Skip to content

मुलगी होणं खरंच इतकं सोपं असतं का??

मुलगी होणं खरंच सोपं असतं?


बऱ्याच वर्षांनी बालपणीची मैत्रीण कविता भेटली. अतिशय चंचल असलेली आज काहीशी अबोल दिसत होती… चेहरा निस्तेज… कसल्या तरी दडपणाखाली भासत होती… तिला बघून असं वाटलं की आताच रडते की काय… केवळ तीला मी एक आलिंगन दिलं तशी ती ढसाढसा माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडायलाच लागली… वाटलं की तिच्या मनातील दुःखाच्या लोंढ्याला अश्रु रूपाने बाहेर पडण्यास जणू वाटच मिळाली…

मला आठवतंय खुप आनंदी होती कविता जेव्हा तिचं लग्न ठरलं होतं…

कविता आणि मी पदवी अभ्यासक्रम एकत्रच पुर्ण केले. त्यानंतर तिचं लग्न ठरलं… तीसुद्धा नवीन आयुष्याचे स्वप्न पाहु लागली… तिचे आई-वडील लहानपणीच देवाघरी गेले होते. तीचा अन लहान बहीण अनिता यांचा तिच्या मामाने केला. दोघीही मामीच्या जाचाला त्रासलेल्या होत्या….त्यातच तीचं लग्न ठरलं… आता आपलं समोरचं आयुष्य सुखकर होईल अशी अपेक्षा ठेवून तिनं लग्नाला होकार दिला…अन लग्न समारंभ पार पडला.

सासरी आलेल्या कविताचे सुरुवातीचे दिवस खूपच छान होते… जणू तीला एकेक क्षण स्वर्ग सुखाचा वाटायचा…

पण म्हणतात ना नऊ दिवस नवलाईचे… तसाच प्रकार तिच्या सोबत व्हायला सुरुवात झाली… छोट्या छोट्या गोष्टीत मतभेद, त्यानंतर भांडणं आणि नंतर हात उचलणं… बरं होत असलेला प्रकार सांगायचा कोणाला? मामी तर तीलाच दोष देणार… आणि आपल्या माहेरी वापस जाण्याने लहान अनिताच्या लग्नात अडचणी येतील या विचाराने सर्व सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता…

कविता सांगत होती, पहिल्याच वर्षात मुलगा झाला तीला वाटलं आता तिचं दुःख थोडं कमी होईल परंतु कसलं काय आता तर तारेवरची कसरत करावी लागत असे. कारण सासू सासरे नोकरीवर होते… त्यांचे, पतीचं, बाळाचं तीला एकट्याने करावं लागायचं… तीन वर्षांनंतर मुलीचा जन्म झाला…असेच दिवस जात राहिले…मुले मोठी होत होती… अचानक तिला कळले की मुलगी सिकल सेल या आजाराने ग्रस्त आहे… तिला वारंवार रक्त चढवावे लागायचे…. तिच्या तपासण्या, औषधी, तिच्यावर होणारा खर्च या सर्वांवरूनही वाद व्हायचे…आता तर तीला जगणं नकोसं वाटत होतं पण मुलांसाठी ती सर्व सहन करत होती… आणि एक दिवस अचानक मुलगी निघूनही गेली… दुःख तर जणू संपायचे नावंच घेत नव्हते. एका पाठोपाठ एक असे दुष्टचक्र सुरू होते…

अचानक कविता थांबली… मलाही जाणवले की तीचे ते शब्द जणू एखाद्या चित्रपटाप्रमाने माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले… पण चित्रपट आणि वास्तव यांत जमीन अस्मानाचा फरक असतो. चित्रपट केवळ तीन तासांतच संपतो…ज्यात एखाद्याचा संपूर्ण जीवनपट असतो….चित्रपटा प्रमाने जीवनही सहज असतं का?

जीवन म्हणजे सुख दुःखाचा खेळच आहे… कोणाच्या वाट्याला कमी तर कोणाला जास्त…पण यांतही मार्ग काढता आला पाहिजे, परीस्थिती कशीही असली तरी त्यावर सहन करणं हा पर्याय नाही, प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते…

कविताला समजवण्याचा प्रयत्न केला की आता पुढे सहन करण्यापेक्षा आपल्या अस्तित्वाची जाणीव इतरांना करून देण्याची गरज आहे. आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न कर. काम कोणतेही छोटं नसतं तर सुरुवात महत्वाची आहे…. अर्थात घरात विरोध होणारच पण हार मानू नकोस.

गरज पडल्यास मुलास घेऊन बाहेर पड…आपली ओळख निर्माण कर… तिलाही पटलं…आज तीने मुला मुलींकरीता टिफीन सर्विस सुरू केली आहे… आणि त्याच्या बळावर स्वतःचे आणि मुलाचे पोषण करते आहे…

आजही असे उदाहरण समाजात आहेत…गरज आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची…आपण नेहमीच ऐकतो आणि वाचतो की अमुक एकाने त्रासाला कंटाळून मुलासह स्वतःला संपविले… हेही तितकेच खरे आहे की सगळे इतकं विकोपाला जात नाही… अपवाद ही असतात…

संसार हा दोघांचा असतो… दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यास संसार सुखाचा आणि आनंदाचा होतो.

“मुलगी होणं सोपं नसतं… आई-वडीलांच्या घरात परक्याचं धन म्हणून वावरावं लागतं…सासरच्या घरात परक्याची पोरं आहे ऐकावं लागतं…मग स्वतःच अस्तित्व कुठे आहे ते शोधावं लागतं… म्हणुन मुलगी होणं सोपं नसतं.”


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “मुलगी होणं खरंच इतकं सोपं असतं का??”

  1. मंदार माधव बर्वे दापोली

    अर्धवट आहे काहिच अर्थ नाही,का हा गृप जोडला असं झालंय

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!