जीवनाच्या प्रवासात पावलागणिक सुख ठेवले आहे.
लहानपणी मित्रमैत्रिणी बरोबर घातलेला धुडगूस, तारूण्याची मस्ती, इतरांची नजर चूकवून केलेली नजरानजरी,गुलुगुलु केलेल्या गप्पा , पुढे लग्न हे सुखाचे क्षण कोण विसरू शकते ? पुढे पोटात वाढणार बाळ, बाळाचा जन्म, त्याच हसण, खिदळण, दुडुदुडु चालणारी पावलं , विश्वासानी धरलेल बोट आणि बघता बघता स्वावलंबी झालेला तरूण किंवा तरूणी यांच्याकडे पाहताना सुख समाधानाने कंठ भरून येतो.
पण त्याच गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर दुःख.जीवनातील एखाद्या अवस्थेत जास्त वेळ रेंगाळलो तर त्यातील सुखाच प्रमाण कमी होते . जसे – लहानपणीचे खेळ तारूण्यात बालिश वाटतात.
तीशीनंतर तारूण्यातल्या त्या गुलुगुलु गप्पा अर्थहीन वाटतात.
योग्य वयात योग्य गोष्टी झाल्यावर सर्वात जास्त सुख मिळते .अतिसुखातून सुद्धा आनंद मिळत नाही .जास्त मार्क्स मिळवण्याच्या धडपडीत बालपण हरवल जाते . तारूण्यात लैंगिक संबंधात आनंद शोधता शोधता , याचा उद्देश प्रजोत्पादन हा आहे हे विसरल जाते. मनुष्याने या भावनेला अवास्तव महत्त्व दिले आहे. त्यात पाप घुसवून ठेवले . ज्याच्यात लैंगिक भावना कमी आहे तो सात्त्विक आणि ज्याच्यात जास्त तो तामसिक वृत्तीचा.
समाजाने या भावनेला अवास्तव महत्त्व दिल्याने त्याच्याबद्दल आकर्षण व कुतुहल वाढते आणि त्यात इतके गूढ आणून ठेवल्याने त्यातच आनंद असावा अशी चुकीची समजूत.या पार्टनरमध्ये आनंद नाही म्हणून वेगवेगळे पार्टनर बदलने. जोरजबरदस्ती करणे किंवा त्याच प्रदर्शन मांडणे.लग्न केल्यानंतर enjoy म्हणून किंवा करियर म्हणून मुल होऊ न देणे किंवा उशीरा होऊ देणे .
खरंच या सर्व खटाटोपात किती सुख आनंद मिळाला?
कोण खाण्यात तर कोण मद्यपानात तर कोण आराम करण्यात आनंद शोधतो . अतिखाण्याने स्थूलपणा,बद्धकोष्टता असे अनेक आजार जडतात. अती मद्याचे परिणाम तर सर्वांना माहिती आहेत. अति आरामाने मरगळ, बोअर , व्यसनाकडे वळले जाते.असेही म्हणतात” अति तेथे माती”.किंवा एक संस्कृत सुभाषित आहे. ” अति सर्वत्र वर्ज्ययेत ” म्हणजे…
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!