कोरोना संक्रमित आहेत याची माहिती नाही, स्वतः सुरक्षित राहणे हाच उपाय आहे.
प्रशासनाच्या सूचना न ऐकणे इटली ला किती महागात पडतंय, तेथील नागरिक आता चुक कबूल करत आहेत, पण वेळ निघून गेली आहे, इटली मध्ये लोकांना फार सांगितले ले आवडत नाही, मुजोर पणा अंगात होता, आम्हाला सगळं समजत अशा भावना आणि अविर्भाव होता. एवढे मृत्यू होत आहेत की अंत्यसंस्कार करायला नातेवाईक नाहीत की मित्र नाहीत, काही ठिकाणी तर उपचारा अभावी मृत्यू होत आहेत.
वरील सर्व गोष्टी आज आपल्या हातात आहेत. उद्या नसणार आहेत, सुशिक्षित बेअक्कल होण्या पेक्षा जबाबदार व्हा.
आता येथून पुढे, काय करायचं.
आपण परदेश, पुणे मुंबई किंवा कुठल्याही शहरातून आपल्या घरी आला असाल तर स्वतःला वेगळं करा कारण आपले आईवडील घरातील लहान मुले अडचणीत येतील. आता प्रवास झाला असेल तर काळजी घ्या, झाला नसेल तर आपण सुरक्षित आहेत हे कळवत रहा. बाहेर पडू नका एवढीच जबाबदारी पार पाडा. कोरोनाची साखळी चा भाग होऊ नका, साखळी तोडणारे व्हा.
आपल्याला काही अडचण आली, सर्व बंद झालं तर घाबरून जाऊ नका, कोरोना हेल्पलाईन, कलेक्टर ऑफिस, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांना संपर्क करा पाहिजे ती मदत मिळेल, अफवा वर विश्वास ठेऊ नका.
सर्व लग्न कार्य सार्वजनिक कार्यक्रम रद्द करा, इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करा. हॉस्पिटलमध्ये मध्ये उगाच गर्दी नको. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकला.
गरज आहे आपली जबाबदारी ओळखण्याची.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.

