
निर्णायक वेळ ?????
आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप त्रास देते, हतबल करून सोडते, चिडचिड-रडरड करायला लावते.
अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. त्याचा परिणाम तो एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.
मी तर म्हणेन खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..!
हीच ती वेळ, तुमच्या आयुष्यातील निर्णायक वेळ, पेटून उठा ज्या ज्या लोकांकडून तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता “तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही” अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.
अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.
एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं. नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमध्ये न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.
ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील. तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.
त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!
तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदाने इतरांना नवल वाटावं. असं म्हंटले जात की शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या वेळी रक्त सांडाव लागत नाही. कोणताही सकारात्मक निर्णय अंतर्मनातून घ्या आणि मग घेतलेल्या निर्णया वर ठाम राहा, निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की, जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते..!
येणार काळ हा तुम्ही घेतलेल्या परिश्रमाची पोहोचपवती देणारा असेल, प्रयत्न करत रहा एक दिवस नक्की तुम्ही ठोठावत असणाऱ्या दरवाज्याचे दार उघडेल. प्रयत्न करताना लोकं काय म्हणतील हे पाहत बसू नका, नकारात्मक बोलणारे हजारो जण भेटतील , तुमचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतील आशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही धरलेला पाय वाटेने चालत रहा निश्चितच इच्छित स्थळी पोहचाल.
Be happy,…!
Be strong…!
Live Life…!
Enjoy Life…!
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


ऊत्तम लेख, फारच छान टिप्स, लेख वाचताच मनोबल वाढले.
खूपच छान
फक्त भावनांमध्ये न अडकता पुढे जायचे हे सहजासहजी नाही जमत
पण लक्षात ठेवून आयुष्यात उपयोगी पडेल असाच लेख आहे