Skip to content

संवाद हरवतोय आणि माणूसही!

संवाद हरवतोय आणि माणूसही.


सुरेखा अद्वैत पाटील

मुंबई (पाचोरा)


मोबाईल ने माणसं लांब चाललीयत आणि हरवतोय तो स्वतःच .
मोबाईल फोन ही आजच्या काळाची गरज म्हणायला हरकत नाहीं. एकमेकांच्या संपर्कासाठी आवश्यक आहे. पण ते तर प्रत्येकाच्या हातचं खेळणं झाल्यासारखंच वाटतंय.

परवा चा प्रसंग लोकल ने चर्चगेट ते ठाणे प्रवासादरम्यानचा,, जेमतेम विशीं पंचविशीतील मुली कानात श्रवणयंत्र आणि हातात मोबाईल.. लोकलमध्ये चढण्याची घाई आणि जागा मिळविण्याची धडपड एकाच वेळेस दोन्ही गोष्टी सोबत मोबाईलवर गप्पा.प्रत्यक्ष शेजारी कोन बसलंय याचं सुद्धा भान नसणं म्हणजे हा अगदी वेडेपणाच म्हणावा, मोबाईलमध्ये बघून हसणं आणि स्वतःशी लाजणं..ll

त्यात उतरायची घाई… अतिघाई संकटात नेई हे तर घडणारच. आणि या सर्वाना एकाचवेळी प्लॅटफॉर्म वर उतरायची घाई देखील, अशातच प्लॅटफॉर्म आणि लोकल च्या मधील अंतरात पाय खाली जाऊन अडकून देखील ती मुलगी मोबाईल सोडायला तयार नाहीं म्हणजे जीव जायची वेळ आली तरी आपण त्याच्याकडे आकर्षित होणं एक प्रकारचा वेडेपणा च म्हणावा.

संपूर्ण प्रवासात हेच चित्र बघावयास मिळालं. मनात विचार सुरु झालेत कीं आपण यंत्राच्या स्वाधीन होतोय.. आपण यंत्राला कामाला लावतोय हा आपला आभास. पण प्रत्यक्षात मोबाईल यंत्र आपल्याला कामात लावतोय ही वस्तुस्थिती आहे.. उदाहरर्णार्थ गुगलचच घ्या, आपण गुगल वर सर्च करणार तितक्यात आपल्या सर्चिंगच्या सुरुवातीलाच आपल्या प्रश्नाला उत्तर हजर..

यात मात्र हे खरंय कीं आपण या यंत्रासोबत वाहवत चाललोय.. एकाच कुटुंबातील चारही लोकं एकत्र बसलीत तरी प्रत्येकाच्या हाती मोबाईल. पूर्वीसारखं एकत्र गप्पा नाहीत. किंवा जेवण देखील मोबाईल समोर ठेवून. म्हंणजे ताटातल संपलं तरी लक्ष नाहीं.. या यंत्रामुळं नात्यातला संवाद हरविलाय. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे अनेकांना डोकेदुखी, कानदुखी, चिडचिडेपणा अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतंय. झोप अपूर्ण होतें साहजिकच कामावर लक्ष नं लागणं आलंच. मुलांची एकाग्रता कमी होतांना दिसतेय. लहान मुलं देखील आईबाबा न कडून हट्ट करून मोबाईल वर गेम खेळताना दिसतायत..

जन्माला आल्या आल्या बाळाचे फोटो काढतांना पालक उतावीळ होणारे पालक.. गाणी गोष्टी देखील आई यू ट्यूब ओपन करून शिकवितायत हे चित्र विचार करण्याजोगंच आहे.. वेळीचस्वतःवर आवर घालणं गरजेचं आहे. नाहीतर अभी नही तो फिर कभी नही ही पाळी आपल्यावर येण्यास वेळ लागणार नाही..

मोबाईल मुळे जग जवळ आलं आणि माणसच माणसापासून दूर गेलेत.. तंत्रज्ञानानं माणसाचं आयुष्य सोपं केलं पण त्याचा अतिरेक माणसं करू लागलीत. यात तंत्रज्ञानाचा दोष नसून, तो दोष माणसाचाच आहे हे म्हणणं वावगं ठरणार नाहीं हे मात्र खरं llमोबाईल चे फायदे आहेत तसे तोटेपण आहेत. विचार आपल्याला करायचाय ll
थांबायचं कीं सुरु ठेवायच निर्णय सर्वस्वी आपलाच ?



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!