तनहाई….?
जशी समुद्राला भरती ओहोटी असते तशी मनालाही असते कोणताही माणूस कायम उत्साही आनंदी असू शकत नाही.
डिप्रेशन ही मनाची एक अशी अवस्था आहे ज्यात सुचेनासं होतं नविन दिसणं बंद होतं कोळशासारखी बर्न आऊट होण्याची अवस्था.अंधारात कोंडलं गेल्यावर वाटते ती असहायता भीती आणि गोठलं जाण्याची भावना म्हणजे डिप्रेशन…कशातच स्वारस्य न उरणं आणि जगण्यातलं चैतन्य हरवणं. समुद्राचा तळ गाठण्याची अवस्था.
एकदा हे डिप्रेशन जाणवू लागल्यावर पहीली गोष्ट म्हणजे त्याचा सहज स्विकार ! सर्दी झाल्यावर आपण करतो अगदी तसा !
या काळात कृतीशील रहाणं आणि जीवनशैलीत बदल या दोन गोष्टींवर आपण काम करायला हवं.
थकवा आणि ऊर्जा कमी असली तरी #एका जागी आणि एकांतात रहाणं शक्यतो टाळावं.
एखाद्या समस्येमुळे डिप्रेशन आलं असेल तर त्या समस्येचा विचार न करता मेंदूला सतत,काय करता येईल ?असा #प्रश्न विचारावा.
खरंतर कृतीची आज्ञा न देता दुःखाची वारंवार उजळणी करत बसल्याने मेंदू हँग होतो त्याला काम हवंय ते द्या. मन तयार नाहीये असूद्यात कारण ते एक्झाॅस्ट झालंय अशा वेळी छोटी छोटी ध्येय घ्या. लहानसं काम घ्या. पुर्ण करा.
मेंदूत एखादं काम पुर्ण झाल्यावर डोपामाईनचं सिक्रिशन होतं जे आनंद देणारं आहे.काॅफी प्यायल्यावर कृत्रिम पध्दतीने हेच होतं पण खरी पध्दत लहान काम पुर्ण करणं.
निसर्गाच्या सहवासात जाणं, झाडांना स्पर्श करणं, माती,गवतावर डोळे मिटून बसणं,आकाशाकडे पहात ध्यान करणं याने फायदा होतो.
भरभर चालणं योगासनं सुरु करावीत.शांत वाटेल आवडतील अशा ठिकाणी जावं.
मुळात वारंवार डिप्रेशन आहे असं न म्हणता #होतं असं बोलावं आणि भूतकाळात त्याची रवानगी करावी.
कपड्यांचं कपाट घर आवरुन वस्तूंची एनर्जी चेक करावी,घरात उदास नकारात्मक आठवणी किंवा भावना निर्माण करणा-या वस्तू आहेत का ते पहा.घरातली रचना बदला.
प्रयत्नपुर्वक सवयींचं तीन महिन्याचं नियोजन करा. एक एक तासाचे अलार्म लावून जागा बदला पाणी प्या,विचारांचं ऑडिट करा. नव्या कार्यक्रमांचा शोध घ्या नविन लोकांना मुद्दाम भेटा.चरित्र आत्मचरित्र वाचा.
आयुष्य सुंदर आहे आणि नैराश्यात जाणारा वेळ आत्मपरिक्षणात घालवायला हवा …परिस्थिती बदलत नाही आपल्याला बदलावं लागतं. आयुष्याची मनाच्या आरोग्याची जवाबदारी आपलीच आहे हे ओळखून हे आव्हान स्विकारून आपल्याला पुढे जायचे आहे हाच विचार करायचा आहे.
चल अकेला …या गाण्यातले शब्द छान आहेत…पुरा खेल अभी जीवनका तुने कहाँ है खेला?
खेळ पुर्ण करायचा आहे !
सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
Khup chan