Skip to content

दुसऱ्यांसाठी जगणे माणूस विसरून गेला आहे!!!

सोशल मीडिया चा ध्यास


संगीता वाईकर

नागपूर


आजचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे .
मोबाईल नामक हाताच्या मुठीत असलेल्या यंत्राने तर अगदी कहर केला आहे.

आपल्या पासून हजारो मैल अंतरावर असलेल्या व्यक्ती सोबत क्षणात या यंत्राने संपर्क करता येतो हे जेवढे खरे आहे तेवढेच आपल्या अगदी जवळ असलेल्या व्यक्ती ला दूर नेण्याची किमया याच मोबाईल ने केली आहे .हे एक भयाण वास्तव आहे.

आजची पिढी व्हॉट्स अप, इंस्टा ग्राम,फेसबुक ट्विटर ने अक्षरशः ग्रासला गेला आहे.

सेल्फी काढणे,फोटो काढणे,चॅटिंग करणे,सतत स्टेटस अपडेट करणे.यात प्रत्येक जण व्यस्त आहे.

कधी तर एखादा अपघात झाला तर त्यावेळी मदत करण्यापेक्षा व्हिडिओ काढून पोस्ट करण्यातच आपली इती कर्तव्यात मानणारे लोक आपल्याला दिसतात.

आज माणुसकी हरवली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज इतर कामे सोडून मोबाईल मध्ये तासनतास व्यग्र असणारी माणसं पाहिली की वेळेचा अपव्यय किती मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे याचा विचार करायला हवा.

विविध खेळात सहभागी होऊन जीव गमावणारी मुले आपले आयुष्य उद्ध्वस्त करतात .

आज शाळा कॉलेज मधील मुलांवर याचा अतिशय गंभीर परिणाम होतो आहे.

शारीरिक आणि मानसिक आजार यामुळे अनेकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे.

यामुळे पाठ दुखी,डोळ्यांवर ताण,मान दुखणे,याशिवाय एकाग्रता कमी होणे,झोप न येणे,अस्वस्थता ,कोणतेही काम किंवा अभ्यासात लक्ष न लागणे,मानसिक तणाव,नैराश्य याचा सामना करावा लागत आहे.
लाईक आणि शेअर या मुळे अनेक जण चिडचिड,राग ,द्वेष यामुळे त्रस्त होताना दिसत आहे.

इंटरनेट शिवाय आपण जगूच शकत नाही अशी भावना निर्माण होते आहे.आणि ते नसेल तर मानसिक अस्वस्थता निर्माण झाली की सारासार विवेकबुद्धी नाहीशी होते.

त्यातून अनेकदा भांडणे ,वादविवाद आणि कधी तर जीव हानी देखील केली जाते.

आज सोशल मीडियावर हजारो मित्र असले तरी प्रत्यक्षात मात्र गरज असेल तेव्हा मदतीला धावून येणारा एकही मित्र नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्याशिवाय अनेक व्हिडिओ मुळे मनावर वाईट परिणाम होतो आहे.
त्याशिवाय व्हिडिओ मुळे ब्लॅक मेल करणे किंवा लैंगिक शोषण याचेही प्रमाण वाढते आहे.

केवळ फ्रेंड रिक्वेस्ट च्या मोहाला बळी पडून आपले आयुष्य उद्ध्वस्त करू नका.

अपरिचित व्यक्तींच्या लाईक्स च्या धोका वेळीच लक्षात घ्या.
पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे त्यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे.आपली मुले काय करतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मोबाईलचा अतिरेक झाला की त्याचे परिणाम होणारच आहे .हातात असलेल्या या आधुनिक तंत्रज्ञाना चा वापर कसा ,किती आणि कुठे करायचा याचे भान ठेवणे ही आजची फार मोठी गरज आहे.

या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी काही नियम अत्यंत आवश्यक आहे.
याचा वापर कमीत कमी करायला हवा.

एखादा छंद जोपासणे ,संगीत ,वाचन खेळ , योग, ध्यानसाधना करणे आवश्यक आहे.

समाजासाठी काहीतरी कार्य करणे. लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांना मदत करणे यातून आनंद प्राप्त करता येतो.

आज केवळ आपला विचार केला जातो दुसऱ्या साठी जगणे माणूस विसरून गेला आहे.

सतत मोबाईल च्या सानिध्यात राहून आपण आपले मन स्वास्थ हरवून टाकत आहे.त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे.

संयम ठेवणे ,सारासार विचार करणे याकडे दुर्लक्ष होत आहे .

वेळीच सावध व्हा आणि आपले जीवन आधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द करा .

अती तिथे माती झाली की सर्वनाश अटळ आहे.
तेव्हा वेळीच जागे व्हा.

जीवनात काय मिळवायचे आहे ते ध्येय निश्चित करा आणि त्याच्या पूर्ती साठी प्रयत्न करा.

जीवन सुंदर आहे .ते आनंदाने जगा .चांगले काम करून यशस्वी भरारी घ्या.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “दुसऱ्यांसाठी जगणे माणूस विसरून गेला आहे!!!”

  1. Jyoti vimal raghoba

    Sahmat.What’saap,insta,Facebook ne ek abhasi ani atmamagn jag tayar kel ahe.tyat pahili ani antim wyakti “mi”aste. Satat.swatala present karat rahan,abhasi jagatli ek veglich spardha,status yanchi purtata karat rahan.saglya wyaktinshi ugichach chatting madhye vel ghalwan….maahtwachya wyakti niwdun yat kahi vel ghalwan yogya.
    Real jagat prem sambandh wyakt karnyasathi limited jaga ani vel hota….coffee table,collage katta,office canteen..etc.ata te mobilemule 24tas chalu rahat.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!