Skip to content

…..आणि चक्क मी सुट्टी घेतली !

रोहिणी खरात फुलपगार
Psychologist , Psychotherapist

आणि चक्क मी सुट्टी घेतली

काल सकाळी मेडिटेशन झाल्यावर कोवळ्या सूर्यबिंबाकडे बघताना अस्मादिकांना अचानक जाणीव झाली, अरे!बरेच दिवस आपण सुट्टीच घेतली नाही. साधी कॅज्युअल लिव्ह नाही, मेडिकल लिव्ह पण नाही.

ते काही नाही, आज सुट्टी घ्यायची ती पण 12 तासांची! झालं तर मग!आता ठरलं, काही पण नाही,परंतु नाही..

थोडसं हीचकीचायला झालं, कधीच सुट्टी घेतली नाही आणि आता अचानक! करमेल का आपल्याला ! राहू का आपण शांतपणे, निवांत? पण सगळे विचार बाजूला सारले आणि executive ला मेसेज पाठवला.

Executive म्हणजे आपले executive mind ज्याला ब्रेंन मधील prefrontal cortex कंट्रोल करते.

अरे, ह्या सगळयात सांगायचं राहीलच कि मी
सुट्टी कश्यापासून घेतेय ते! तर झाले काय की अस्मादिकांच्या असे लक्षात यायला लागले होते, मी social media चे खूपच अतिक्रमण करून घ्यायला लागलेय रोजच्या जीवनात!मग ठरवले, पूर्ण 12 तास social media, व्हाट्सएप, फेसबुक, यु ट्युब,चॅटींग, मेसेजिंग सगळे बंद !! खूपच महत्त्वाचे असेल तर डायरेक्ट कॉल करून बोलायचं.

माझा executive mind लगेच कॅज्यूअल लिव्ह मंजूर करायला लागला.आधी मला थोडसं झापलं ही..”मी आधीच सांगत होतो, खूप महत्वाच्या गोष्टींकडे तू दुर्लक्ष करतेस हल्ली!तुझे ठरवलेले प्लॅन्स पूर्ण होत नाही, कारण त्यासाठीचा ठरवलेला वेळे पैकी जास्त वेळ तू ह्या social media वर वाया घालवते. कपाटात किती पुस्तके पडलेत, जी वाचायचे तू किती दिवसा पासून पुढे ढकलतेस! डोक्यात किती लेखांचे विषय आहेत, ते आज उद्या करता करता विसरून ही जातेस पण मोबाइल आणि social मीडिया वर ऍक्टिव्ह राहणं काही विसरत नाही. खूप वेळा मी तुला जाणीव करून दिली पण तुझं परत परत तेच.. ठीक आहे,12 तास तर 12 तास! बघू कशी काढतेस हे 12 तास मोबाईल आणि व्हाट्सएप फेसबुक शिवाय!”

आम्ही आपलं सगळं executive चे बोलणे गुमान ऐकून घेतले आणि लिव्ह अप्लिकेशन पुढे सरकवले. पण आला ना तेव्हढ्यात तो! मला परावृत्त करायला. तो हो.. आपले फ्रॉग माईंड!!

तर तो आलाच मला डिस्ट्रॅक्ट करायला.. त्याचे कामच आहे ना,जे काम,ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला बोअर होते, discomfort वाटते, त्यापासून टुणकन उडी मारून जिथे पटकन मन रमेल, आनंद वाटेल, comfortable वाटेल तिकडे आपल्याला वळवणे. मग त्या ऍक्टिव्हिटी, ते काम आपले किती ही महत्वाचे असो, फ्रॉग माईंड आपल्याला त्यापासून बाजूला वळवतो आणि executive माईंड मात्र आपल्याला सतत जागे करत असतो, फोकस्ड राहायला सांगत असतो. आपण जर आपल्या executive माईंड चे ऐकले तर आपले सगळे नियोजित कामे ,प्लॅन्स पार पाडतात. फ्रॉग माईंड चे ऐकले तर आपण तात्पुरते आनंदी, cofmortableहोतो,पण नियोजित कामे न झाल्यामुळे नंतर अपसेट,नाराज ही होतो.

