
“प्रेम”…..
ज्यांना वाटते की आपल्या जोडीदाराला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही त्यांनी जरूर वाचावं…
आपल्या जोडीदारावर प्रेम करण्याची पद्धत काय?
एक उदाहरण,
एक नवरा रोज सकाळी- सायंकाळी आपल्या पत्नीचा हात हाती घेवून तिला I love you म्हणत असे. सुरुवातीला काही दिवस पत्नीला वाटायचं ,”किती प्रेम करतो आपल्यावर हा”….काही दिवस / महिने/वर्षे गेली, नवरोबाचा नित्यक्रम काही चूकला नाही. पत्नीला आता याचं काही विशेष वाटत नसे. नंतर नंतर तर ती वैतागू लागली, भांडू लागली. प्रेम प्रकट करायचा दूसरा काही प्रकारच नाही का? मी नाही देणार हातात हात वगैरे वगैरे.
पण तरी नवरोबा काही सूधारले नाही. ती कितीही चिडो, रागावो ते तिचा हातात हात घेऊन I love you म्हणणारंच.
एके दिवशी हा नवरा कामावर गेला, तो परतलाच नाही. तिकडेच त्याचा अपघात झाला. पत्नी खूप रडली.
काही दिवस गेले. आता जरा दु:ख कमी झाले होते, मुलांत मन रमत असे. अचानक एक प्रकार सुरू झाला. तिला रोज सकाळी झोपेतून उठताच हाताला नवर्याचा स्पर्श जाणवू लागला व कानात तेच शब्द ऐकू येवू लागले. हे बघून ती आश्चर्यचकीतच झाली. होय, जोडीदार तर गेला पण त्याचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता खरे सुरु झाले होते….
होय, तिच्यावर नवर्याचे खूप प्रेम होते. तो हूशारही होता, त्याला माहिती होते कि रोजमर्राच्या धांदलीत प्रेम व्यक्त करणे शक्य नसते व व्यक्त केले तरी समोरच्याला कळेलच असे नसते.
पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, हि विचारशक्ती महत्वाची, म्हणून त्याने आधीच विचार करून ठेवला होता की, “जर कधी माझे जीवन संपेल पण तरी आपल्या प्रेमाला कधी संपवायचे नाही”
आणि ह्या विचाराने त्याने तिला रोज इतके प्रेम देवून ठेवले की आता आयुष्यभर तीला त्याचे नसणेसुद्धा जणू त्याच्या असण्याचीच जाणीव करून देईल.”होय हेच प्रेम… व्यक्त करण्याचा प्रकार महत्वाचा नाही, व्यक्त करणे महत्वाचे.
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??



Kharach Khup mast
Wife And Husband Unbelievable Relations
nyc… mastch ahe…
खूप छान