Skip to content

‘कृपया हसा’ कारण आत्महत्या करणारी मी, आज आनंदाने जगतेय!

स्मित हास्य ☺️


एक अत्यंत श्रीमंत स्त्री महागडे कपडे आणि दागिने घालून भल्या मोठ्या मर्सिडीज मधून आपल्या मानसशास्त्रज्ञांकडे गेली आणि म्हणाली

“सर! मला असे वाटते की माझे संपूर्ण आयुष्य निरुपयोगी आहे, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही मला आनंद मिळविण्यासाठी मदत कराल का?” मानसशास्त्रज्ञांनी तिथे काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेला बोलावले आणि तिने आपल्या जीवनात आनंद कसा मिळाला हे सांगण्यास सांगितले त्या वृद्ध स्त्रीने तिची केरसुणी खाली ठेवली, आणि सांगायला सुरुवात केली…

“माझ्या नवऱ्याचा मलेरियामुळे मृत्यू झाला आणि 6 महिन्यांनंतर माझा मुलगाही एका अपघातात मरण पावला. मला कोणीही नव्हते. मी अगदी एकटी झाले , माझ्या आयुष्यात काहीही शिल्लक राहिले नाही. मी झोपू शकत नव्हते , खाऊ शकत नव्हते , माझे हसणे ही थांबले होते ”

मी ही माझे स्वतःचे जीवन संपवण्याच्या विचार करण्यास सुरवात केली होती .

एक दिवस मी कामावरुन घरी येत असताना एक लहान कुत्र्याचे पिल्लू माझ्यामागे येत होते , बाहेर खूप थंडी होती, म्हणून मी त्या बाळाला आत येऊ दिले. त्या कुत्र्याच्या बाळासाठी मी थोडेसे दूध गरम करून दिले पिल्लानी प्लेट्मधले दूध चाटून पुसून प्यायले मग ते माझे पाय चाटू लागले बऱ्याच महिन्यांनतर मी त्या दिवशी हसले मग मला वाटले की या पिल्लाची मदत केल्याने मला आनंद झाला आहे , ह्याला माझी गरज आहे , कदाचित इतरांसाठी काहीतरी केल्याने मला अधिक आनंद होईल. म्हणून दुसर्‍या दिवशी मी माझ्या आजारी शेजाऱ्या साठी काही बिस्किटे आणि फळ घेऊन गेले ,

“दररोज मी काहीतरी नवीन आणि असे काहीतरी करते जे इतरांना आनंदित करते आणि त्यांचा आनंदी चेहरा पाहून मला खूप आनंद होतो .”

“आज मला आनंद मिळाला आहे, आणि मी इतरांना आनंद देत आहे.”

हे ऐकून ती श्रीमंत बाई रडू लागली. तिच्याकडे पैशांनी खरेदी करता येणारे सगळे काही होते पण आनंद नव्हता .

मित्रांनो! आपले जीवन आपण किती आनंदी आहोत यावर अवलंबून नाही परंतु आपल्यामुळे किती लोक आनंदी आहेत यावर आहे !
आज आपण या निश्चयाने सुरुवात करूया की आज आपणही काही ना चांगले करून कोणत्या तरी व्यक्तीच्या आनंदाचे कारण बनू.!

कृपया हसा
जर आपण शिक्षक असाल आणि आपण हसत वर्गात प्रवेश कराल तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य पहा.

कृपया हसा
जर आपण डॉक्टर असाल आणि रुग्णाला हसत हसत ट्रीट कराल तर रुग्णाचा आत्मविश्वास दुप्पट होईल.

कृपया हसा
जर आपण गृहिणी असाल तर घरातली सगळी कामे हसत हसत करा आणि संपूर्ण कुटुंबातले आनंदाचे वातावरण पहा.

कृपया हसा
जर आपण कुटुंब प्रमुख असाल
जेव्हा तुम्ही संध्याकाळी हसत हसत घरात प्रवेश कराल आणि संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल !

कृपया हसा
जर आपण व्यापारी असाल आणि कंपनीमध्ये आनंदी असाल तर कर्मचार्‍यांच्या मनाचा दबाव कमी होईल आणि वातावरण आनंदी होईल

कृपया हसा
आपण दुकानदार असाल आणि हसून आपल्या ग्राहकाचा आदर कराल तर ग्राहक आनंदी होईल आणि आपल्या दुकानातून हसत सामान घेऊन जाईल.

कृपया हसा
रस्त्यावरन चालताना एखाद्या अज्ञात माणसाला पाहून हसा त्याच्या चेहऱ्यावर ही स्मित येईल

कृपया हसा
कारण स्मितासाठी पैसा खर्च करावा लागत नाही , ते आनंद आणि समृद्धीचे वैशिष्ट्य आहे.

कृपया हसा
कारण तुमचे हास्य अनेकांच्या चेहऱ्यावर smile – हास्य आणेल.

कृपया हसा
कारण तुम्हाला पुन्हा हे जीवन मिळणार नाहीये

कृपया हसा
कारण रागाने दिलेला आशीर्वादही वाईट वाटतो आणि हसत बोललेले शब्द गोड वाटतात!

कृपया हसा
कारण जगातील प्रत्येक व्यक्तीला फुलणारी फुले आणि फुललेले चेहरे आवडतात.

कृपया हसा
कारण आपले हास्य एखाद्यास आनंद देऊ शकतो.

कृपया हसा
कारण आपण एकमेकांकडे बघून हसलो तर कुटुंबातले संबंध छान टिकू शकतात

आणि सर्वात मोठी गोष्ट…

कृपया हसा
? कारण ती माणसाची ओळख आहे. प्राणी कधीही हसू शकत नाही.
म्हणून स्वत: हसून इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणा.

हसा आणि सदृढ व्हा.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “‘कृपया हसा’ कारण आत्महत्या करणारी मी, आज आनंदाने जगतेय!”

  1. Tumche sarv lekh khup chan astat .asha karte asech lekh pudhe pn patval .

    Thank u so much

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!