Skip to content

समस्त स्त्री वर्गास आपुलकीचं आवाहन ?.

जागतिक महिला दिनानिमित्ताने समस्त स्त्री वर्गास आपुलकीच आवाहन.


सुरेखा अद्वैत पाटील

मुंबई (पाचोरा)


भगिनींनो आपण कुणाची लेक, कुणाची बहीण, कुणाची वहिनी, बहीण तर कुणाची पत्नी असे एक नाही तर अनेक पात्र आपल्या दैनंदिन जीवनात निभावत असतो. खरं म्हणजे स्त्रीचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. जोवर आपण स्वतः ठरवत नाही तोवर आपला आत्मसन्मान कोणीही मोडू शकत नाही. सतत आपण कुठून कुठे तरी चालत असतो कधी पायांन तर कधी मनानं कुठेकुठे भिरभिरत असतो. एखाद्या संवेदनशील गोष्टीत मन गुंतून पडतं. साचलेल् सगळं कधी ना कधी गळून पडतंच.

स्त्रीने स्त्रीला समजून घ्यायला हव. आपण जी नाती निभावतो त्यात कुठेतरी स्वार्थीपणानं वागतो. उदाहरणार्थ सासू आणि सून, नणंद आणि भावजय व जावा जावा, तर कधी कार्यालयीन महिला असे एक नाही अनेक संबंध. ज्यात स्त्रीच स्त्रीची तुलना करत असते.. आमच्या वेळी असं होतं तुमच्या घरी आता असा आहे. त्यामुळे तुम्ही घरातल्यांचा सांगितलेला ऐकावं. ही भाषा सासू किंवा नंणदची असते. किंवा जावेची सुद्धा. सून म्हणून आपल्या कुटुंबात आलेली मुलगी घरच सगळे सोडून आलेली असते…तीही अगदी साखरेसारखी असते. जी सासरच्या कुटुंबात नकळतपणे विरघळते.. खरंतर सासरचा रोजचा दिवस हा तिच्या आत्मसन्मानाचा आणि कसोटीचा असतो.. तिला समजून घ्या तिला उमलू द्या.

आपली स्वतःची मानसिकता बदलवा. बदलाची सुरुवात आपल्यापासूनच करूया.. बऱ्याचशा स्त्रिया दुसऱ्याचं उणं दुन काढण्यात. आपला वेळ वाया घालवतात स्वतःच्या मनाला छान वाटतं म्हणून दुसऱ्याशी तुलना करण्यात आपण आपला वेळ आणि आत्मसंतुलनही वाया घालवतो. स्वतःला छान वाटाव म्हणून एक बाई दुसर्या बाईशी हेतूपुरस्पर वाद आणि विरोधही करते.. स्वतःला छान वाटाव म्हणून काही गोष्टी करताना आपल्या हातून दुसरीवर अन्याय होतो आहे याची जाणीव असावी. खरंतर आपण केलं तर समजण आणि कळण हे नंतर आपसूकच येतं. खरं सांगू बाई, बाईच बाई च्या जीवावर उठते, आपणच आपला अहंकार बाजूला ठेवावा. अहंकार बाजूला ठेवल्यास नाती जवळ येतात.

कुणाचा घात करण्यापेक्षा कुणालाही हात द्यावाll. स्त्रीने स्त्रीला शिकण्याची संधी द्या. तिचं उणं दून काढण्याची संधी नका साधू. पाठ फिरवणे पेक्षा पाठीशी उभे असा… शब्द फिरवीण्यापेक्षा शब्द पाळायला शिका.. जवळ राहून देखील एकमेकांशी परक्यासारखे वागू नका.. नशिबाने दिलेल्या प्रत्येक नात्याशी जुळवून घ्याव. गोड बोला गोड वागा, सहजच विसरून सारे कुठलेही सल मनात जपू नका. एकमेकींना प्रोत्साहन द्या.. तुझ्यात जे चांगलं ते माझ्यात असावं, माझ्यात जे चांगलं ते तुझ्याकडे असावं. कुठलीही सूडबुद्दी न ठेवता मनाने एकत्र या.

