
राजहंस वेडे
पुणे.
आजची ही धावपळ मनुष्याला आपल्या ध्येया पर्यंत पोहोचवेल की नाही ह्याची शाश्वती नसणारी आहे, असे आपण म्हणतो. आश्चर्य महणजे कोलंबसने आपलं गलबत जेंव्हा समुद्रात उतरवलं तेंव्हा आपण कुठे पोहोचणार हे त्यालादेखील माहित नव्हते.
चुकली दिशा जरी, हुकले न श्रेय सारे II
वेड्या मुशाफ़िराला, सामील सगळे तारे II
हा आत्मविश्वास त्याचा जवळ होता. शिवाय दुर्दम्य इच्छाशक्ती. या बळावर त्याने यश आपलेकडे खेचून आणलं. आजुबाजुला जर नजर टाकली तर असे कितीतरी लोक आपल्या समाजात दिसतात.
जगा वेगळे करण्याचे काही लोकांना वेड असते. स्वत:ची कार्यक्षमता व शंभर टक्के झोकून देण्याची वृत्तीच कामावर येते. लेखक, चित्रकार, कोणतेही क्षेत्र असोही झेप म्हणजे एक साधनावस्थाच. ही अवस्था नवनिर्मिती घडवित असते. हे वेडेपण लेखक, कलावंत समाजसेवी माणसं, शास्त्रज्ञ आपल्या कामातून दाखवून देतात. बॅरिस्टर असूनही देशाचा वकीलीसाठी महत्मा गांधींनी पोटार्थी वकीली सोडून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशप्रेमापोटी हाल-अपेष्टा भोगल्या. बाबा आमटे यांनी कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी जीवन समर्पित केले. खाण्या-पिण्याला फ़ाटा देऊन गॅलिलियो, न्यूटन, आईन्सटाईन, सी. व्ही. रमण ह्या शास्त्रज्ञांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आहोरात्र कष्ट उपसले. माणसाला कसलतरी वेड असलचं पाहिजे, पण ते सकारात्मक हवे. नाहीतर आपण खेड्यात तासंतास पारावर गप्पा मारत बसलेली मंडळी पाहतो. कुणाकडून तरी चहा ऊकळणे हेच त्यांचे वेड असते. आजच्या काळात तो कालापव्ययचं असेल.
सामान्यपणे समुद्र पक्षी एक छोटासा मासा पकडतात व समाधानी राहतात. परंतु “जॉनायन सीगल” हा असा पक्षी आहे जो आकाशात खूप-खूप उंच उडण्याची स्वप्न पाहतो. ह्या आकाशात काय आहे हे शोधण्याची प्रचंड जिज्ञासा त्याचेमध्ये आहे. त्याला आकर्षण आहे ते उदात्त्ततेचं, भव्यतेचं, आकाशाला स्पर्श करण्याचं. त्याचा जातीबांधवांनी तर त्याचावर बहिष्कार घातला, पण दैवयोगाने जॉनायनला त्याचासारखेच ऊंच ऊडणारे “माझिया जातीचे भेटो मज कोणी” असे मित्र भेटले. त्यांचा बरोबर उडत-उडत तो एका स्वर्गीय, अनोख्या प्रदेशात पोचतो. अस्तित्वाचा अर्थ कळू शकेल, शंका समाधान होईल असा तो प्रदेश.
तिथे त्याला त्याचापेक्षाही बुद्धिमान “चिऑन” नावाचा पक्षी भेटतो. जीवनाचा मर्म सांगणारा तो सद्गुरु. “मी कोण” हे त्याला कळतं. स्वत:चा शोध संपवून एक नवीन प्रवास सुरु होतो. आता त्याचे कार्य काय, तर स्वत: जवळ असलेला ज्ञानाचा प्रकाश दुसऱ्या पर्यंत पोहोचविणं. ज्ञानेश्वरांची, तुकारामांची कथाही अशीच नाही का ? ज्यांनी-ज्यांनी आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांची अवस्था अशीच.
जगावेगळे वागणारे लोकचं जग घडवतात. आपण सु:ख-दु:ख फ़ायदा-तोटा सोयी-गैरसोयी यातच रमलेले. आत्मशोधाचं सु:ख आणि समाधान मिळालं की जीवन सुंदर होतं. आपल्या मूल्यांप्रमाणे जगता येणं हे सद्भाग्यचं, मात्र त्याकरिता अनेक अडचणींना समोर जाण्याचं धैर्य अंगी बाळगावे लागते. आत्म्याकडे नेणारा हा प्रवास परमात्म्या पर्यंत पोहोचतो. त्ळ्यात असलेल्या सुरेख बदकांचा पिल्लांमधील ते वेडं पिल्लू एकटं जरी पडलं तरी त्यला जाणीव होते “तो राजहंस एक”.
आपल्याला असे वेड लागले तर आपल्या हातूनही जगावेगळी कामं पार पडतील. आपल्या अथक प्रयत्नांना चांगले कोंदण मात्र लाभावे. आपली इच्छाशक्ती दुर्दम्य करणं जमेल आपल्याला ?
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


Kelh khup changla he
Sudha tai dr bhimrao ambedkar ni khup motha dheyavede hote .tyni pn khup kahi kel tuma aamchy sathi