भाग्यश्री पाटील
मीच मला नव्याने ,
आज पुन्हा शोधते…
तोडून बंधने,
मोकळी वाहते…
झुळूक जरी ,
तरी सुगंध जीवनाचा सहज पसरवते…
मीच मला नव्याने,
आज पुन्हा शोधते….
माझ्या मनाच्या चार भिंतींना,
दार मर्जीचे लावू पाहते…
हातात किल्ली आणि कुलुपसुद्धा हातातच,
अस काहीस बंदीस्त दुसऱ्यांना,
पण माझं स्वातंत्र्य मी माझ्याच हातात ठेवते,
मीच मला नव्याने,
आज पुन्हा शोधते…
अनोळखी वाटा,
ओळखीच्या करता करता,
वळणे स्पष्ट निरखून ठेवते….
चुकीची वाट वाटताच,
परत फिरताना..
मग वाट कशी सोपी वाटते….
परतून जो उसासा टाकते,
डोळे घट्ट मिटुनी ,
पुन्हा मी मग स्वतःशीच हसते….
मीच मला नव्याने,
आज पुन्हा शोधते…..
अशीच शोधत…
मी मला सापडते ….तर कधी हरवून जाते..
पण हरवल्यानंतरही परत,
मीच मला नव्याने ,
नेहमीच पुन्हा पुन्हा शोधते….
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.