Skip to content

जवळचं कोणीही नसताना आयुष्य कसं दिलखोस्त जगावं..

जवळचं कोणीही नसताना आयुष्य कसं दिलखोस्त जगावं…एका आजीची कहाणी !


माझ्या लग्नाला वर्षच झाले असेल. आम्ही दोघंच घरी असायचो. दोघंही नोकरी करायचो. माझी नोकरी पार्ट टाईमच होती. त्यामुळे दुपारीच मी घरी येत असे. नव-याला मात्र खुप उशिर व्हायचा यायला. शिवाय मधून अधून परदेशात टूरिंग ही असायचं.

आमच्या समोरच्या घरात एक वयस्कर जोडपे रहात होते. आजी आजोबा दोघेही एकटेच . मुलगा परदेशात नोकरीला होता. चार पाच वर्षातून एकदा यायचा . त्याच्या व्यापात तो गुंतलेला होता. आजी अजोबाही दोघं एकमेकांबरोबर अगदी आनंदाने मजेत रहात होते. मुलगा जवळ नाही याचे काही सल नव्हते. माझी काही फार ओळख नव्हती त्यांच्याशी,

आमचे फक्त येता जाता एकमेकांकडे नुसते बघणे असायचे. हसणे बिसणे चौकशी वैगरे अजिबातच नाही.

एक दिवस बाथरूमला जाऊन आल्यावर अजोबांचे बी पी शूट झाले हाॅस्पिटलमधे अॅडमिट केले पण ते त्यातून उठलेच नाहीत. वडिलांचे अंत्यविधी करायला अमेरिकेतून मुलगा सुन आले. दहा बारा दिवस राहीले. आजींना बरोबर घेऊन जायचे कायमचे. असे ठरले पण आजी काही ऐकायला तयार नव्हत्या. मुलगा त्यांना समजावत होता अगं आई तू एकटी कशी राहशील काही झालं तर कोण आहे मदतीला. आजींचे म्हणणे होते. नको रे मला काही मानवत नाही ते अमेरिकेचे हवामान . मी इथेच माझ्या घरात राहीन वाटलं तर कधीतरी येत जाईन थोड्या दिवसांकरता. आणि मला काय होणार आहे चांगली ठणठणीत आहे मी. मुलाचं काही चाललेच नाही त्यांच्या हट्टापुढे मग तो निघून गेला अमेरिकेत. सून मुलगा नाईलाजाने परतले, मी पण विचार करत होते आजी एकट्याच कशा रहाणार आता

एक दिवस दुपारी मी ऑफिस मधून घरी आले आणि बेल वाजली. अत्ता या वेळेला कोण ?म्हणत मी दार उघडले तर समोर आजी होत्या. त्यांना आत बोलावले. त्या म्हणाल्या अगं तू एकटीच असतेच संध्याकाळपर्यंत, म्हणून म्हंटलं जरा गप्पा माराव्या. मी म्हंटलं येत जा आजी काही हरकत नाही. त्यावर त्या म्हणाल्या अगं जरा माझ्या बरोबर येशील का आज ? मला वाटलं यांना डाॅक्टर कडे नाहीतर देवळात वैगरे जायचं असेल तर त्या म्हणाल्या आपण पिझा हट ला जाऊया का दोघी आज ?

मला जरा नवलच वाटले . आजी तुम्हाला पिझा? त्यावर आजी म्हणाल्या अगं कधी पासूनचा खायचा होता. रोज टि व्ही वर अॅड बघते नुसती यांना तब्बेती मुळे खुप सारी पथ्य होती. बाहेरचं खाण्याचा प्रश्नच नाही. मग अमेरिकेत गेले मुलाकडे तर सुनबाई तिचे पाक कौशल्य दाखवायला मराठमोळाच स्वयंपाक करते सासूबाईंसाठी.

आता कुठे मोकळी झालीय मी तर बरोबर यायला कोणी नाही म्हंटलं तू एकटीच असतेस तर तुला विचारावं तुम्हा तरूणांचा आवडता पदार्थ, नाही म्हणायची नाहीस. घरीच बनवूया ना मग मी म्हंटलं त्यावर त्या म्हणाल्या नको गं आयुष्यभर घरचच बनवलेलं खाल्लय सगळं . म्हंटलं बरं जाऊया आपण संध्याकाळी.

मग संध्याकाळी मी पटपट माझी घरातली कामं उरकली आणि आजींकडे गेले . आजी तयारच होत्या , लेगिंग्ज आणि कुर्ती घालून .नेहमी काॅटनच्या साड्यांमधे असणार् या त्यांना असं बघून मी परत आश्चर्य चकीत त्या म्हणाल्या अगं अमेरिकेत जाताना घेतलं होतं हे पडूनच आहे म्हंटलं वापरून टाकावं मी म्हंटलं आजी छान दिसताय घालत जा. त्यावर त्या म्हणाल्या हो गं सुटसूटीत वाटतं अगदी. त्या संध्याकाळी आम्ही छान गप्पा मारत पिझा पार्टी एन्जाॅय केली. गप्पा मारताना मला कळले ,आजींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती पाॅझिटीव्ह आहे. अजोबा गेले मी एकटी पडले म्हणून दुःखी नाही झाल्या मुलाकडे जाऊन त्याच्या संसारात का लुडबूड करा असं त्यांना वाटत होतं आता पर्यंत जे काही केलं नाही ती सगळी हौस मौज करून घ्यायची असं त्या म्हणाल्या. आम्ही घरी आलो जाताना म्हणाल्या उद्या आपण मुव्हीला जाऊया. मग दुस-या दिवशी मुव्ही. कधी माॅल मधे शाॅपिंग , वन डे पिकनिक आमचे प्लॅनस् चालू झाले. अगदी पब मधे सुधा जाऊन आलो . दोघींनी ड्रायव्हींग क्लासही जाॅईन केला. लवकरच झुंबा पण शिकायचा ठरले.

आजींच्या बर्थ डे ला तर आम्हा दोघांना त्यांनी काॅकटेल पार्टी दिली. आजी मस्त एन्जाॅय करत होत्या सगळं आणि मी या मैत्रिणीमुळे आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकले.

अरूण दातेंचे गाणे आठवले

“या जन्मावर”

“या जगण्यावर शतदा प्रेम करावे”


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

3 thoughts on “जवळचं कोणीही नसताना आयुष्य कसं दिलखोस्त जगावं..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!