Skip to content

अभ्यास फक्त मार्क्स मिळवण्यासाठी करायचा?

अभ्यास फक्त मार्क्स मिळवण्यासाठी करायचा?


ऋचा पाठक


“मला तर ना या अभ्यासाचा फार कंटाळा येतो” अगदीच सहज विद्यार्थी हमखास हे वाक्य उच्चारतातच! मला गणितं सोडवताना झोप येते किंवा इतिहासाचं पाठांतर मला अजिबात लवकर होत नाही किंवा अश्या अनेक समस्या विद्यार्थी दशेत असताना सामोऱ्या येतात.

पण खरंच काय कारण असेल,अस होण्याचं? ज्या वेळेला ह्या विषयाच्या खोल जाण्याचं ठरवलं तेव्हा मला दोनच गोष्टी आढळल्या त्या म्हणजे

1. मुलांना अभ्यास का करायचा हेच आजपर्यंत माहिती नाहीये किंवा माहिती नसतं अस म्हणू आपण.

2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास म्हणजे फक्त एक पुस्तक,प्रश्न आणि त्यांची उत्तरे इतकाच समज मुलांचा झालाय.होय! वर दिलेल्या 2 गोष्टीमुळेच हल्लीच्या मुलांना अभ्यास करण्यात मन रमत नाही किंवा मग झोप येते .तर माझ्या प्रिय बाल मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज हा लेख तुम्ही वाचत असाल तर माझी पूर्ण खात्री आहे या दोन्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.

——————————————————————
अभ्यास का करायचा?

अभ्यास का करायचा हा प्रश्न आपल्या मनात येतोच, अगदी सहाजिक आहे ?..

मग काही काही वेळेस पालक सांगतात की एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी अभ्यास करायचा, मार्क्स चांगले मिळवण्यासाठी …

हो मार्क्स चांगले मिळवणे हे तर कारण आहेच! पण फक्त मार्क्स चांगले मिळवणं हेच अभ्यासाचं उद्दिष्ट्य आहे का?? तर तस अजिबात नाही..

ज्या वेळेला तुम्ही फक्त चांगले मार्क्स मिळवणं हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करत असाल तर 100 टक्के तुम्हाला अभ्यास करताना पाठांतर करताना नक्कीच झोप येणार किंवा कंटाळा येणार!

पण मला विज्ञानाचा अभ्यास करून वेगवेगळ्या संशोधनाची माहिती मिळणार आहे,नव्या नव्या शास्त्रज्ञांची माहिती मिळणार आहे,बटण दाबलं की पटकन दिवा लागतो ,पण आज मला त्या दिव्यासाठी एडिसन ने किती प्रकारे प्रयत्न केले , Derivations ,Laws , Formulas ची माहिती मिळणार आहे ,हे किती छान आहे सगळं!अस ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मनाशी च म्हणता त्या वेळेस मी लिहून देते मग जगातला कुठलाही तुमचा नावडता विषय असुदे ,तुम्हाला झोप किंवा कंटाळा कधीच येणार नाही. अगदी असच तुम्ही बाकीच्या विषयांसोबत करा..

Economics वाचताना,मला ह्यातून माझ्या देशाची आर्थिक परिस्थिती जवळून अभ्यासता येणार आहे, कारभार कसा चालतो हे समजणार आहे आणि माझ्या ज्ञानात भर पडणार आहे..कोणताही विषय घ्या! ह्या विषयामुळे माझ्या ज्ञानात भर पडणार आहे असं म्हणून काम केलंत तर 100 टक्के तुम्हाला कंटाळा येणार नाही,आणि मग तुम्हाला तुमचे मार्क्स वाढवण्यातही मदत होईल…??

——————————————————————-
अभ्यास करणं म्हणजे फक्त पुस्तकातच,वही पेन लाच चिटकून राहणं अस आहे का?

तर माझ्या मित्र मैत्रिणींनो, अस अजिबात नाही. तुम्हाला तुमच्या पुस्तकातील अक्षर न अक्षर येत,समजलंय, पण तुम्हाला बाहेर च्या जगाचं काहीच ज्ञान नाही ,अस असून चालेल का??

मुळीच नाही चालणार!

आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे पण किती जण दररोज त्यावर बातम्या किंवा काही news पाहतात??किंवा कितीजण तुमच्या शालेय गोष्टी Youtube वर पाहतात?? अगदी थोडकेच आहेत! ..

तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींची माहिती असणे अनिवार्य आहे. अवांतर वाचन करा,यामुळं तुमच्या बुद्धिकोशात भर पडेल,तुमचे विचार सुधारतील..तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल..करून तर बघा…चांगली पुस्तक वाचणं ,चांगल्या गोष्टी शिकण आणि त्या आत्मसात करणं हा ही एक प्रकारचा अभ्यासच तर आहे,नाही का!??


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “अभ्यास फक्त मार्क्स मिळवण्यासाठी करायचा?”

  1. सुभाष वाघ

    खरंय मी सुरवातीला अभ्यास हा परीक्षा पास होण्यासाठी करत होतो त्यामुळे मला पुस्तक वाचताना झोप येत होती, मग मला सरांनी सांगितले की तू जे वाचशील त्याचा संदर्भ जीवन जगताना कुठे कुठे उपयोग होतो याचा विचार करत जा आणि मला सांगत जा. तेव्हा पासून मला अभ्यास करावा वाटतो आणि तो कायम लक्षात राहतो.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!