Skip to content

आपण ज्यासाठी धडपडतोय…नेमकं त्यात सुख आहे का ???

आपण ज्यासाठी धडपडतोय…नेमकं त्यात सुख आहे का ???


सुलभा घोरपडे


आपल्याला अनेक आजार येत असतात , पण आपल्याला आनखी काही आजार जडलेले असतात.

मला का नाही ? त्याला किंवा तीला का? एवढेच का? आनखी का नाही ? आत्ता का नाही ? उद्याच का? सर्व मलाच मिळालं पाहिजे ?
सर्वात मोठा आजार म्हणजे ” सुख देणाऱ्या गोष्टी मिळाल्या की आनंद मिळतो”. हा भ्रम .

यातून मग वाटते अजून मोठे घर, अजून एक गाडी , अजून पगार वाढ असे अजून बरेच काही . हे वाटणे चुकीचे नाही . वाटल्याशिवाय मिळणार कसे आणि मिळवण्यासाठी आपण धडपड तरी करणार कशी!

पण इतकं सारे मिळालं तरी आनंद होतो का ? आजिबात नाही , कारण तो त्या गोष्टीत नसतोच मुळी.

आणखी एक मनुष्य, आपल्या दुःखाने जेवढा दुःखी होत नाही तेवढा दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो .

आपल्याकडे कितीही पैसा आला तरी अजून हवा आहे कारण दुसऱ्याकडे जास्ती आहे.

कुणाच काही नुकसान झालं तर आतून हळूच ” असच पाहिजे ” अस वाटते . आपल्या दारात कितीही फुले असली तरी , दुसऱ्याच्या दारातली फुलाकडे लक्ष जाते. आपल्या ताटापेक्षा दुसऱ्याच्या ताटाकडे लक्ष जाते. असे जर दुसऱ्या लोकांनबरोबर तुलना केली तर मग आपल्याला कसं सुख मिळेल.

आणि सर्व सुखसुविधा मिळाल्यातरी त्यातून आनंद तरी मिळेलच कसा ! कारण या गोष्टीत आनंद नव्हता .

म्हणजे सुख मिळाले तरी आनंद मिळेलच अस नाही .

कोणतीही गोष्ट ‘जास्त’ म्हणजे चांगले असे नाही .

पूर्वी राहायला छोटेस घर, अर्धा बिगा जमिन , त्यातच आठ ते दहा माणसांच कुटुंब असायच तरी तेवढयात रोज जेवण मिळेल याची हमी , चार जोडलेले मित्र एवढी गरज होती . त्यांचा एवढाच सुखाचा मुलमंत्र होता ” पदरात पडेल ते गोड मानून घ्यावे आणि काखोटीला असेल ते मऊ मानून निजावे.
खरंच तेव्हा असं वाटत ” अजून पाहिजे ” यासाठी आपण धावतो , सर्व काही मिळवतो, प्रत्येक गोष्ट मिळाली की क्षणभर सुखावतो ;पण ” क्षणभरच” . नवी गाडी , पगार वाढ , आनखी एक नवीन घर अजून सर्व काही मिळवतो तोपर्यंत पुढच्या टप्प्याकडे मन धावते आणि जीवनाची रस्सीखेच चालू होते.

बहुतांशी लोकांकडे सर्व सुखसुविधा असतात पण तरीही ते स्वतः ला सुखी समजण्याची परवानगी देत नाहीत .

म्हणूनच म्हणतात ” अमृताचे घट भरले तुझ्या दारी , का वणवण फिरशी बाजारी”.

“खर तर योग्य दिशेने जास्तीत जास्त प्रयत्न करून मग जी परिस्थिती निर्माण होईल त्यात समाधान मानले तर सुख मिळेल.
सुख प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे.
जेवढ तुम्ही स्वतःला सुखी समजाल तेवढ सुखी व्हाल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!