Skip to content

जे हवंय, आधी ते जगाला द्या!!

जजमेंटल


प्राजक्ता पंडित

समुपदेशक,पुणे.


समाजात अनेक प्रकारची लोकं असतात त्यांचा चांगला वाईट अनुभवही आपल्याला येत असतो. आज एक व्यक्ती भेटली ती केवळ 2 ते 3 तासच तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला थोड्याच वेळात अनेक नकारात्मक लेबल लावून मोकळी झाली. न मागितलेले सल्ले देतांना काही लोक किमान थोडी मवाळ भाषा तरी वापरतात पण नाही, ही व्यक्ती मोठ्या मोठ्याने उर्मट भाषेत स्वतः चे (केवळ इतरांना देण्यासाठीचे) ज्ञान पाजळत होती.बर ह्या अश्या लोकांना समोरच्याला त्रास झाल्याचे काही वाटत नाही.

समोरच्या माणसाच्या 3 ते 4 वाक्यावरून,काही तासांच्या भेटी वरून एखाद्या व्यक्तीबद्दल कुठलेही मत मांडणे खूप चुकीचे आहे,कारण ती व्यक्ती खरोखर कसे आयुष्य जगत आलेली आहे आणि जगत आहे? तीचा स्वभाव नेमका कसा आहे? व्यक्ती म्हणून ती कोण ,कशी आहे?तिच्या कौटुंबिक , सामाजिक भूमिका ती खरोखर कश्या पार पाडत आहे? हे आपल्याला माहिती नसतांना त्या व्यक्तीला ‘जज’ करणे म्हणजे स्वतः च्या संकुचित मानसिकतेचे प्रदर्शन करणे होय.

“ज्याच्या ओंजळीत जे आहे तेच तो दुसऱ्याला देतो” असे म्हणतात , पण मग वाटते मान्य काही लोकांना आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो, दुःख, अपेक्षाभंग झालेला असतो. प्रेमाची अशी माणसे लाभत नाहीत म्हणून इतरांना तोंडाला येईल ते बोलून, वाईट सिद्ध करण्यात काय मिळत असेल या लोकांना.आपल्या डोक्यातील कचरा दुसऱ्यांच्या डोक्यात शिफ्ट करून मोकळे व्हायचे बस एवढाच हेतू असावा बहुधा.पण मग अश्या स्वभावाच्या लोकांना सोबतची माणसे टाळायला लागतात, नातेसंबंध खराब होतात, व्यवसायावर वाईट परिणाम होतो.

“आपल्या तोंडून शब्द निघावे ते दुसऱ्या ला सुखावण्यासाठी, दुःखी तर कुणीही करू शकते.” दुसऱ्याचे हृदय पिळवटून काढणारे शब्द गरज नसतांना वापरायचेच कशाला? दुसऱ्याला आनंद देणं ही एक कला आहे आणी ती प्रत्येकालाच जमत नाही मान्य पण मग दुखवू तरी नये.

ब्रह्मांडाचा एक गोल्डन रुल आहे – तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात हवे असेल तेच जगाला द्या , त्याच्या चौपट तुम्हाला ते मिळेल. आता कुणी काय द्यायचे हे ज्याचे त्यानी ठरवावे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “जे हवंय, आधी ते जगाला द्या!!”

  1. अगदी बरोबर आणि १००% खरंच आहे…जे पेराल तेच उगवत

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!