Skip to content

आपण सेक्स का करतो…आणि बंद खोलीतच का…?

आपण सेक्स का करतो…आणि बंद खोलीतच का…?


– Reproduction (पुनरूत्पादन)

– Fun / Pleasure ( उपभोग/ आंनद )

माणसाव्यतिरिक्त “फक्त’ डॉलफिन्स आणि Bonobos (चिंपाझीचा एक प्रकार) हे जीव सेक्स Pleasure म्हणून करतात. बाकीचे सगळे प्राणी/पक्षी अमुक त्यांच्या सिजनमध्ये Mating करतात.

पण आपण सेक्स उपभोगतो म्हणजे नक्की काय होतं ?

आपल्याला का सेक्स वारंवार हवाहवासा वाटतो ?

या सर्वांच्या मागे आहे, “Oxytocin” हॉर्मोन.सेक्स करताना/सेक्स झाल्यावर आपल्या शरीरात Oxytocin होर्मोन तयार होतं. जे आपल्याला आनंद देतं, आपलं शरीर रिलॅक्स करतं. खरंतर हे व्यसनासारखंच असतं. मेंदूला ती गोष्ट सुखावणारी असते, आणि त्याची मग वारंवार मागणी सुरु होते. आणि ती मागणी पूर्ण करावी म्हणून ‘वासनेचा’ धूर्त डाव खेळला जातो मेंदूकडून. म्हणूनच तुम्ही जेवढं जास्त सेक्स करता, तेवढं तुम्हाला जास्त सेक्स हवा असतो. सिगारेट आणि दारूसारखंच असतं ते. फरक येवढाच की त्यात तुमच्या शरीराचं नुकसान नसतं.

मेंदू (एक भाग) बऱ्याचवेळी तुमचं चांगलं-वाईट पाहत नाही, तुम्हाला जी गोष्ट आवडलेय ती गोष्ट ‘चांगली’ असं तो थोडक्यात व्याख्या करतो. आणि मग त्याच गोष्टीची मागणी त्याच्याकडून सुरु होते. मग एखाद्याला गोड खाणं थांबवता येत नाही, त्याला डायबेटिज झाला तरी त्याला ‘गोड’ पदार्थ आकर्षित करतच असतात. म्हणून आपल्याला मेंदूचा दुसरा भाग वापरून मेंदूवर बॉसिंग करावं लागतं. आपल्या शरीराला ज्या गोष्टी योग्य आहेत त्या आपल्याला त्याच्यावर लादाव्या लागतात. म्हणूनच मग व्यायाम कर, चांगल्या सवयी लाव … हे कर्मकठीण होऊन जातं.

मेंदूचा एक भाग सतर्क असतो, सावध असतो … तर दुसरा भाग निष्काळजी, बेसावध असतो … तुम्ही कुठल्या भागाला जास्त महत्व देताय हे महत्वाचं असतं.

सेक्स करताना मी प्रोटेक्शन वापरायला हवं, हे तो सतर्क मेंदू सांगत असतो… तर बेसावध मेंदू फक्त उपभोगाकडे लक्ष केंद्रिंत करतो, ज्याचे परिणाम कदाचित वाईटही असू शकतात.

तर आता मुद्यावर,

आपण चार भिंतीत, बंद खोलीतच का सेक्स करतो ?

ओपन, पब्लिकमध्ये सेक्स का करत नाही ?

तर त्याचं कारण तेच Oxytocin होर्मोन आणि त्याची उत्क्रांती.

खूप वर्षांपूर्वी जेव्हा माणूस आदिमानव होता, जेव्हा कुठले कायदे नव्हते, तेव्हा त्याचं संरक्षण हा त्याच्यासाठी महत्वाचा प्रश्न होता. कोण आपल्याकडे पाहतंय म्हटलं की तो भीतीने, काळजीने सतर्क व्हायचा, सावध व्हायचा. अजूनही बरेच पक्षी/प्राणी आपण जर त्यांच्याकडे पाहिलं, तर ते सावध होतात, सुरक्षित अंतर ठेवतात. कारण तेच. संरक्षण आणि त्यामागची भीती.

त्यामुळे चार-चौघांत सेक्स करणं माणसाच्या/प्राण्याच्या दृष्टीने घातक होतं. आणि त्यामुळे झालं काय की Oxytocin होर्मोन हा झाला लाजाळू आणि भित्रा. हे जर होर्मोन नाही, तर तुमचा सेक्स तुम्ही उपभोगू शकत नाही.

यात अजून एक गंमत अशी की, Oxytocin हॉर्मोन, हा मानी हॉर्मोन आहे. Stress / चिंता याबरोबर त्याचं पटत नाही. म्हणजे जर Stress असेल तर हा हॉर्मोन येत नाही. म्हणून Stress असला की तुम्ही बऱ्याच गोष्टी उपभोगत नाही. आर्थिक आणि मानसिक स्थैय हे सेक्ससाठी, ते उपभोगण्यासाठी महाआवश्यक असतं, असं माझं मानणं आहे.

दुसरी गोष्ट झाली अशी की हे लाजाळू हॉर्मोन पुरुषापेक्षा स्त्रीमध्ये तीव्र झालं. कारण तिला तिच्या अपत्याची काळजी. पुरुष, ‘आओ जाओ घर तुम्हारा’ सारखं तसा निर्लज्जच राहिला. तर त्याच्या तुलनेत स्त्री ही जास्त सतर्क आणि सावध झाली. तिला तिच्या मुलांची काळजी, स्वतःची काळजी असं करता करता तिच्यात सावधपणा जास्त आला. त्यामुळे लपून छपून राहणं हे तिला जास्त गरजेचं होतं. आणि त्याचा परिणाम झाला Oxytocin हॉर्मोनवर. म्हणून आजही स्त्री, पुरुषापेक्षा जास्त सावध आहे. ह्या सगळ्याचं मूळ उत्क्रांती.

म्हणून हा सगळा ‘बंद खोलीतला सेक्स प्रपंच’


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

12 thoughts on “आपण सेक्स का करतो…आणि बंद खोलीतच का…?”

  1. छान आहे आणखीन माहिती दिली तर बर होईल

  2. खूप छान महिलांसाठी ग्रुप नाही का असा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!