
स्त्री-पुरुषांमधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Attraction.
स्त्री-पुरुष नात्यातली सर्वात महत्वाची गोष्ट मला वाटते ती Attraction आणि इथे दोघांचं Attraction भिन्न…. पुरुषांचं आकर्षण बहुतांशवेळी हे शारीरिक असतं… तिची ही कशी..तिचे हे ..कसे.. तिची शरीराची ठेवण कशी… ती नाकी डोळी कशी ह्यावर पुरुष लट्टू होतात… तर स्त्रियांचं Attraction पुरुषांच्या तुलनेत नुसतं शारीरिक न राहता इतर बाबींवर विभागलं जातं…स्त्रियांनाही Tall..Dark Handsome..वगैरे पुरुष आकर्षित करतात…. पण जेव्हा Long Term Relation चा विचार येतो..तेव्हा स्त्रियांचा Preference हा बहुतांशवेळा पुरुषाच्या सोशल गोष्टी आणि त्याची हुशारी यावर होऊन जातो… म्हणजेच स्त्रियांचं Attraction हे नुसतं शारीरिक न राहता मग ते वेगवेगळ्या बाबींत उतरतं… तिला उत्तम खेळ खेळणारा.. गाणारा.. नाचणारा आवडतो… तिला उत्कृष्ट वक्तृत्व असणारा… छान लिहिणारा.. विचार मांडणारा किंवा मग मनसोक्त हसवणारा आवडू शकतो… स्त्रियांचा स्वतःचा भावनिक गुंता एवढा असतो की कोणीतरी रिझवणारं.. रिलॅक्स करणारी लोकांची कंपनीही त्यांना प्रिफर्ड वाटते… पैसेवाला आणि नाम..फेमवाल्या पुरुषांकडे देखील स्त्रिया पटकन आकर्षिल्या जातात… पुरुषाचा सुंदर स्त्रियांचा अट्टाहास आणि स्त्रियांचा श्रीमंत..हुशार पुरुषांचा अट्टाहास.. दोघंही चुकीचे नाहीत… प्रत्येकाचा हव्यास हा वैयक्तिक आहे…आणि त्यामागे तशी उत्क्रांतीची कारणं देखील आहेत…
सेटल पुरुष निवडण्यामागे स्त्रियांचं आईपण कारणीभूत ठरतं… प्रेग्नंसीमध्ये माझी सर्वार्थाने काळजी घेणारा असावा.. आणि मुलं जन्माला घातल्यानंतर त्यांचं पालन..पोषण करता यावं.. एवढा तो विकसित असावा हा एक जुना पुराना जीन्समध्ये रुळलेला विचार पिढ्यानपिढ्या पुढे जात असतो…तर स्त्रियांच्या अवयवांकडे Attract होण्याऱ्या पुरुषाच्या डोक्यात.. आपल्या मुलाचं संगोपन व्यवस्थित करणारी आई ही Definition डोक्यात असते… छान ब्रेस्ट असणारी स्त्री माझ्या मुलांना पुरेसं दूध पाजू शकेल अशी एक आदिमानवी धारणा आहे… स्त्रियांच्या काही अवयवांमध्ये मध्ये अव्वाच्या सव्वा इंटरेस्ट असण्याचं कारण काय म्हणून जेव्हा रिसर्च झाला.. तेव्हा त्यांना आढळलं की स्त्रियांच्या त्या अवयवांमध्ये मध्ये ओमेगा ३ फॅट्स स्टोर केले जातात… जे बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी खूप गरजेचं असतं.. स्त्रियांना शारीरिकदृष्ट्या आवडणाऱ्या पुरुषांत स्त्रियांचा Preference उंच..छान पिळदार शरीरयष्टी असलेला..रुंद जबड्याचा.. पुरुष निवडला जातो… आणि पुन्हा त्याचंही कारण तेच आईगिरी.. असे पुरुष जास्त Fertile (सुपीक) असतात… म्हणजे अशा पुरुषांचे हुशार स्पर्म्स अंड्याला भिडणारे असतात.. हा समज उक्रांती देते… जरी एखाद्या पुरुषाला पाहताना वा स्त्रीकडे आकर्षिला जाताना ह्या गोष्टी डोक्यात येत नसल्या तरी त्यामागे तुमचे जीन्स त्या सिद्ध झालेल्या उत्क्रांतीपायी तशा गोष्टी करवून घेतात…आपण आपल्या जीन्सचे गुलाम आहोत.. जीन्स आपल्याकडून त्यांना हव्या तशा गोष्टी करवून घेतात…स्त्रियांच्या आकर्षणात गंध हा एक फॅक्टर खूप काम करतो…पुरुषांच्या शरीरातून येणाऱ्या गंधावरून स्त्रियांचे जीन्स अशाप्रकारे काम करतात की त्या गंधावरून हा पुरुष मला किती सूट होईल हे ते जीन्स ठरवतात…एक स्टडी करण्यात आला…तिथे बायकांना वेगवेगळ्या पुरुषांचे घामाने भिजलेले टीशर्ट देण्यात आले.
