Skip to content

मनातलं दुखणं शरीरात उतरतं तेव्हा…..

मनातलं दुखणं शरीरात उतरतं तेव्हा…..


डॉ. जितेंद्र गांधी

सोलापूर.


आपले मन (मेंदू) व आपले शरीर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत… शारीरिक तंदुरुस्ती बाबतची वाढती जागरुकता व शारीरिक सुदृढतेला आलेले महत्त्व असे असले तरी मानसिक आरोग्याकडे होत असलेले कमालीचे दुर्लक्ष लक्षणीयरित्या वाढत आहे…

शरीर आणि आपला मेंदू यांमध्ये कमालीचे समन्वय असणे गरजेचे आहे (किंबहुना आपला मेंदूच आपल्या शरीराला योग्य व मोठ्या प्रमाणात नियंत्रित करीत असतो) असे असताना सुद्धा आपण आपल्या मेंदूच्या मानसिक आरोग्य बाबतीत किती आग्रही असतो हा खरोखरच संशोधनाचा विषय असेल…

आपल्या मानसिक आरोग्याला खऱ्या अर्थाने जेव्हा आपण दुर्लक्षित करायला सुरुवात करतो किंवा आपल्याला पडलेल्या मानसिक प्रश्नांची उत्तरे न शोधता मनाचे गुंते वाढवीत जातो…. जेव्हा आपण आपले नातेसंबंध, कौटुंबिक व व्यवसायिक ताणतणावाचे नियोजन करीत नाही…. जेव्हा आपण मानसिक स्तरावर आपल्याला निर्माण झालेले “बर्न आऊट” यामधून बाहेर पडत नाही…. तेव्हा एका ठराविक पातळीपर्यंत आपला मेंदू हे सर्व सहन करतो आणि जर सतत सतत त्याच ताण तणावातून जात असेल तर आपला ताण-तणाव तो शारीरिक व्याधी च्या रूपाने व्यक्त करतो…

त्यालाच मानसशास्त्रीय भाषेत सायकोसोमॅटिक (psychosomatic disorder) डिसॉर्डर असे म्हणतात…

आपणास सांगतांना अतिशय खेद होतो की जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडे असणाऱ्या रांगेमध्ये साधारण 40 ते 60 टक्के पेशंटना सायकोसोमॅटिक डिसॉर्डर असण्याची शक्यता नाकारता येत नाही….

सायकोसोमॅटिक आजाराची व्याप्ती व यादी बघितल्यास आपल्याला याची कल्पना येईल…उदा. कंबर दुखणे, पाठ दुखणे, अल्सर, सतत पोट दुखणे, अस्तमा, झोप न लागणे, बद्धकोष्ठता, थकवा येणे, हात पायाला मुंग्या येणे, हात व पायात गोळे येणे, चिडचिडेपणा वाढणे, भूक न लागणे अति भूक लागणे, वजन कमी होणे, लठ्ठपणा इथपासून ते हायपरटेन्शन , हृदयविकार, स्ट्रोक व थायराइड (ही यादी येथेच संपत नाही) व अशा अनेक शारीरिक समस्यांची मुळे आपणास सायकोसोमॅटिक आजाराच्या जवळपास फिरताना दिसतील…

साधारण एक दोन वेळा शारीरिक चाचण्या करून सुद्धा योग्य शारीरिक कारण न सापडल्यास आपला आजार खरंच शारीरिक आहे की मानसिक आहे हे ठरवणे गरजेचे असते… आणि म्हणूनच विनाकारण रासायनिक औषधांनी तात्पुरते बरे वाटणे यापलिकडे आपला शारीरिक आजार मानसिक ताणतणाव व संघर्षातून तर निर्माण झालेला नाही

याचे शास्त्रीय समुपदेशन करून घेणे शारीरिक व मानसिक आरोग्याचे व्यापक संवर्धन ठरेल..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “मनातलं दुखणं शरीरात उतरतं तेव्हा…..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!