Skip to content

नैराश्य आलंय?? मग यावरची कारणे आणि उपाय जाणून घेऊया!

नैराश्य : कारणे आणि उपाय


मोहन पाटील


विज्ञान- तंत्रज्ञानाच्या या स्पर्धेच्या गतिमान युगात, प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात नैराष्य,वैफल्य येतच असते . स्वत:कडून , इतरांकडून आणि निसर्गाकडून आपण अवाजवी अपेक्षा ठेवतो , ज्या मनोजोगत्या पूर्ण न होऊ शकल्याने नैराष्य येते.
बालपणी झालेले मानसिक आघात, शिक्षण – नोकरी व्यवसायात आलेले सततचे अपयश , यातून निर्माण होणारे न्यूनगंड , वैवाहिक जीवनातील ताणतणाव , सहकाऱ्यांशी झालेले वैचारिक मतभेद , आर्थिक ओढाताण , दुर्धर शारीरिक व्याधी- आजार, सोशल मीडियाचे ऍडिक्शन, कौटुंबिक कलह , प्रॉपर्टीचे वाद , अपेक्षित विकास साध्य न होणे , प्रयत्नांना मनासारखे यश न येणे , अशा असंख्य कारणांनी आयुष्यात नैराष्य येत असते.

एकसुरी – चाकोरीबद्ध (डबक्यातील) आचार -विचार आणि सुख समाधानाचा हव्यास देखील नैराश्यास आमंत्रण देतात .

तंत्रज्ञानातील विकासामुळे होणारे वेगवान बदल, त्यामुळे जगण्यात आलेली गती , या बदलाना सामोरे जाताना उडणारी तारांबळ , संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास (पाश्चात्तीकरण), अशी अनेक करणे नैराश्यास कारणीभूत होतात .

नैराष्य अनेकदा आर्थिक अडचणीतून येतं . ज्यामध्ये विशेषतः मध्यमवर्गीयांच्या आर्थिक अडचणी आणि यातून निर्माण होणाऱ्या समस्या, हे बहुदा नैराश्याचे कारण ठरते . आर्थिक सक्षम समाजाची नैराश्याची करणे वेगळी असली तरी त्यांनाही डिप्रेशनचा सामना करावा लागतो.

आपल्याला आलेली नैराश्याची करणे, ज्याची त्याला निश्चित ठाऊक असतात . त्यांच्या मुळाशी जात, कारणांचा शोध घेणे गरजेचे असते. प्रत्येक समस्येचा उपाय समस्येच्या मुळाशी दडलेला असतो . वेळीच उपाययोजना न केल्याने समस्या गंभीर बनत जाते . नियोजनात बदल करून, नियोजनाप्रमाणे कृती केल्यास समस्येतून मार्ग निश्चितच काढता येतो .

नैराष्य नेहमीच टाळता येत नसले , तरी त्यातून हमखास बाहेर पडता येत . नैराश्या कडे दुर्लक्ष करू नये . आपल्याला जीवन पद्धतीत तात्काळ आणि सकारात्मक बदल करून, प्रत्येक घटनेकडे तटस्थतेने पाहावे. भूतकाळातील दुःखद , कटू प्रसंग -घटनांची उजळणी करीत बसू नये. त्या शक्येतोवर विसरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा, किंवा विसरण्या करिता आपल्या आवडत्या छंदात मन रमवावे. जमेल तेथे क्षमाशीलता दाखवून पुढे जावे .

आपल्या आणि मुला-बाळांच्या भविष्याची अनावश्यक चिंता करू नये. आपल्या कमतरता -उणीवा दूर करण्या करिता, स्वतः पद्धतशीर प्रयत्न करावेत. जे मनाला भावते, ज्यातून आनंद मिळतो, असे चांगले छंद जोडावेत- जोपासावेत . ज्यामुळे मन व्यस्त राहते.अनिष्ट विचारांपासून दूर सरते . सतत चांगल्या गोष्टींचा शोध घ्यावा.अति दगदग होत असल्यास,सुट्टी घेऊन छंदात , मित्रांत , कुटुंबात रमावे. भ्रमण करावे अथवा आवडीची , मनोधैर्य वाढविणारी पुस्तके वाचावीत . नैराशातून बाहेर काढणारं एक पुस्तक हा महागुरू असतं . ध्यानधारणा आणि मानसिक- शारीरिक व्यायाम, ताणमुक्तीचे उत्तम माध्यम आहे .