त्या नुसत्या टीशर्टवरून तिला Most Attractive पुरुष निवडायला सांगितला… त्यातून त्यांनी त्या पुरुषाचा टीशर्ट निवडला ज्याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आणि विविध आहे… म्हणजेच माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीत बेस्ट जीन्स यावेत हा त्या स्त्रीच्या जीन्सचा अट्टाहास हे सगळं जीन्स ठरवतात..पुढ पण हे सगळं Genes ला कसं कळतं ? तर गंधावरून. स्त्रियांच्या गंधाद्वारे Genes ला मेसेज जातो.. त्या पुरूषाचे Genes मेटिंगसाठी कितपत योग्य आहेत हे त्यांना कळतं… भाऊ आणि बापाचे जिन्स हे मेटिंगसाठी सर्वात घातक आहे हे जाणून जिन्स कमिटी स्वतःहून विरोध करण्याचा निर्णय घेते..खुप पुरुषांच अस मत असत की..साला मला मुली ..बायका खूप आवडतात यार.. कसलं जादूजादूवालं अमेझिंग शरीर आहे त्यांचं…असं वाटतं त्यांच्या शरीरात शिरावं आणि सगळ्या हाॅर्मोन्सला भेटून घ्यावं कडकडून.. एखादं स्पर्म बनावं आणि रस्ता हरवून भरकटत राहावं… स्त्रियांहून सुंदर मशीन जगात कुठे नसेल राव…असो….
स्त्रियांच्या शारिरीक गोष्टींना दुय्यम स्थान देऊन त्यांच्या हुशारीला प्रथम स्थान देणं.. पुरूषांच्या अहंकाराला दुखावणारं असतं… पण बहुतांश वेळी स्त्रियांनाही पुरूष आपल्याहून दोन पावलं पुढे.. असणारे लागतात…काही Evolutionary सायकोलाॅजिस्टच्या म्हणण्यानुसार.. बहुतांश स्त्रिया Dominant पुरूषाकडे आकर्षिल्या जातात..Infact पुरूष काही बाबतीत Dominant च असावा असा त्यांचा आग्रह असतो…काही पुरावे सिद्ध करतात की स्त्रियांच्या Ovulation च्या काळात म्हणजे पिक पिरेडला स्त्रिया Dominant पुरूष जास्त प्रिफर करतात..त्यामागे पुन्हा उत्क्रांती..
