तुम्ही कधी मुलांना मारलंय? तर हे तुमच्याचसाठी.
सदाशिव पांचाळ
(माईंड ट्रेनर व मोटीव्हेशनल स्पिकर)
9923590942
नमस्कार,
आपल्या मुलांना एखादं सांगितलेलं काम ऐकलं नाही तर आपण काय करतो?
रागावतो नाही का?
कधी कधी तर फटके सुध्दा देतो.
पण खरोखरच हे योग्य आहे का?
याचा अर्थ फटके द्यायचेच नाही असा नाही.
पण अनेक पालक मी पाहिले आहेत, रोज फटके देत असतात. रोज फटके दिले, तर मुलांना मार खाण्याची सवय होते. यामुळे कोडगी होतात. आता काहीही झालं तरी फटके पडणारच, अशी मनाची तयारी करूनच मुले घरी येतील. म्हणजेच ती मुलं तुमच्या हातातून निसटण्याची अधिक शक्यता असते.
आपण जेव्हा मुलाला मारतो, तेव्हा त्याला जो जवळ करतो ती व्यक्ती आपलीशी वाटू लागते. पालकांच्या बाबतीत तिरस्काराची भुमिका मुलांच्या मनात जन्म घेऊ शकते. त्यामुळे मारणे, फटकावणे हा पर्याय असू शकत नाही.
कधीतरी सहा महीन्यात एकदा फटकावणे चालू ही शकेल. पण या घटनेनंतर मुलांना असेच सोडून द्यायचे नाही?, त्याने काही खाल्ले की नाही, उठला की नाही?, आपल्या फटकावण्याचा योग्य परिणाम साधला की नाही, याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी मुलांची आपल्या बरोबरची वागणूक बरोबर आहे की नाही? याचीही पडताळणी पालकांनी करायला हवी.
तुम्ही दिलेल्या मारामुळे मुलांच्या मनात तुमची आदरयुक्त भीती निर्माण व्हायला हवी, द्वेष नाही याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. आपण फटके दिले की आपले काम झाले या अविर्भावात रहाल, तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. आपण फटके दिल्यावर स्वाभाविक आहे की समोरच्या व्यक्तीला राग येणार. त्या त्याच्या रागावर नियंत्रण मिळवून त्याला पुन्हा आपलेसे करण्याची कला पालकांनी अवगत करायला हवी. अर्थात पप्पानी मला मारलंय खरं, पण तितकीच ते आपली काळजीही करतात, विचारपूस करतात, याची जाणीव मुलांना व्हायला हवी.
आपल्या मुलांच्या अभ्यास, वागणूकीच्या समस्या, तसेच अन्य कोणत्याही समस्या असतील तर संपर्क करा. कृपया फोन करूनच भेटणे, ही नम्र विनंती.
काही वर्षांपूर्वी माझा मुलगा आणि माझी भाची पाचवीच्या वर्गात जायच्या पूर्वी सरु झालेल्या मे महीन्याच्या सुट्टीतली घटना. मुलगा आणि भाची यांचे काहीसे भांडण झाले. दोघांनी एकमेकांना चांगलेच मारले होते. मी जेव्हा घरी आलो, तेव्हा भाची आपल्या घरी गेली होती. मुलगा रडत होता.
मला समजल्यावर मी पाठीमागून चार तडाखे लावले. एकही चापटी चेहऱ्यावर मारली नाही. कधीच मुलांना कानशिलात मारू नका. आपण रागाच्या भरात मारतो. जोरात लागल्यास कानावर परीणाम होतो. शिक्षकांनी कानशिलात भडकावल्यामुळे मुलांना ऐकू येणे थांबल्याच्या अनेक घटना माझ्या समोर आहेत.
मुलाला मारल्यावर तो अर्धा तास रडत होता. नंतर त्याला हाक मारून बाहेर बोलावून घेतले. फ्रेश व्हायला सांगितले. कपडे बदलून मी त्याला माझ्या गाडीवरून फिरायला घेऊन गेलो. तिथे एका आईस्क्रीम पार्लर मध्ये गेलो. दोन मोठ्या कोरनेटोच्या आईस्क्रीम घेतल्या. आईस्क्रीम संपल्यानंतर आम्ही आमच्या घराशेजारी एक टेकडी आहे तिथे जाऊन बसलो.
तिथे मुलाला एक गुंडांची गोष्ठ सांगितली. दुसऱ्यांना मारल्यावर लोक आपल्याला काय म्हणतील, आज तीला मारल्यावर आपल्याला एक प्रकारचा कॉन्फीडन्स आला, तो वाढला तर आपण ऊद्या अजून कुणाला तरी मारू. आपण तीला मारले, तीचे आई- वडिल गप्प बसतील कारण तुही आपलाच आहे. परंतू दुसरे लोक गप्प बसणार नाहीत. ते पोलिसांत तक्रार करतील, पोलीस तुला घेऊन जातील, जेवढं तु तिला मारलस, त्याच्या चार पटीने तूला मारतील, चालेल का तूला?
स्वाभाविकपणे उत्तर ‘नाही’ असे होते. आपण दुसऱ्यांना मारल्यास त्याचे परीणाम लक्षात आल्यावर आज पर्यंत कोणालाही हात उचलला नाही. या घटनेला सात ते आठ वर्षे उलटून गेली आहेत.
पालक मित्रहो,
मारून प्रश्न सुटणार नाहीत, प्रेमाने, आपुलकीने सोडवण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती.
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या.
यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***
Nice