मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनी काय काळजी घ्यावी?
आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळून तो आयुष्यात यशस्वी व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. अर्थात त्यात काही चुकीचे नाही; मात्र हे यश मिळवण्याच्या संदर्भातील सर्व संकल्पना पालकांना सुस्पष्ट असायला हव्यात. मुलांच्या या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनीही पुरेसा वेळ दिला पाहिजे. पालक आणि मुले यांच्यातील संवाद आयुष्याच्या यशात महत्त्वाचा ठरतो.
पालकांनी या गोष्टींची काळजी घ्यावी :
▪ पाल्यावर अधिकार गाजवू नये; तर त्याच्याशी मैत्री करावी.
▪ प्रत्येक कृती करण्यास प्रेमाने सांगावे.
▪ पालकांनी आपली भूमिका सांगतांना आपली कृती तपासावी.
▪ मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्या टाळाव्यात म्हणजे मुलांवर ताण येणार नाही.
▪ मुलांना पैशांपेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे. हे तत्त्व नेहमी लक्षात घ्यावे.
▪ पाल्यासाठी स्वतःचा जास्तीत-जास्त वेळ द्यावा.
▪ मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्याव्यात.
▪ स्वतःची चूक झाली असल्यास ती मुलांसमोर मान्य करावी.
▪ प्रत्येकाची प्रकृती ही निरनिराळी असल्याने पालकांनी आपल्या मुलाची तुलना कधीही दुसर्या मुलाबरोबर करू नये.
▪ मुलांसमोर त्यांच्याविषयी नकारात्मक बोलू नये. यामुळे बालमनावर परिणाम होऊन त्यांच्याशी जवळीक साधता येत नाही.
▪ घरातील इतरांसमोर मुलांचे दोष सांगितले जातात, असे कृत्य टाळावे.
▪ आपला पाल्य काय करत नाही, हे सांगण्यापेक्षा तो काय चांगले करतो, ते इतरांना सांगावे.
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.