Skip to content

Corona : इन्स्टंट इम्युनिटी वाढवण्याचा एक जबरदस्त उपाय!

कोरोना वायरस : इन्स्टंट इम्युनिटी वाढवण्याचा एक जबरदस्त उपाय.


मयुर जोशी


प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक जबरदस्त उपाय. कारण रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकच अत्यंत जालीम उपाय आहे यापासून लांब राहण्याचा आणि अगदी दुर्दैवाने हा रोग झाला तरी त्याबरोबर लढण्याचा.

आज पर्यंत ही मेथड मी माझ्या जवळच्या लोकांना आवर्जून करायला सांगायचो. आज आज हे मी सगळ्यांसाठी सांगू इच्छितो. सर्वांनी एकदा तरी हा व्हिडीओ बघा व दहा मिनिटांमध्ये फक्त अनुभवा किती जबरदस्त बदल आणू शकतात तुम्ही आपल्या शरीरात व मनात.

Wim Hoff नावाचा एक माणूस आईस मॅन म्हणून या जगात ओळखला जातो. त्याने भारतातील भस्रिका प्राणायाम मॉडीफाय केलेला आहे. त्याला wim hoff मेथड असे म्हटले जाते. वही मेथड केल्यानंतर प्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते यावर संशोधनही करण्यात आलेले आहे. व त्याचे सर्व रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत.

या माणसाच्या नावावर इतके जास्त वर्ल्ड रेकॉर्ड आहेत जसे की

1. बर्फाखाली दोन तास सलद बसून राहणे व त्या काळात स्वतःच्या बॉडी मध्ये कोणतेही चुकीचे बदल घडू न येता.

2. सहारा वाळवंटामध्ये जवळपास 48 ते 50 डिग्री तापमानामध्ये पूर्ण 44 किलोमीटर मॅरेथॉन वळणे आणि तेदेखील पाणी किंवा काहीही न पिता.

3. -४० डिग्री टेम्परेचर तापमानात हा माणूस फक्त हाफ चड्डी घालून निवांत फिरत असतो. उघडाबंब.

या सर्व गोष्टी त्याने काही वर्षांच्या जबरदस्त परिश्रमांनंतर मिळवलेले आहेत. परंतु त्याने काय केले आहे याबद्दल तो सांगतो आणि त्याचे रिझल्ट लगेच मिळणार आहेत. Bc

या माणसाची मुख्यतः दोन तत्त्व आहेत. ज्यामुळे तुमची इम्युनिटी प्रचंड वाढते.
1.एक म्हणजे श्वासाचे टेक्निक रोज काही मिनिटांसाठी करणे.
2. जास्तीत जास्त थंड पाण्याने अंघोळ.

मी खाली लिंक देत आहे ज्यामध्ये तो स्वतः त्याच्या ब्रीदिंग टेक्निक बद्दल सविस्तर सांगतांना दिसेल. अगदी भस्रिका प्राणायाम हा सारखाच प्रकार आहे परंतु यामध्ये फक्त नाकाने नाही तर तोंडाने देखील श्वासोश्वास करायचा असतो.

जवळपास पंचवीस ते तीस असे भसाभस छाती पोट सर्व काही भरून श्वासोश्वास करायचे. जोरात श्वास आत मध्ये ओढून घ्यायचा व हलक्याने तो बाहेर टाकायचा. पुन्हा जोराने श्वास आत ओढून घ्यायचा. तो श्वास म्हणजेच त्यातील प्राण आणि ऑक्सिजन आपल्या मेंदूपर्यंत व प्रत्येक पेशी पेशीपर्यंत पोहोचतो आहे अशी जाणीव श्वास घेताना ठेवायची असते.

असे साधारण वीस ते पंचवीस श्वास झाल्यानंतर हाता पायाला मुंग्या येऊ लागतात. मेंदू हलका झाल्या सारखा वाटतो. कारण आपल्या शरीराला तितक्या जास्त ऑक्सिजनची सवयच नसते त्यामुळे हे होते. व असे होणे अत्यंत हेल्दी आहे. हाता पायाला मुंग्या येणे व डोके हलके होणे म्हणजेच तुमची प्रत्येक पेशी त्या ऑक्सिजन ने स्वतःला भरून घ्यायचा प्रयत्न करीत आहे.

असे पंचवीस ते तीस दिवस सलग घेतल्यानंतर श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा. व श्‍वास सोडून दिलेल्या अवस्थेत स्वतःकडे निरीक्षण करत राहायचे आतल्याआत. इतके शांत वाटते इतके पॉझिटिव्ह वाटते इतके जबरदस्त फील येते. आपल्या मेंदूतून आपल्याला सगळ्यात आनंद देणारी द्रव्य स्त्रवयला सुरुवात झालेली असते. त्यामुळे प्रचंड शांतता आणि आनंदाने समाधान या अवस्था जाणवायला लागतात केवळ एका मिनिटाच्या आत.

जितका वेळ असे राहता येईल विश्वास सोडलेल्या अवस्थेत तसे राहायचे. त्यानंतर श्वास आत मध्ये शांतपणे ओढून घ्यायचा. व पंधरा सेकंद ती एक वेगळीच शांतता अनुभवायची.

ही मेथड केल्यामुळे आपले शरीर आपण अरबट-चरबट गोष्टी खाल्ल्यामुळे व योग्य गोष्टी केल्यामुळे ऍसिडिक बनलेले असते ते लगेच अल्कलाईन बनते. आपले शरीर अल्क लाईन असणे म्हणजे सगळ्यात निरोगी असण्याचे लक्षण आहे.

असे तीन वेळा सकाळी केले असता तुमच्यामधील प्रतीकारक शक्ती इतकी प्रचंड वाढेल. कारण या ब्रेडींग टेक्निकचा अभ्यास शास्त्रज्ञांनी पुराव्यासहित केलेला तुम्हाला युट्युब वर किंवा गुगल वर आढळून येईल. Wim hoff मेथड करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या बॅक्टेरियाची इंजेक्शन टोचून त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो हे तपासले गेलेले आहे. व त्या बॅक्टेरिया यांचा ज्यांच्या मुळे ताप किंवा सर्दी-खोकला अशा गोष्टी येतील त्या बॅक्टेरिया चा ही मेथड करणाऱ्यावर फार कमी परिणाम होतो असे आढळून आले.

ही मेथड मी स्वतः करीत असतो. याचे प्रचंड फायदे मला स्वतःला मी अनुभवत आहे.

प्रत्यक्ष या प्रकारचे श्वसन कसे करावे याची लिंक मी खाली देत आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने असे करण्याचा प्रयत्न करावा व तुम्ही स्वतःमध्ये नक्कीच बदल घडून आलेला बघाल. आणि तो देखील प्रचंड पॉझिटिव्ह.

हा व्हिडिओ कृपया करून नीट बघा. खरोखर आयुष्य आणि सध्याचे अत्यंत भीतीदायक वातावरणातून बाहेर पडण्याचा एक खूप जबरदस्त मार्ग आहे हा. आणि खरोखर परिणाम करणारा व दाखवणारा.

जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा कारण याचे फायदे प्रचंड आहेत व मी स्वतः माझ्या अनुभवाने छातीठोकपणे सांगू शकतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!