Skip to content

आता थोडे दिवस घरीच बसायचं आहे…

राजू लहाने



कॅरम काढा,पत्ते काढा ,
थोडेदिवस घरातच बसायचं आहे ।

सापशिडी आणि बुद्धीबळ खेळा
थोडेदिवस घरातच बसायचं आहे ।

जुने फोटो अल्बम ,आठवणी काढा
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

जुन्या चोपड्या काढा,गोष्टी काढा,
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

चटई नी सतरंजी अंथरून बसा
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

रेडिओ काढा,टेपरेकॉर्डर काढा ,।
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

जुनी पत्रं नी पुस्तकं काढा ,
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

थोडसं स्वता:च्या जगण्याचा हिशेब मांडा
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

थोडा वेळ स्वता:सोबत घालवा ,
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

कागद नी पेन वापरून पहा
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

मेंदूला नी शरीर जरा शांत ठेवा ,।
थोडेदिवस घरातच बसायचं आहे

डाळ-भाताची सवय करा,
थोडे दिवस घरातच बसायचं आहे

नसलो आपण तरी जग चालतं
कोण नसेल तर आपलं मात्र अडतं

कुठे नेमकी आपली जागा
जरा शांतपणे शोधायची आहे

आपण आहोत की नाही याची पण खात्री करायची आहे।।

स्वताला सांगा फक्त स्वता:बद्दल
थोडेदिवस घरातच बसायचं आहे



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!