कोणत्याही घटनेकडे तटस्थ वृत्तीने , स्थितप्रज्ञतेने पाहावे . मनाविरुद्ध घडून देखील चित्त स्थिर आणि शांत असू द्यावे . लहानमुले , पशु -पक्षी , वृक्ष -वल्ली , आवडती माणसे , स्थळे यात मन गुंतवावे- रमवावे. दिग्मूढ न राहता सुसंवाद वाढवावा . उत्तम श्रोता बनून समुपदेशनाचे श्रवण करावे . लहान -सहान चुका – दोषांकरिता स्वतःलाच कोसणे-दोष देणे त्वरित थांबवावे. त्याचवेळी प्रत्येक चुकीतून बोध घेत, शहाणे व्हावे .

स्वतःला आणि आपल्या क्षमतांना कधीही कमी लेखू नये . आत्मविश्वास ही माणसास लाभलेली सर्वोत्तम शिदोरी असल्याने , तो जागवावा- वाढवावा . ज्या ज्या गोष्टी आवडतात, शक्य असतात, आवाक्यात असतात, त्यामध्ये प्रथम हात घालावा .

आर्थिक अडचणीमुळे ताण येत असल्यास , गरजा कमी कराव्यात. आवश्यक तेथेच खर्च करावा . शत्रुंना मित्र करावे,ज्या योगे होणारा विरोध मावळतो .

आजूबाजूस घडणाऱ्या प्रत्येक बऱ्यावाईट घटनेशी आपला संबंध जोडू नये . शक्यतितका दानधर्म करावा . समाजकार्यात सहभागी व्हावे , ज्यामधून असीम आनंद मिळतो.

नवनव्या गोष्टी आत्मसात करण्याचा छंद जोडावा, सर्वप्रकारच्या व्यसनांपासून सर्वप्रथम दूर राहावे, कारण व्यसनाधीनतेतून नैराष्य येते आणि नैराश्यातून व्यसनाधीनता वाढत जाते.

वाद-विवाद शक्यतितके टाळावेत . सकारात्मक , आशावादी , कर्तबगार , प्रगल्भ विचारांच्या व्यक्तिमत्वांशी संबंध प्रस्थापित करावेत.त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. किमान एक ‘मोठे ध्येय’ निश्चित करावे, त्याच्या पूर्तते करिता स्वतःस झोकून द्यावे, आपला फावला वेळ तेथे खर्ची घालावा , जेणेकरून अनिष्ट विचाराना थारा उरणार नाही .

आसक्ती आणि हव्यास यातून बऱ्याचदा भीती – दुःख -नैराष्य यांची उत्पत्ती होत असते . तेव्हा निर्भय बनावे . परिस्तिथी आपल्याला दुबळे बनवत नसते तर ओढवलेल्या परिस्तिथीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपणास दुबळे बनवीत असतो .

वास्तविक पाहता प्रत्येक मनुष्यात स्फुर्ती , ऊर्जा ,चैतन्य ओतप्रोत भरलेले असते, ते जागृत करून त्यांचा योग्य आणि पुरेपूर वापर केल्यास नैराष्य दूर सारता येते .

आपल्यावर झालेले संस्कार , त्यातून निर्माण झालेल्या आपल्या धारणा-मानसिकता , समजुती , त्यातून आपण काढत असलेले निष्कर्ष, तसेच रूढी -परंपरा- संकेत ही सर्व ‘अदृश्य बंधने’ असतात . ज्यांचा पगडा मनावर खोल रुजलेला असतो. ही अदृश्य बंधने वेळीच झुगारल्यास , मन रिक्त -शांत व्हायला मदत होते .

आपले विचार आणि आचरण हे सतत नव्याचा शोध घेणारे , आशावादी आणि प्रवाही ठेवल्यास, नैराश्यावर, वैफल्यावर नक्कीच मात करता येते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!