Skip to content

पालकांकडून मुलांसंदर्भात नकळतपणे होणाऱ्या चुका.

पालकांचीही जबाबदारी आहेच.


सदाशिव पांचाळ

माईंड ट्रेनर व मोटीव्हेशनल स्पिकर
तळेरे, कणकवली.


नमस्कार,

आम्हा प्रत्येक पालकाला वाटत कि आमचा मुलगा/ मुलगी मोठी व्हावी, आई- वडिलांचे नाव त्यांनी मोठे करावे. परंतू ते यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी आपण पालकांनी म्हणून करायला हव्या त्या आपण करतो का? माझा अनुभव सांगतो, कळत – नकळत आम्ही काही चुकीच्या गोष्टी करतो, आणि मग मुले ऐकत नाहीत, अशी तक्रार करतो.एकदा मी एका शाळेत खास शिक्षकांसाठी व्याख्यानाला गेलो होतो. सकाळी सुमारे ११ च्या सुमारास व्याख्यान सुरू केले. दुपारी २ वाजता जेवणाची सुट्टी झाली.

त्यानंतर पुन्हा ३ ते ४.३० पर्यंत मी शिक्षकांची भुमिका काय असावी, मनात भावना काय असावी, अभ्यास मुलांसाठी सोपा कसा होईल, स्मरणशक्ती शास्त्र (निमॉनिक्स) यासारखे अनेक विषय हाताळले. कोणालाही काही शंका असल्यास विचारण्याचे आवाहन करण्यात आले.एका मॅडमनी हात वर करत माझा प्रश्न असल्याचे सुचित केले.

मॅडमचा प्रश्र्न…

माझ्या वर्गात ४२ विद्यार्थी आहे. सगळे जणू दगडच. त्यांच्या समोर डोके आपटले तरीही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. अशाही पद्धतीने समजवा, त्यांना समजतच नाही. गाढव आहेत, सगळेच. यावर काही उपाय सांगा.मी हा प्रश्र्न ऐकून एकदम वितळून गेलो. कारण या मॅडम आपल्याच विद्यार्थ्यांबाबत बोलत होत्या, त्यात दगड काय? गाढव काय? आपल्यापरीने असे विचित्र शब्द प्रयोग करत होत्या.
____________________

मी या विद्यालयात पाहुणा म्हणून गेलो होतो, हे जणू मॅडम विसरल्याच होत्या.

मॅडम स्वत:च मुलांना गाढव, दगड म्हणत असतील तर मग पुढे काय बोलायचे शिल्लक रहीले.असेच काही पालक आपल्या मुलांना बडबडत असतात. एक विद्यार्थी दहावीत आहे. त्याने दोन तास मन लावून अभ्यास केला, थोडासा ब्रेक घ्यावा म्हणून उठून घराबाहेर जेथे मुलं क्रिकेट खेळत होती, तेथे उभा राहिला. इतक्यात त्याचे पप्पा आले, एकदम कडाडले. मुलगा घाबरत आत गेला. पुस्तक घेऊन बसला.
पण, खरंच सांगा, वडिलांना घाबरून पुस्तक घेऊन बसला, पण आत्ता त्याचा अभ्यास होईल का?त्या ऐवजी पप्पानी थोडासा आपला पॅटर्न बदलला असता तर….

मुलगा दोन तासांचा अभ्यास करून, कंटाळा आला म्हणून बाहेर आला, अन् तिकडून पप्पा आले.

अरे,व्वा, कधी आलास?
आत्ताच.

अरे, खेळ ना, इथं उभा राहून काय करतोस?

मी फ्रेश होतो, चहा घेतो, नंतर बघू अभ्यासाचं!

तर त्या मुलाचा अभ्यास कसा होईल?

पालक मित्रहो,

आपले आचार- विचार मुलांना खऱ्या अर्थाने घडवत असतात. त्यासाठी आपण आपली वागणूक चांगली ठेवायला हवी. शिक्षक आणि पालकांनी शब्द चांगले वापरायला हवेत. आपण जबाबदारी झटकून चालणार नाही, इतकेच.


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “पालकांकडून मुलांसंदर्भात नकळतपणे होणाऱ्या चुका.”

  1. खूपच छान लेख आहे, हा लेख वाचून मुलांची मानसिकता लक्षात येते.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!