प्रत्येक स्त्रीच्या मनातला बाह्य दीप उजळून आणि अंतर दीप देखील उजळूनि निघावा या जागतिक महिला दिनी.

कमवित्या स्त्रीने कधीही गृहिणी असलेल्या स्त्रीला कमी दर्जा देऊ नये.. कारण गृहिणी असलेली स्त्री आपलं उभ आयुष्य आपल्या कुटुंबासाठी झटत असते. आपला उभा संसार सांभाळते, मुलांच्या पंखात बळ आणते, पै पाहुणे वडीलधारी मंडळी बाळ गोपाळ आणि आप्तस्वकीय नातेवाईक स्नेही मित्र मंडळाचे आदरातिथ्य करण्यापासून ते रुसवे-फुगवे अंगावर झेलण्या पर्यंत सारं निमूटपणे सहन करते..
सासू-सुनांच्या नात्यांमध्ये पण नक्की सुसंवाद असावा. आपल्याकडे घरातील वडीलधाऱ्या माणसांशी आदराने बोलण्याची पद्धत असते. म्हणजे ते आपल्यावर केले गेलेले संस्कार असतात. त्याचा नियम ही आपण काटेकोरपणे पाळायला हव. सासूने देखील सुनेला समजून घ्यायला हव. आपल्या चालीरिती तिला समजावून सांगा.. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे हा सुर सोडून द्यावा..

आजची स्त्री आपल्या इच्छा व्यक्त करायला संकोचत नाही. ती तिच्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम भोगायला तयार असते. घेऊ द्या तिला स्वतः स्वतःचे निर्णय!

जेव्हा स्त्री स्त्रीला साथ देईल तेव्हाच विचारांची क्रांती निर्माण होईल. गरज भासल्यास क्षमा मागावी. क्षमा मागितल्याने तुम्ही चुकीचे होत नसतात.. क्षमेचा खरा अर्थ तुम्ही नातं टिकवण्यासाठी लायक असणार हेच. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेलं खरं स्वातंत्र्य म्हणजे तिला तिचे विचार जगण्याच स्वातंत्र्य,, ननंद भावजय जावा, जावा, सासु, सुना परस्परांना आपुलकीने स्वीकार करा.. एकमेकांवर प्रेम करा.. असे तर नाही ना की आपलेच काहीतरी चुकते. अशावेळी स्वतःमध्ये बदल करा.. चहूबाजूने बदल झालेला दिसेलll. एकमेकांचा समान धागा ओळखणे.. ही पण एक कला आहे.. जर तुम्हाला तुमच्या आवडी-निवडी एकच आहेत हे कळलं तर त्या व्यक्तीशी सूर मिळण्यास मदत होईल..

जशास तसे तत्व थांबवा. तिने माझा अपमान केला, तिने माझी मस्करी उडवली., ती माझ्यावर हसली.. या गोष्टींना अजिबात थारा देऊ नका.. चांगले कुटुंब आणि मित्र परिवार म्हणजे जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग..

कोणत्याही छोट्या मोठ्या.. गोष्टींसाठी स्त्री, स्त्रीला जबाबदार धरत असते हे कसं चुकीचं आहे हेच आपण समजून घ्यायला हव.. आणि हे सारं थांबायला हवं.. यानिमित्ताने एक कविता कवी नारायण सुर्वे यांची
तूच तुझी वैरी, स्त्री पुरुष समानता विचार मले पटते, खरं सांगतो बाई, बाईच बाईच्या जिवावर उठते. माणसानं म्हणतात, मागं ठेवल्या बाया..
पण एका हाताने सांगा वाजतात का टाया?

माणूस म्हणून स्त्री-पुरूष सारखेच माना, प्रगतीच्या प्रवाहात दोघांयले आणा.. भेदभावाची दरी मग आपोआपच मिटते.. खरं सांगतो बाईच,, बाईच्या जीवावर उठते…

स्त्रीच्या अर्ध्या आभाळातला श्रद्धेचा, मायेचा आपुलकीचा आणि आत्मसन्मानाचा विश्वास सूर्य कधी ना मावळो हि महिलादिनी सर्व समस्त भगिनींना शुभेच्छा..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!