Dominant पुरूष जिवनावश्यक लागणाऱ्या इतर गोष्टी सहज मॅनेज करू शकतो… तो कंट्रोल मध्ये असतो.. त्याच्यात लिडरशिप गुण असतात..आणि माझ्या मुलांना तो योग्य संरक्षण पुरवू शकतो … अशा पुरूषांकडे सुपिरीअर जिन्स असतात अशी स्त्रियांची धारणा होते व्हाया जिन्स…काही रिसर्च असंही सांगतात..की स्त्रियांच्या पिक पिरेडमध्ये त्यांना आपले जोडीदार कसेही असले तरी ते भारीच वाटतात… स्त्रियांच्या अंड्यांना पुरूषांचे शुक्रजंतू मिळावेत म्हणून जिन्सने त्यांना दिलेली ती एक प्रकारची भूल असते…
पुरूषांसाठी..स्त्रिया पटवण्याचा योग्य काळ हा त्यांचा Ovulation चा काळ असतो.. तुम्ही शक्ती कपूर असाल तरी ह्या काळात तुम्ही स्वतःला शाहरूख म्हणून भासवू शकता..जसं स्त्रिया डाॅमिनंट पुरूष प्रिफर करतात.. तसं पुरूष चुकूनही करत नाही… कुठल्याही अर्थाने अहंकारी पुरूषासाठी ते फायद्याचं नसतं..उत्क्रांतीही त्याला तो सल्ला देत नाही..माणसाचं मन पाहावं..बाह्य सौंदर्य नाही हे जरी आपण फार सहानुभूतीने म्हणत असलो..तरी प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या ठरलेली असते…अगदीच आपण जॉन ह्रितिक माधुरी कैतरीना निवडत नसलो तरी साधारण सौंदर्याची व्याख्या आपण केलेली असते…विद्रुप शरीर असलेले किंवा अपंग असलेल्या व्यक्ती आपण पार्टनर म्हणून निवडू शकू का ? आपण ओव्हरऑल सगळं व्यवस्थित पाहूनच घेतो.. एवढंच काय तर समोरच्या पार्टनरची Sexual Compatibility..देखील आपण विचारात घेत असतो…प्रत्येकजण स्वतःचा.. स्वतःच्या सुखाचा विचार करत असतो…पण डायरेक्ट सांगणार कसं ? लोकं स्वार्थी ठरवतील ?आकर्षणाची स्टेप पार पडली एकत्र आलं की मग सुरु होते वास्तवातली ऍडजस्टमेन्ट.. जोपर्यंत एखादी व्यक्ती आपली होत नसते किंवा नातं अगदीच नवीन असतं तोपर्यंत आपणही ऍडजस्टमेन्ट करत राहतो… एकदा ते आपल्याला कायमचं मिळालं की मग त्या आकर्षणाची ढील कमी पडत जाते…
शारीरिक आकर्षण कमी होऊन बाकीच्या गोष्टी नात्यात महत्वाच्या होऊन जातात…मला वाटतं की प्रत्येक स्त्री..पुरुष नात्याची एक एक्स्पायरी असते… आणि ती एक्स्पायरी आकर्षणावर जास्त अवलंबून असते… कारण ते आकर्षण एकत्र आल्यामुळे सहज मिळू लागतं.. रोजचं होऊन जातं..त्याची किंमत कमी होत जाते. आकर्षण कमी झालं की मग एक्स्पायरी जवळ येऊ लागते… प्रत्येकवेळी ते आकर्षण टिकवणं शक्य नसतंच… मग नात्यातला सहवास मदतीला येतो…पण पुन्हा त्या सहवासालाही आकर्षण लागतंच की…कुठल्याही आकर्षणाशिवाय तो सहवास तरी का आवडेल ?कदाचित हे आकर्षण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्येही बदलत असेल…
शारीरिक..वैचारिक वाटणाऱ्या आधीच्या आकर्षणाला भावनांची जोड मिळत असेल.. म्हणजे पुन्हा त्या भावनांचं आकर्षण आलंच..स्त्री..पुरुष नातं टिकवण्यासाठी दोघांच्यातलं आकर्षण टिकवून ठेवणं फार गरजेचं वाटतं मला….एकमेकांमधल्या आवडणाऱ्या गोष्टी..या टिकवून ठेवता यायला हव्यात… एकेकाळच्या आवडणाऱ्या गोष्टी जर नावडत्या होत गेल्या आणि नवीन आवडी निर्माण नाही करता आल्या की मग ते नातं ढासळायला लागतं….
(सगळेच विचार माझे नाहीत…काही वाचलेले..यु ट्युब वर व्हीडीवो मधुन काही समजलेल..व काही अनुभवलेल..)
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

