Skip to content

आपल्या जीवनातील सकारात्मक विचारांचा परिणाम!

सकारात्मक विचारांचा परीणाम


सदाशिव पांचाळ

(माईंड ट्रेनर व मोटीव्हेशनल स्पिकर)


आपण जसा विचार करतो, तशाच घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. कारण जसा विचार तशा अंतर्मनात प्रतिक्रिया उमटत असतात. जर आपण असा विचार केला की अमुक गोष्ट मला जमणार नाही, तर समजून जा की ती गोष्ट तुम्हाला आयुष्यभर जमणार नाही. जो पर्यंत तुम्ही त्याबाबतचा विचार बदलणार नाही.

त्या बद्दलचा विचार सकारात्मकदृष्ट्या बदलला अगदी त्याच क्षणी ती होण्याबाबतची शक्यता कितीतरी पटीने वाढते. नुसता विचार बदलला तरी शक्यता वाढते अन्य प्रत्यक्षात तुम्ही करायला लागलात, की जसजसा एकेक टप्पा तुम्ही पार करता तसतसा तुमचा आत्मविश्वास वाढत जातो. कधी कधी आपण स्वत:वर विश्वास ठेवणार नाही अशा घटना सुध्दा नकळत घडून जातात.

असंच माझी कन्या मृण्मयी, चिरंजीव प्रद्युम्न व भाची प्रतिक्षा यांच्या सोबत बसून बोलत होतो. इतक्यात माझ्या मनात एक विचार आला. मी या तिघांना सांगणार असे म्हणत असताना प्रात्यक्षिक दाखवण्याचे सुचले. मग देवघरात जाऊन कापूरवड्या आणल्या. मी काय करणार आहे याची यत्किंचीत कल्पना नसल्यामुळे तीघांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

प्रात्यक्षिक सुरु करण्यासाठी मी मेणबत्ती पेटवली. एक कापूरवडी हातातून पेटत्या मेणबत्तीवर धरली. कापूर वडी पेटल्यावर एखादी चॉकलेट तोंडात टाकावी तशी कापूर वडी मी तोंडात टाकली.

हे तिघेही एकदम किंचाळले, घरात मोठा गलका झाला. सगळी मंडळी हातातले काम सोडून आम्ही बसलो होतो, तेथे जमा झाले. सगळे घाबरलेले. काय झालं, काय नाही कोणाला काहीच कळेना.
मी सगळ्या मोठ्यांना समजावले, आणि परत आपापल्या जागी पाठवले.

प्रात्यक्षिक नव्याने सुरू करण्यापूर्वीच या तिघांना न ओरडण्याबद्दल सुचना दिल्या गेल्या. पुन्हा कापूर पेटला, तोंडात टाकला. असं दोन – तीनदा केल्यावर, तुम्हाला भीती वाटत नाही का? असा प्रश्र्न प्रद्युम्नने विचारला.

मी म्हणालो नाही, तू केलस तर तुझी पण भीती जाईल.
मी प्रयत्न करू का? त्याचा पुन्हा प्रश्न.
मी- त्याचसाठी तर बसलोय.
त्यांने स्वत: हिंमत करत कापूर पेटवला, पण तोंडात टाकून शकला नाही.
असे तींन – चार वेळा केल्यानंतर पेटता कापूर तोंडात टाकायचे धाडस होईना.
पण तो प्रयत्न तरी करत होता. अन्य मुली मात्र फक्त बघ्याची भुमिका घेऊन बसलेल्या होत्या.
शेवटी मी थांबवले. पुन्हा एकदा समजावले.
जोपर्यंत मनात भीतीचा विचार आहे, तोपर्यंत एक हजार वेळा प्रयत्न केला तरी जमणार नाही.

आता कोणत्याही परिस्थितीत पेटता कापूर तोंडात टाकणार, असा मनोमन विचार करा. असं म्हणत चार ते पाच वेळा मनोचित्रण करवून घेतले.

(मनोचित्रण म्हणजे creative visualisation.
या मध्ये एखादी घटना प्रत्यक्षात येण्यासाठी किंवा येण्यापूर्वी मनामध्ये तीचे चित्र पहाणे)

…आणि मग पुन्हा प्रयोग सुरू झाला. पहिल्याच फटक्यात मुलगा पेटता कापूर तोंडात टाकण्यात यशस्वी झाला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र पहाण्यायोग्य झाला होता.

काही वेळानंतर मुलीं कापूरवडी घेऊन तयारीला लागली. दोन – तीन वेळा प्रयोग फसला. तरी पण तेवढ्याच ताकदीने पाठपुरावाही झाला. मृण्मयी आणि प्रतिक्षा यांच्यात स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेचा शेवट मात्र गोड झाला. दोघींनीही पेटता कापूर तोंडात टाकल्यावर आत्मविश्वास मिळाला, त्यानंतर राहिलेल्या कापूर वड्या कोण संपवतो, याची स्पर्धा सुरू झाली. तिघांच्याही चेहऱ्यावरचा ‘कॉन्फिडन्स’ काहीही न सांगताच बोलत होता.

म्हणून म्हणालो, विचार बदलला आणि प्रत्यक्ष कामाला लागलात की एकेक टप्पा पार होऊ लागला की आत्मविश्वास वाढीस लागतो. त्या आत्मविश्वासाने कामाला लागल्यास आकाश ठेंगणे झाल्याशिवाय राहणार नाही.


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “आपल्या जीवनातील सकारात्मक विचारांचा परिणाम!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!