Skip to content

कुठलीही गोष्ट सहज घेण्याच्या नादातच ‘Titanic’ बोट बुडाली होती.

कुठलीही गोष्ट सहज घेण्याच्या नादातच ‘Titanic’ बोट बुडाली होती.


फार वर्षापूर्वी एक जहाज बुडालं होतं ज्याचं नाव होतं “Titanic”.ते जहाज बुडण्याचं कारण देखील साधारणंच होतं “casual approch”.म्हणजेच कुठलीही गोष्ट सहज घेणं.असं म्हणतात ते जहाज जेव्हा प्रवास करण्यासाठी सज्ज झालं तेव्हा हवामान खात्याने त्या जहाज कंपनीच्या management ला ice burg (बर्फाच्या पर्वतरांगा) समुद्रात असण्याची शक्यता सांगितली होती.

तरी देखील ते जहाज 2000 प्रवाशांना घेऊन समुद्रात निघालं होतं.त्या जहाजात आपातकालिन बोटी देखील खूप कमी ठेवल्या गेल्या होत्या.कारण काय तर त्याची गरजंच नाही.Titanic जहाज कधी बुडणारंच नाही.ईथेही casual approch दिसला.त्या जहाजाच्या कॅप्टनला विचारलं असता त्याला 25 वर्षाचा अनुभव असून कुठलाही ice burg त्याचं काहीच वाकडं करू शकतं नाही असं कॅप्टनचं म्हणनं होतं.

इथेही तोच casual approch राहिला.2000 प्रवाशांना घेऊन हे जहाज समुद्रात निघालं खरं पण एका छोट्याशा ice burg ला धडकून निस्तनाबूत झालं.तुम्हाला हे मुद्दाम सांगतो विशेष म्हणजे या जहाजात सर्व प्रवासी,लोकं वेगवेगळ्या जातीधर्माचे होते.1 st class,2nd class,3 rd class,उच्चवर्णीय,सवर्ण सगळेच होते.परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे सगळेच एकमेकात मिसळले होते.माणूस म्हणून सगळेच सगळ्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते.

कुणी businessman होतं.कुणी सफाई कामगार.कुणी वेटर तर कुणी celebrity होतं.कुणी पाॅलीटीकल होतं.सगळेच्या सगळे बुडून समाधीस्त झाले.कुठल्याच वर्गाचं कुणीच वाचलं नाही.

त्याचं एकमेव कारण एवढंच होतं “casual approch”.

हे सगळं तुम्हाला पुन्हा नव्याने पहायचं असेल तर james cameron नी दिग्दर्शित केलेला “Titanic” तुम्ही युट्युब वर पाहू शकता. आत्ताची परिस्थिती आणि“Corona”च्या बाबतीत देखील आपलं हेच चालू आहे.तुमचा एक casual approch सर्व मानवी जात नष्ट करायला पुरेसा आहे.आणि तुम्ही कुठल्याही class चे असा.सरकार सोबत असा किंवा विरूद्ध. प्रशासनासोबत असा किंवा नाही.कुठल्याही जाती धर्माचे असा.कुठल्याही profession चे असा.कुठल्याही political party चे असा.

corona आणि त्याचा संसर्ग या बाबतीतचा हा तुमचा casual approch आपल्या सगळ्यांना बुडवायला पुरेसा आहे.आपल्यापेक्षा जास्त उन्नत,प्रगत असणारे देश यापुढे हताश हतबल आहेत.

याचं गांभीर्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. येणारे पुढचे अजून काही दिवस खूप महत्वाचे असणार आहेत. त्यासाठी शासनाने सांगितलेले सर्व precaution पाळा., स्वत: सुरक्षित रहा आणि दुस-यांना ही सुरक्षित ठेवा.

“Don’t Gather….Stay at home….Be Safe…”

Thanks.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

1 thought on “कुठलीही गोष्ट सहज घेण्याच्या नादातच ‘Titanic’ बोट बुडाली होती.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!