तर अश्या ह्या फ्रॉग माईंड ने माझे मन वळवण्याचा प्रयत्न चालूच ठेवला..’अगं ,तुला करमेल का! तुझी तर दर 15 मिनिटाने व्हाट्सएप वर मेसेज चेक करण्याची सवय आहे.फेस बुक वर किती ही निरर्थक असले तरी पोस्ट्स वाचत बसते.. किती छान वेळ जातो ना त्यात! व्हाट्सएप वर वेगवेगळ्या फ्रेंड्स चे स्टेटस चेक करताना मस्त वाटते !व्हाट्सएप वर आलेले क्षुल्लक फॉरवर्डेड मेसेज वाचण्यात टाइम कसा भुर्रकन पाळतो हे पण कळत नाही.बारा तास तू ह्या सगळ्या आनंदाला मुकणार! शक्य आहे का? मी नाही असे होऊ देणार!”
झाले executive माईंड आणि frog माईंडची रस्सीखेच सुरू झाली आणि निर्णय माझ्यावर सोपवला. मी मात्र ठरवलं की आता executive माईंड चे ऐकायचे, खूप दिवस frog माईंड चे ऐकत आलेय!

आणि executive माईंड ला सांगितले, सुट्टी मंजूर करायला!

नेट सकाळी सहा ला बंद!आता रात्री नऊ पर्यंत चालू करणार नव्हते. सुट्टीवर होते ना मी! आता मी मलाच observe करायचे ठरवले.

सुरवातीला जरा बेचैन वाटले.स्वयंपाक चालू असताना ही किचन ओट्यावर मोबाईल असायचा ना! कपाट आवरताना चार कपड्यांच्या घड्या घातल्या की मोबाईल चेक करायचे, काही वाचायला जरी घेतले तरी एक डोळा मोबाइल च्या स्क्रिन वर!
कोणाचा काय मेसेज आलाय, कोण कुठे जाऊन आलेय, कोणी काय जोक्स, शायरी पाठवली किंवा कोणी काय स्टेटस ठेवलेय!कॉन्टॅक्ट लिस्ट मधील कोण ऑनलाइन आहे आणि किती तरी फ्रेंड्स चे last seen पण चेक करायचे.ह्या सगळ्यात कसा वेळ जायचा कळायचे ही नाही.

पण आज माझ्याकडे खूपच वेळ आहे असे जाणवले. सकाळचे किचन ची कामे पूर्ण मन लावून उरकली ती पण दीड तासातच!छान पैकी दारात रांगोळी काढली, मनासारखे रंग भरले.लेकाबरोबर गप्पा ही मारून झाल्या, त्याची सगळी फँटसी खूप दिवसात ऐकली नव्हती! रॉबिन शर्मांचे The mastery manual चे 4-5 module वाचून झाले. कामाला आलेल्या ताईंशी मस्त पैकी कॉफी घेत गप्पा पण झाल्या. माझे अर्धे राहिलेले लिखाण काम पूर्ण करून झाले.. तरी ही वेळ उरलाच!
अधून मधून फ्रॉग माईंड यायचेच मला बोअर होतंय का हे चेक करायला! पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.एकंदरीत चांगलाच दिवस गेला. लेकाच्या ही साडे बारा पर्यंत लक्षात आले आणि तो ही म्हणाला की सकाळ पासून तुझ्या हातात मोबाईल दिसत नाही, तू बरी आहेस ना?
नाही म्हणायला विचार यायचेच, कोणी काही मेसेज केला असेल का? एखाद्या फ्रेंड च्या लक्षात आले असेल का मी खूप वेळ ऑफ लाईन आहे ते!कोणी काही मजेदार किस्से, जोक्स, शेर पाठवली असेल.. फ्रॉग माईंड टपून होतेच ना माझी सुट्टी कॅन्सल करायला!

मी अजिबात फ्रॉग माईंड ला भीक घातली नाही.
रात्रीं 9:30 ला नेट चालू केले, व्हाट्सएप,फेसबुक चेक केले, काही क्षुल्लक निरर्थक मेसेज सोडले तर गेल्या 15 तासात काही फरक पडला नव्हता. माझी सुट्टी तर कोणाच्या लक्षात ही आली नव्हती.. मी एवढा वेळ ऑफ लाईन आहे हे कोणी नोटीस ही नव्हते केलेले.

आजच्या अनुभवा वरून वाटते की आठवड्यातून एक सुट्टी घेतलीच पाहिजे social media पासून!वेळ भरपुर मिळतो, टार्गेट पूर्ण करण्यासाठी हालचाल सुरू होते, social media वापरताना होणारे भावनांचे आंदोलने कमी होतात. मी तर ठरवलेय, weekly डे ऑफ़ घ्यायचा पण कधी वाटले तर 1/२ दिवसांची किरकोळ रजा किंवा 8/10 दिवसांची दीर्घ रजा घ्यावीच!खूप फायदेशीर असते ती!अनुभव घेतलाय ना मी!! तुमचे काय म्हणणे आहे यावर??

आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!